Posts

' माहेरची साडी '  चित्रपटाच्या यशानंतर विजय कोंडके यांचा नवा चित्रपट भेटीला    ' लेक असावी तर अशी '  ज्येष्ठ दिग्दर्शक   विजय कोंडके हे नाव घेतलं की , ' माहेरची साडी '  हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो .  या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती ,  वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या    मराठी चित्रपटाने   यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले.    १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या  ' माहेरची साडी '  चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विजय कोंडके यांची निर्मिती ,  दिग्दर्शन असलेला  ' लेक असावी तर अशी '   हा मराठी चित्रपट  २६ एप्रिलला  आपल्या भेटीला येतोय.  ' ज्योती पिक्चर्स '  निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.  सोंगाड्या ,  पांडू हवालदार ,  बोट लावीन तिथं गुदगुल्या ,  तुमचं आमचं जमलं ,  राम राम गंगाराम ,  आली अंगावर यांसारख्या