Tuesday, 5 June 2018

नझारा टेक्नॉलॉजीज

नझारा टेक्नॉलॉजीतर्फे केनियामध्ये "रिअल मनी गेमिंग"साठी कामकाज प्रस्थापित
मुंबई,०५ जून २०१८: नझारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (नजारा) रियल मनी गेमिंग बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी एनझेड वर्ल्ड केनिया लिमिटेड (एनझेड वर्ल्ड) ही उपकंपनी स्थापन करून आपल्या कामकाजाचा विस्तार केला आहे. एनझेड वर्ल्डमध्ये नझाराचा ७० टक्के हिस्सा आहे. एनझेड वर्ल्डने नझाराबरोबर भागिदारीमध्ये केनियाच्या बेटिंग कंट्रोल बोर्डकडून बेटिंग परवाना मिळवला असून त्याअंतर्गत काही उत्पादने चालवता येणार आहेत. एनझेड वर्ल्ड जून २०१८ मध्ये फिफासह क्रीडा बेटिंग, स्पोर्ट्स फँट्सी, स्पोर्ट्स आर्केड आणि स्पोर्ट्स रियल मनी क्विझ सुरू करण्याच्या विचारात आहे.
मनीष अगरवाल,मुख्य कार्यकारी अधिकारी,नझारा टेक्नॉलॉजीज म्हणाले, ‘केनिया तसेच नायजेरिया, घाना, कॅमेरूनसारख्या आफ्रिकन देशांत परवान्याच्या चौकटीत बसणारे रियल मनी गेमिंग लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांत नझाराने प्रत्यक्षात तयार केलेले नेटवर्क वापरून फिफा १८ बरोबर आफ्रिकी देशांच्या क्रीडा क्षेत्रातील बेटिंग आणि फँटसी बाजारपेठ काबीज करण्यासाठी उत्सुक आहोत.’
इंटरनेट दूरवर पोहोचत असल्यामुळे, स्मार्टफोन्स परवडायला लागल्यामुळे आणि डेटाच्या किंमती कमी होत असल्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गेमिंग उद्योग भरभराटीला येत आहे. अशा बाजारपेठांमध्ये नझाराचे अस्तित्व लक्षात घेता कंपनी गुंतवणूकदार कंपन्या आणि डेव्हलपर भागीदार यांच्यातून उत्पादनांचे योग्य समीकरण उपलब्ध करून देण्यास सज्ज झाली आहे असे आम्हाला वाटते.
केनियामध्ये लाँच केले जाणार असलेले उत्पादन रिअल टाइम सोशल प्रेडिक्शन स्पोर्ट्स गेम आहे जिथे खेळाडूंना त्यांच्या मित्रपरिवारांला प्रत्यक्ष वेळेत (रिअल टाइम) हरवता येऊ शकते. हा गेम नझाराच्या गुंतवणूकदार कंपन्यांपैकी एक असलेल्या मास्टरमाइंड स्पोर्ट्सने (मास्टरमाइंड) विकसित केला आहे. ‘जगभरात रियल मनी स्पोर्ट्स गेमिंग मुख्य प्रवाहात येत आहे. चाहत्यांचा अभिप्राय आणि आमचे तंत्रज्ञान तज्ज्ञ यांच्या उत्पादन अनुभवावर आधारित वेगळए उत्पादन तयार करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. केनियासह आफ्रिकेमध्ये स्पोर्ट्स गेमिंगला चांगली मागणी असल्यामुळे आमच्यासाठी विकासाच्या चांगल्या संधी आहेत,’ असे प्रतीक शहा, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मास्टरमाइंड स्पोर्ट्स यांनी सांगितले.
नझाराने २०१७ च्या दुसऱ्या सहामाहीत हलाप्ले या डेली फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली होती. ‘जगभरातील क्रीडाप्रेमींना एकत्र आणण्यासाठी फँट्सी स्पोर्ट्स हा उत्तम मार्ग आहे असे आहाला वाटते. गेल्या एका वर्षात भारतातील आमचे उत्पादन वापरणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया, हे उत्पादन जगभर उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आहे. केनिया हा एक सॉकरप्रेमी देश असून तिथे नझारा व त्यांच्या नेटवर्कच्या मदतीने आमचे कामकाज सुरू करण्यासाठी फिफा विश्वचषकापेक्षा दुसरी चांगली वेळ असू शकत नाही.’
मास्टरमाइंड स्पोर्ट्स आणि हलाप्लेशिवाय नझाराने मूंग लॅब्जमध्येही गुंतवणूक केली आहे. नझाराने वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशीपसाठी (डब्ल्यूसीसी) प्रसिद्ध नेक्स्टवेव मल्टीमीडिया आणि नॉडविन गेमिंग यांचे संपादन केले असून त्या भारत आणि मध्यपूर्व, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियातील कामकाजासाठी पूरक कंपन्यांचे नेटवर्क उभारण्यासाठी योग्य आहेत.
नझारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने डीआरएचपी फाइल केले असून नुकतीच आयआयएफएल असेट मॅनेजमेंट आणि राकेश झुनझुनवाला यांच्याकडून गुंतवणूक मिळवली आहे. ईएसएलने नझारामध्ये केलेली गुंतवणूक आणि पुढील पाच वर्षांसाठी ईएसएल यंत्रणा व प्लॅटफॉर्म वापरण्याचे नॉडविनने मिळवलेले खास हक्क यांच्या मदतीने नझारा ईस्पोर्ट्स व्यवसायातील अपेक्षित संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
नझारा टेक्नोलॉजीज लि.बद्दल :  
नझारा या मोबाइल गेम्स कंपनीचे मुख्यालय मुंबई, भारतात असून ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ती जगभरातील उद्योन्मुख बाजारपेठांसह ६१ देशांत कार्यरत आहे. नझारा उदयोन्मुख बाजारपेठांतील सर्वसामान्य मोबाइल इंटरनेट ग्राहकांसाठी मोबाइल गेमिंग सबस्क्रिप्शन चालवत असून त्यामध्ये आफ्रिका, मध्यपूर्व, दक्षिण पूर्व आशिया, लॅटिन अमेरिकेतील पहिल्या मोबाइल गेमर्सचा समावेश आहे. भारतामध्ये नझाराने विराट कोहली, ऋतिक रोशन, छोटा भीम, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मोटु पतलू, मायटी राजू, शिकारी शंभू, सुपंदी आणि चाचा चौधरी यांसारख्या आयपीचे परवाना मोबाइल गेमिंग हक्क मिळवले आहेत.
सप्टेंबर २०१७ पर्यंत गुगल प्ले स्टोअरद्वारे सर्वाधिक म्हणजेच ४४.४९ दशलक्ष डाउनलोड्ससह नझारा २०१७ च्या कॅलेंडर वर्षात आणि १९.३४ दशलक्षांसह २०१८ च्या कॅलेंडर वर्षात आघाडीची पब्लिशर आहे. नझाराची स्वतंत्र उपकंपनी नेक्स्ट वेव मल्टीमीडिया ही वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशीप फ्रँचाईझीची आयपी ओनर आहे.
नेक्स्ट वेव मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे (नेक्स्टवेव) २०१७ च्या कॅलेंडर वर्षात सप्टेंबर २०१७ पर्यंत ६४.३० दशलक्ष डाउनलोड्स आणि २०१६ कॅलेंडर वर्षात ४२.०२ दशलक्ष डाउनलोड्स झाले आहेत.
नेक्स्टेवचे वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशीप फ्रँचाईझीमधील मंथली अक्टिव्ह युजर्स (एमएयू) (मासिक सक्रिय वापरकर्ते) सप्टेंबर २०१७ पर्यंत ११.०२ दशलक्ष होते, तर सप्टेंबर २०१६ मध्ये ही संख्या ६.०० दशलक्ष एमएयू होती 

No comments:

Post a Comment