Friday, 1 June 2018

टॉप स्पर्धक डान्स महाराष्ट्र डान्सचे

             हे आहेत डान्स महाराष्ट्र डान्सचे टॉप ०५ स्पर्धक  
दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे.डान्स महाराष्ट्र डान्सचा फिनाले जवळ आला असताना स्पर्धकांमधील चुरस अजूनच रंगात चालली आहे. हजारो उत्तम परफॉरमर्स मधून तावून सुलाखून या स्पर्धेच्या माननीय परीक्षकांनी टॉप ५ स्पर्धक निवडले आहेत जे फिनालेमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.
ओम डान्स ग्रुपने त्यांच्या प्रत्येक परफॉर्मन्सने परीक्षकांना प्रभावित केले आहे आणि त्यामुळे ते या स्पर्धेतील पाच फायनॅलिस्टस मधील एक बनले आहेत. महेश कोठारे, आणि स्वप्निल जोशी यांनी शाबासकी दिलेला सद्दाम शेखने एकट्याने सर्व स्पर्धकांवर मात करत टॉप 5 मध्ये जागा पटकावली आहे. बाकीच्या स्पर्धकांना तगडी स्पर्धा करणारा अशी ओळख असलेल्या गँग १३ ने सुध्दा कार्यक्रमाच्या सुरूवाती पासूनच परीक्षकांवर त्याच्या परफॉर्मन्सनी भुरळपडली आहे. तसेच कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक सेलिब्रिटी परीक्षकाला प्रभावित करणाऱ्यात यशस्वी झाला आहे. वाय३ डान्सहोलिक्स यांनी नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्मन्सेस देऊन स्वतःला सिद्ध केलं आहे. किंग ऑफ पॉपींग चेतनसाळुंखे हा या कार्यक्रमातील वन मॅन आर्मी असून त्याने आदर्श शिंदेला त्याच्या परफॉर्मन्सने प्रभावित करून त्याच्याकडून लॉकेट बक्षीस मिळवले. प्रत्येक क्षणी चेतनला परीक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे आणि अनेकवेळा स्टँडिंग ओव्हेशन सुद्धा मिळालं आहे. टॉप ५ फायनॅलिस्टसनी प्रेक्षकांच्या मनावर देखील त्यांची छाप पाडली आहे.
अशा प्रकारची एनर्जी मंचावर घेऊन येणाऱ्या, डान्स महाराष्ट्र डान्सचा ग्रँड फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहोत.
कोण जिंकणार ही स्पर्धा हे जाणून घेण्यासाठी पहात रहा डान्स महाराष्ट्र डान्स प्रत्येक बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता फक्त झी युवावर!

No comments:

Post a Comment