Thursday, 31 May 2018

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सई होणार बिग बॉस समोर व्यक्त !
मुंबई ३१ मे२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य आता जवळजवळ एका महिन्याहून अधिक दिवस एकत्र रहात आहेत. सहाजिक आहे घरच्यांचीमित्र – मैत्रिणीची आठवण येणारच. बाहेरच्या जगाशी कुठलाही संपर्क नाही, बाहेर काय सुरु आहे त्याची कुठलीच कल्पना देखील नाही. अशावेळी घरामध्ये असलेल्या सदस्यांपैकीच एखाद दुसरा सदस्य आपला खूप जवळचा माणूस बनतो. सईमेघा आणि पुष्कर यांच्या मैत्री बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पहिल्या दिवसापासून या तिघांची चांगली मैत्री आहे. सई आणि मेघा खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. कितीही रुसवे – फुगवे झाले तरी सुध्दा त्या एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे तितकचं खरं आहे. या घरामध्ये आता दोन गट झाले असून ते दिसून देखील येते. यामध्येच बऱ्याचदा सदस्य एकमेकांना नको ते बोलून जातातटास्क दरम्यान हिंसा – शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येते. या सगळ्याचाच आता सईला खूप त्रास होत असून तिला काल खूपच रडू कोसळले. तिच्या मनामध्ये असलेल्या भावना तिने मेघापुष्कर जवळ व्यक्त देखील केल्या. मेघाने तिला बरेच समजविण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु सईचे रडू थांबले नाही. आज सई बिग बॉस जवळ तिच्या भावना व्यक्त करणार आहे. घरामधील प्रत्येक व्यक्तीला बिग बॉस यांचा खूप आधार वाटतो, त्यांच्यावर विश्वास देखील आहे. बिग बॉस देखील या घरातील सदस्यांना वेळोवेळी सल्ले देत असतात तसेच त्यांचे सांत्वन करत असतात.
सई बिग बॉस यांच्याजवळ तीन मुद्दे मांडणार आहे. सईला गेल्या दोन दिवसांपासून घरामध्ये खूपच नकारात्मकता जाणवतं आहे असे ती बिग बॉस यांना सांगणार आहे. तिला कालच्या टास्क दरम्यानचे रेशम  टिपणीसचे बोलणे खटकले, ज्या पद्धतीने ती म्हणालीकाही त्रास असेल तर बाजूला बस, तू खेळू नकोस”. तसेच टास्क दरम्यान आस्ताद आणि सुशांत या दोघांनीही सईच्या नावाचे अंड सुरक्षित ठेवण्यासया कार्यामध्ये तिचे समर्थक होण्यास अचानक नकार दिला, या गोष्टीचे वाईट वाटले. तसेच टास्क दरम्यान बिग बॉस यांनी वारंवार ताकीद देऊन देखील काही सदस्य शक्ती प्रदर्शन करतात याचे देखील वाईट वाटते. जे काहीसदस्यांनी कालच्या टास्क दरम्यान देखील केले...
सईने तिला दुखापत झाली असून, तिला यामुळेच टास्क करणे जमत नाही... तरीदेखील ती पूर्ण प्रयत्न करत आहे असे बिग बॉस यांना सांगणार आहे. आता या सगळ्यावर बिग बॉस यांचे काय म्हणणे असेल ते तिला कोणता सल्ला देतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment