Saturday, 1 July 2017

डॉक्टर्स दिनानिमित्त स्माईली बँक फॉर डॉक्टर

           डॉक्टर दिनी रुग्णांनी खास स्माईली देवून डॉक्टरांचा सन्मान
Dr. Hemant Thacker, Dr. Rahul Shah, Dr. A. M Bhagwati, Dr. Rajeev Boudhankar (CEO, Bhatia Hospital) and Dr. R. Dastur along with the patient Jamshed Chennoy.
मुंबई,दि.३० जून २०१७ ः एसव्हीसी बँकने भाटिया हॉस्पिटलच्या सहकार्याने ३० जून रोजी डॉक्टर्स दिनानिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हॉस्पिटलच्या आवारात पार पडलेल्या या खास कार्यक्रमामुळे संपूर्ण दिवसच जणू प्रेमाची उब आणि भावनाने ओंथबून गेला होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एसव्हीसी बँकेने भाटिया हॉस्पिटलमधील रुग्ण,त्याचे कुंटूंबिय आणि तेथील कर्मचारी,व्यवस्थापन यांना आपल्या सोबत जोडून घेतले होते.समाजाचे आरोग्य जपण्यात आणि क्षेमकुशल राखण्यातील डॉक्टरांच्या सहभागाविषयी या निमित्ताने  कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.ख्यातनाम फिजीशीअन आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ.बिधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ भारतभर "डॉक्टर दिन"साजरा केला जातो.
या प्रंसंगी भाटिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या आरोग्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतुलनीय असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात होता.एसव्हीसी बँकेने "स्माईली बँक फॉर डॉक्टर"ही अभिनव संकल्पनाही यावेळी राबवली.यासाठी बँकेने स्माईली असलेली खास नाणी म्हणजे "स्माईली कॉइन"तयार केली होती.रुग्ण आणि त्यांच्या कुंटूंबियांनी ही नाणी घेऊन ती एका मोठ्या पिगी बँकेमध्ये म्हणजे एसव्हीसी स्माईली बँकेमध्ये जमा केली.नंतर कर्मचारी,रुग्ण नि बँकेच्या प्रतिनिधीच्या उपस्थित ही पिगी बँक उघडण्यात आली होती.रुग्णांनी डॉक्टरासाठी दिलेली सर्व नाणी अभिमानाने प्रदर्शनासाठी लावण्यात आली होती.हा संपूर्ण कार्यक्रम फारच उत्साहपूर्ण रितीने पार पडला.
हा कार्यक्रम भाटिया हॉस्पिटलचे सीईओ डॉ.राजीव बोधनकर,डॉ.हेमंत ठाकर,डॉ.ए.एम.भागवती,डॉ.राहुल शाह,डॉ.आर दस्तूर नि एसव्हीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुहास सहकारी यांच्या विशेष उपस्थितीत झाला.या डॉक्टर दिनानिमित्त एसव्हीसी बँकेने डॉक्टरासाठी खास सवलत दिली होती.या सवलतीत डॉक्टरांच्या फायद्यासाठी कर्जावर खास स्पर्धात्मक व्याजदर देण्यात आले.आणि सर्वप्रकारचे प्रोसेसिंग आकार माफ करण्यात आले.
या कार्यक्रमाने रुग्ण,त्याचे नातेवाईक आणि डॉक्टरांना सुध्दा काही नाजूक,भावनिक क्षण देऊ केले. 

No comments:

Post a Comment