Saturday, 26 May 2018

शिर्डीत साई सेवक योजना

         श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी महोत्सव निमित्त साई सेवक योजना
शिर्डी -
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या  समाधी शताब्‍दी  महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दिनांक २९ जुलै २०१७ पासून सुरु करण्‍यात आलेल्‍या  साई सेवक योजनेस उत्‍तम प्रतिसाद मिळत असून देशातील विविध राज्‍यातून साईभक्‍त या योजनेत सहभागी  होत आहे.श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी  महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या संकल्‍पनेतून श्रीसाईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या साई सेवक योजनेमध्‍ये साई सेवकांचा २१ व्‍यक्‍तींचा ०१ गट तयार करण्यात येत असून मंगळवार ते  सोमवार  ०१ गट काम करत आहे. असे एका आठवडयात सकाळी ०६.०० ते दुपारी ०२.०० व  दुपारी ०२.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत हे साई सेवक आठवडाभर सेवा देत आहेत. या योजनेमध्‍ये महाराष्‍ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पंश्चिम बंगाल, दिल्‍ली, ओरिसा, तामिळनाडू, मध्‍यप्रदेश, केरळ व उत्‍तराखंड आदी राज्‍यामधुन ५२० साई सेवक गटांनी नोंदणी केलेली असून   
आजतागायात ३६३ साई सेवक गटांच्‍या माध्‍यमातुन ७२६१ साईभक्‍तांनी साई सेवक योजनेतून सेवा दिलेली आहे. या योजनेत यापुढे १५७ साई सेवक गट प्रतिक्षा यादीवर आहेत.
या साई सेवकांना मंदिर परिसर, संरक्षण विभाग, श्री साईप्रसादालय, हॉस्पिटल, लाडु विभाग व निवासस्थाने याठिकाणी वर्षातून सलग ७ दिवस साई सेवेची संधी दिली जाते. हे साई सेवक सेवाभावी वृत्तीने भक्तांचा आदर करुन, सन्मान करुन “ओम साई राम” म्हणून साईभक्तांच्या अडचणी सोडवत आहे. या साई सेवकांना ओळखपत्र, गणवेश देवून त्यांची संस्‍थानच्‍या वतीने   
निवास, भोजन, नाष्‍टा व चहापाण्‍याची व्‍यवस्‍था  मोफत करण्‍यात येत आहे.दर मंगळवारी आलेल्‍या सेवेक-याचे स्‍वागत करण्‍यात येवून सेवा पुर्ण झालेल्‍या सेवक-यांचा संस्‍थानच्‍या वतीने प्रमाणपत्र देवून सन्‍मान केला जातो. तसेच या उपक्रमात सहभागी होणा-या साई सेवकांना स्‍वच्‍छता व व्यसनमुक्तीची शपथही दिली जाते.
या साई सेवक योजनेत सहभागी होण्‍यासाठी संस्‍थानचे कामगार विभाग (०२४२३) २५८८१०/११ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

No comments:

Post a Comment