Thursday, 31 May 2018

झी मराठी मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'

आजी जोडू शकेल का समीर आणि मीराची दुरावलेली मनं? 

असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं झी मराठीवरील 'तुझं माझं ब्रेकअपया मालिकेतील समीर आणि मीरा बाबतीतही झालेलं प्रेक्षकांनीपाहिलंलग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवाओसरला की मग सुरु होते संसाराची तारेवरची कसरतलग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवरपडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा  ठेवता एकमेकांच्या चुका काढायलालागतात आणि भांडायलाही लागतात आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की तेदोघे वेगळे होतातवेगळे होऊनही दोघे मित्र म्हणून एकमेकांना भेटतात आणि बोलतातपणसमीरने मेनकासोबत साखरपुडा केला ही गोष्ट मीराला खूप खटकते
बळजबरीने मेनकाच्या हातात अंगठी घालायला लागल्यामुळे समीरच्या डोक्याची तार सटकलीयेत्यामुळे आता लग्नाचा एकही शब्द काढायचा नाही असं तो ठामपणे मेनका आणि आईलासांगतो तसेच लग्न तो म्हणेल तेव्हा होईल आणि लग्नाची घाई केल्यास शहर सोडून जाण्याचीधमकी देखील तो या दोघीना देतोतर दुसरीकडे समीर आणि मेनकाच्या साखरपुड्यामुळेदुखावलेली मीरा समीरशी सगळे संबंध तोडतेती त्याच्याशी तुटक वागायला लागतेआजी मात्रसमीहनचं नेमकं काय प्रकरण आहे हे शोधून काढण्याचा अतोनात प्रयत्न करते आहे आणित्यासाठी अर्नाळकरला ती कामाला लावतेतसंच दुसरीकडे घरी मेनका आणि लतामध्ये गैरसमजनिर्णाण करण्याचा प्रयत्न आजी सुरु करते.
आता आजी त्या दोघांना परत एकत्र आणेल का यशस्वी होईल कासमीर आणि मीरायांच्यातील अबोला दूर होईल काहे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळेल.

No comments:

Post a Comment