Monday, 11 June 2018

ओम डान्स ग्रुप,डान्स महाराष्ट्र डान्सचा विजेता

"स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे"- ओम डान्स ग्रुप,डान्स महाराष्ट्र डान्सचा विजेता
अगदी कमी वेळातच झी युवा या वाहिनीने सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. उत्तमोत्तम फिक्शन तसेच नॉन फिक्शन कार्यक्रम सादर करून झी युवाने नेहमीच प्रेक्षकनाचे भरभरून मनोरंजन केले आहे. डान्समहाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या कार्यक्रमाच्या टॉप ५ फायनॅलिस्टनी आजपर्यंत या मंचावर आलेल्या प्रत्येक परीक्षक आणि सिलेब्रिटी पाहुण्यांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. सुरूवाती पासूनच हाप्रवास अतिशय सुंदर राहिला आहे. डान्स महाराष्ट्र डान्सच्या धमाकेदार ग्रँड फिनाले नंतर परीक्षकांनी महाराष्ट्राला त्यांच्या डाँसिन्ग स्टार मिळवून दिला.
४ महिने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर, डान्स महाराष्ट्र डान्स या महाअंतिम सोहळ्यात ओम डान्स ग्रुपला विजेता म्हणून घोषित केले. एका छोट्या शहरात मोठे झालेले पुण्याचे प्रतिभाशाली डान्सर असणाऱ्या ओम डान्सग्रुपने डान्स महाराष्ट्र डान्सची ट्रॉफी आणि रु. ३,००,००० रोख रकमेचं पारितोषिक पटकावलं. आदित्य सरपोतदार, फुलवा खामकर आणि सिध्दार्थ जाधव यांनी परीक्षण केलेल्या या कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला आहे.महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी डान्सरना पुढे येऊन त्यांचे कौशल्य दाखवून विजेतेपद मिळवण्यासाठी झी युवा वाहिनीने हा मंच उपलब्ध करून दिला. ओम डान्स ग्रुपने नेहमीच परीक्षकांची मतं जाणून घेऊन उत्तमोत्तम परफॉर्मन्सेससादर केले आणि सर्वांची मनं जिंकली.
त्यांच्या विजया बद्दल बोलताना, आनंदित झालेल्या ओम डान्स ग्रुपने सांगीतले, "आमच्या हातात ट्रॉफी आहे यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही सुरूवात केली तो दिवस अजूनही आमच्या लक्षात आहे आणि खरेसांगायचे तर आम्ही एवढा पल्ला पार करू असे आम्हाला वाटले नव्हते पण नशीबात वेगळेच लिहिलेले असते. जेव्हा आम्हाला शेवटच्या वेळी मंचावर जायचे होते तेव्हा आम्ही ठरविले होते की काहीही चुका न करता छान कामगिरीकरायची. संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आमची प्रगती झालेला आम्हाला पहायला मिळाली आणि नवीन डान्स प्रकार शिकायला मिळाले. आमच्या प्रयत्नांना अखेरीस यश आले आणि आम्हाला आता अतिशय आनंद झाला आहे. स्वप्न पूर्णझाल्यासारखे वाटत आहे. आमचे कुटुंबिय, प्रेक्षक आणि परीक्षक यांचे आम्ही आभार मानतो कारण त्यांच्या पाठिंब्या शिवाय हे झालेच नसते.

No comments:

Post a Comment