Saturday, 2 June 2018

बिग बॉस मराठी

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !
  • सदस्य का म्हणत आहेत - बिग बॉस तुमचा आमच्यावर भरवसा नाय काय ?
  • रेशम आणि सईमध्ये होणार का मैत्री सुरुवात ?
  • नंदकिशोर चौघुलेंची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाली एन्ट्री !
  • शर्मिष्ठा अति आत्मविश्वासी तर जुई ठरली सोयीस्कर भूमिका घेणारी सदस्य
  • कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन ?
  • मुंबई २ मे२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “निरीक्षण परीक्षण हे कार्य. ज्यामध्ये घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या बिग बॉसच्या घरातील प्रतिमेनुसार क्रमवारी ठरवायची होती. सगळ्यांना विशेषणांचे फलक देण्यात आले. त्यानुसार घरातील कुठल्या सदस्याला ते विशेषण शोभेल या निकषावर हे कार्य आधारित होते. सदस्यांनी आपापसात चर्चा करून १ ते ५ अशी क्रमवारी ठरवायची होती. परंतु बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणाऱ्या नव्या सदस्याला बिग बॉस यांनी एक विशेष अधिकार दिला ज्यानुसार घरातील सदस्यांनी दिलेली क्रमवारी ते बदलू शकत होते आणि त्यांचा निर्णय अंतिम निर्णय मानण्यात येणार होता. ज्यानुसार अति आत्मविश्वास हे शर्मिष्ठाला देण्यात आले तर जुई ठरली सोयीस्कर भूमिका घेणारी सदस्य. घरातील सदस्य तसेच नंदकिशोर यांच्या क्रमवारीनुसार आस्ताद आणि सुशांत मध्ये कालपासून कॅप्टनसीची चुरस सुरु झाली. बिग बॉस यांनी सदस्यांना “सत्कार मूर्ती” हे कॅप्टनसीचे कार्य सोपवले. आता यामध्ये घरातील सदस्य कोणाला घराचा कॅप्टन बनवणार कोण डेंजर झोनमध्ये जाणार ?कोण सुरक्षित होणार हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी - WEEKEND चा डाव मध्ये आज रात्री ९.३० आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

    आज बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांनी “बिग बॉस तुमचा आमच्यावर भरवसा नाय काय हे गाण तयार केले आहे. हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. गाण त्यागराज खाडिलकर यांनी म्हंटले आहे. ज्यामध्ये घरातील जोड्यांवर देखील ओळी बनविल्या आहेत. अतिशय सुंदर प्रकारे हे गाण सादर करण्यात आले आहे. “बिग बॉसच्या दारी लिंबू मिरच्या... मराठी सिझनची चर्चा... सेलेब्रिटी पोरांचा मेन रोल ... बिग बॉस तुम्ही आमच्या संग गोड बोल ... तसेच मेघाशर्मिष्ठा आणि आऊ यांच्यावर देखील मस्त ओळ बनवण्यात आली आहे... मेघाशर्मिष्ठा आणि आऊ... रोज रोज देतात खाऊ...कुणीतरी सांगा त्यांना कमी बोल ... बिग बॉस तुम्ही आमच्या संग गोड बोल... तसेच पुष्कर आणि सईच्या मैत्रीवर आणि स्मिता आणि रेशमल वरदेखील या गाण्यामध्ये खास ओळी बनविल्या आहेत. तुमच्या आवडत्या सदस्यांनी बनविलेले हे गाण बघायला विसरू नका आजच्या भागामध्ये.

    रेशम आणि सईचे तसेच रेशमचे आऊ आणि मेघाबरोबर बऱ्याचदा खटके उडताना, एकमेकांविरुध्द बोलताना, त्यांची भांडण आपण बघितली आहेत परंतु आज रेशम आणि सई यांच्यामध्ये एक चर्चा होणार आहे ज्यामध्ये रेशम सईला तिचा मुद्दा समजवून सांगणार आहे. तसेच सईने या खेळामध्ये रेशमला काही बोले तरी ती त्यावरून सईला कधीच जज करणार नाही असे रेशमने सईला सांगितले आहे. ही झालेली चर्चा सई आणि रेशम मध्ये मैत्रीची सुरुवात असेल का सईचे यावर काय म्हणणे असेल आज WEEKENDचा डाव मध्ये काय होणार हे बघायला विसरू नका नका बिग बॉस मराठी - WEEKEND चा डाव मध्ये आज रात्री ९.३० आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment