Wednesday, 13 June 2018

बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !
  • बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावले फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य !
  • मेघा, पुष्कर आणि भूषण यांना मिळणार सरप्राईझ !
मुंबई १३ जून, २०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवरफ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले. या कार्या अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच सई, रेशमस्मिता आणि आऊ यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. रेशमची मुलगी काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली आणि तिने सगळ्यांना आपलेसे केले. तसेच स्मिताच्या आईने देखील स्मिताला बरेच सल्ले दिले तिचे मार्गदर्शन केले आणि तिचे मनोबल वाढवले. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहे भूषण, मेघा आणि पुष्करच्या घरातील सदस्य. तेंव्हा बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भूषणचा मुलगा त्याची भेट घेण्यासाठी येणार आहे. तसेच मेघाची आई आणि मुलगी साक्षी येणार आहेत. सगळ्यात मोठं सरप्राईझ पुष्करला मिळणार आहे कारण त्याच्या बायको सोबतच त्याची चिमुकली मुलगी देखील या घरामध्ये येणार आहे. तिला बघून सगळेच खूप खुश होणार आहेत. कालचा तसेच आजचा दिवस बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना खूपच भाऊक करणार ठरणार आहे यात शंका नाही.
हे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment