Friday, 25 May 2018

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये त्यागराज खाडिलकर

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये त्यागराज खाडिलकर यांची होणार एन्ट्री !
 • मी भाग्यवान आहे” मला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्याची संधी मिळत आहे
 • घरामध्ये कोणावर अन्याय होत असेल तर मी पाठीशी उभा राहीन !
 • बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांशी नाते जोडतो !
 • “मी व्यक्ती म्हणून कसा आहे हे प्रेक्षकांना कळेल” - त्यागराज खाडिलकर
 • मुंबई २५ मे२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रेक्षकांना तसेच घरामधील सदस्यांना एकानंतर एक सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकर यांनी काल बिग बॉस मराठीचे घर सोडले, त्या घरामध्ये फक्त सात दिवसांच्या पाहुण्या होत्या असे बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसला. हर्षदा ताई बरोबर बाकीचे सदस्य देखील खूप भाऊक झाले. तर काल घरामध्ये “SR” म्हणजे कोण याचे कोडे उलघडले. बिग बॉस यांनी शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. तेंव्हा या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय बदलणार कोण कोणाच्या बाजूने उभे रहाणार या गोष्टीची उत्सुकता असतानाच आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत त्यागराज खाडिलकर. शर्मिष्ठा राऊतनंतर आता त्यागराज खाडिलकर बिग बॉसच्या मराठीच्या घरामध्ये गेल्यानंतर काय घडेलहे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

  त्यागराज खाडिलकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात जागतिक मराठी परिषदेनिमित्त “स्मरणयात्रा” नावाचा मराठी चित्रपट संगीताचा इतिहास सांगणारा कार्यक्रम झाला होता त्यामधून झाली. त्यागराज यांना अखिल भारतीय मराठी विद्यार्थी परिषदेचा “गानहिरा” हा पुरस्कार मिळाला असून ते संस्कृती कलादर्पणमहाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराचे देखील मानकरी आहेत. त्यागराज यांनी ५२ हून अधिक मालिकांचे शीर्षक गीत गायले असून, अनेक सिनेमांचे संगीत दिग्दर्शनपार्श्वगायन केलेले आहे. त्यांनी बिग बॉस मराठीच्या घरामध्येजाण्याअगोदर काही गोष्टी सांगितल्या. “बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मला जायची संधी मिळत आहे हे माझं भाग्याचं आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. कारण, या घरामध्ये जाण्याचे आमंत्रण किंवा संधी सगळ्यांच मिळत नाही. माझं इतक्या वर्षांच या क्षेत्रामधील योगदान असेल कि, मला या घरामध्ये जाण्याची संधी मिळत आहे. मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे.
  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाताना काय Strategy असेल -
  या घरामध्ये जायच्या अगोदर मी दोन गोष्टी निश्चित केल्या आहेतत्यातील पहिली म्हणजे बिग बॉस यांनी दिलेले सगळे टास्क मनापासून करायचे आणि घरामधील काही सदस्य मनानेवर्तणुकीने चांगले आहेत परंतु स्वभावाने दुबळे आहेत त्यांच्या पाठीशी उभे रहायचे. कोणत्याही परिस्थितीत जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे त्याच्या विरोधात उभे रहायचेघरामधील एक सदस्य म्हणून.  
  एक प्रेक्षक म्हणून त्यागराज तुमचं मत सांगा –
  एक प्रेक्षक म्हणून सांगायचे झाले तर पूर्वनियोजित पटकथा, मालिका बघणं किंवा एखादा Talent Hunt Show बघणं यापेक्षा बिग बॉस मराठी बघण्याचा अनुभव वेगळाच आहे. कारण काहीच पूर्वनियोजित नाही कोण कसे वागेल का वागेल कोणाचे नातेसंबंध कोणाशी कसे आहेत ते कधी बदलतील कसे बदलतील हे बघायला प्रेक्षकांना मज्जा येते, त्यांना हे सगळे आवडते. हा कार्यक्रम बघताना मनाने माणूस त्या कार्यक्रमामध्येच असतो” हे याचे विशेष. प्रत्येकजण हा कार्यक्रम अनुभवू शकतो. प्रत्येक प्रेक्षकाचे घरातील सदस्याशी एक नाते बनते आणि म्हणूनच मग तो प्रवास अखंड बघत रहावासा वाटतो.
  बिग बॉस मराठीच्या घरातील सगळ्यात आवडता सदस्य कोण ?
  माझे आवडते सदस्य पुष्कर, मेघा आणि आऊ (उषा नाडकर्णी).
  सगळ्यात तगडा स्पर्धक कोणता ?
  मला असं वाटत मेघा आणि सुशांत ... खर तर मी पण अंतिम सोहळ्याची तयारी करूनच आलो आहे. मी स्वत:ला आणि माझ्यासोबत मेघा आणि सुशांतला अंतिम सोहळ्यात बघतो.
  महेश मांजरेकर आणि WEEKEND चा डाव याची उत्सुकता सर्वांनाच असते ... त्याबद्दल काय सांगाल ?
  मला अस वाटतं, जितके प्रांजळ बिग बॉस आहेत तितकेच महेश मांजरेकर देखील आहेत. जर कोण चुकत असेल तरच ते बोलणार,जर कोण योग्यपणे वागतं असेल तर उगाचच ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे कराणार नाहीत. जर तुमची वर्तणूक चांगली असेल, तुम्ही टास्क सर्व नियम पाळून खेळत आहातघरातील सदस्यांशी तुम्ही चांगले नातेसंबंध ठेवले तर मला नाही वाटत ते उगीचच तुमची शाळा घेतील.
  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत, तुमचा अविभाज्य भाग आहे गाणं ...तुमचं गाणं या घरामध्ये सुरु राहील ?
  जिथे योग्य असेल तिथे निश्चितच सुरु राहील. पण गायकापेक्षा सुध्दा त्यागराज खाडिलकर व्यक्ती म्हणून कसा आहे हे लोकांसमोर जास्त यावा अशी माझी इच्छा आहे. कारण गायक म्हणून माझं जे काही मूल्यमापन करायचं आहे ते रसिक प्रेक्षकांनी यापूर्वीच केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आवडता गायक व्यक्ती म्हणून कसा आहे हे जर मी लोकांपर्यंत पोहचवू शकलो तर मला एखादी सुरेल मैफल जिंकल्यापेक्षा जास्त आनंद होईल.
  कुठली भीती मनामध्ये आहे का ?
  अजिबात नाही. काही लपविण्यासारखं नाहीच आहे. माझा प्रांजळपणा, नि:स्पृहपणासाधेपणा तरीसुध्दा भूमिका घेणं हे जर दिसू शकलं तर कदाचित मी प्रेक्षकांचा आवडता बनेन.

No comments:

Post a Comment