Monday, 11 June 2018

पु.ल.देशपांडे चरित्रपट "भाईः व्यक्ती की वल्ली?"

रिचर्ड अॅटनबरोंच्या गांधी’ इतकाच पुलंवरील 'भाई: व्यक्ती की वल्ली?' हा चरित्रपट प्रभावी ठरेल– राज ठाकरे
 महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्यावरील "भाईः व्यक्ती की वल्ली?" चित्रपटाची घोषणा.. 
महेश मांजरेकर निर्मित-दिग्दर्शित चित्रपट पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात होणार प्रदर्शित...
. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या हस्ते झाला शुभारंभ...
मुंबई, ११ जून २०१८ः भाईंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही आहे. पण मला आत्तापर्यंत ज्या काही मोजक्या चरित्रपट अर्थात बायोपिक भावल्या त्यातील एक म्हणजे रिचर्ड अॅटनबरो यांचा गांधी’. मी हा चित्रपट किमान १५० वेळा पहिला आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना कॉलेजला दांडी मारून हा चित्रपट प्लाझा चित्रपटगृहात एकापाठोपाठ एक असा पहिला. त्या चित्रपटाने मी भारावून गेलो आणि मला वाटते महेश मांजरेकर यांचा 'भाई: व्यक्ती की वल्ली?' हा चित्रपट त्याच तोडीचा होईल. महेश हे पु. ल. आणि प्रेक्षक यांच्यामधील पूल यशस्वीपणे बांधतीलअसे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी काढले. त्यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी या चित्रपटाचा शुभारंभ वरळी येथे झाला.
८ नोव्हेंबर२०१८ पासून पु. ल. देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण जगभरात साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने याच काळात म्हणजेच ४ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार अशी घोषणा आज ११ जून रोजी वरळी येथे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महेश मांजरेकर मुव्हीजफाळकेज् फॅक्टरी- अ फिल्म मॅनेजमेंट कंपनी आणि ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट कंपनी यांच्यातर्फे या चित्रपटाची प्रस्तुती केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनही महेश मांजरेकर करत आहेत. चित्रपटात भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारत आहेत. या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांची असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रंगभूषेतील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले विक्रम गायकवाड रंगभूषेतून अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना चेहरा देणार आहेत.
यावेळी राज ठाकरे यांनी पुलंनी उभ्या केलेल्या व्यक्तीरेकांवरील त्यांच्या कार्टून्सचे प्रदर्शन पुढील वर्षी भरविण्याची घोषणाही केली. पुलंनी त्यांच्या व्यक्तिरेखा अजरामर केल्या. त्यातील अंतू बर्वानारायण यांसारख्या व्यक्तिरेखात्यांच्यावरील प्रसंग आणि त्या व्यक्तिरेखा मला कशा दिसल्यायाचे रेखाटन मी गेले ६-८ महिने करत आहे. पुढील ८ महिन्यात ते पूर्ण होईल आणि वर्षभरानंतर मी हे प्रदर्शन भरवीन,” अशी घोषणा यांनी केली.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आपल्या बहुआयामी लिखाणाने अजरामर झालेले साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांच्यावरील चित्रपटाची घोषणा सोमवारी करण्यात आली. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरचित्रपटाचे लेखक आणि साहित्यीक रत्नाकर मतकरीचित्रपटातील कलाकार उपस्थित होते.
पुलंनी मराठी वाचकांवर त्यांच्या साहित्याने मोहिनी घातली आणि त्यांच्या पश्चात आजही ती कायम आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे म्हणून मराठी माणूस आहे,तिथे पुलंचे साहित्य आहे. त्यांच्या साहित्यावर आधारित अनेक कलाकृती आजवर सादर झाल्या आणि त्या प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय ठरल्यापण हा चित्रपट त्या कलाकृतींवर नाहीतर त्या कलाकृती जन्माला घालणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे.
पुलंवर मराठी माणसाचे किती प्रेम आहेहे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांचा अभिनयत्यांचे साहित्यत्यांचे वक्तृत्वत्यांचा संगीताचा अभ्यासत्यांचा दानशूरपणात्यांनी जपलेले सामाजिक भान हे सगळे आपण पाहिले आणि ऐकले आहे. त्याबद्दल अनेकदा वाचलेही आहे. पण असा हा अष्टपैलू अवलियामाणूस म्हणून नेमका कसा होताया लाडक्या व्यक्तिमत्वाचे व्यक्तिगत आयुष्य नेमके कसे होतेयाबाबत फारसे कधी लोकांसमोर आलेच नाही. म्हणूनच भाई: व्यक्ती की वल्लीमधून पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्याचे अप्रकाशित पैलू प्रेक्षकांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.” महेश मांजरेकर यांनी चित्रपट निर्मिती मागील भूमिका स्पष्ट केली.
तरुण वयात प्रतिकूल परिस्थितीत पुलंनी घेतलेले उच्च शिक्षणचित्रपट व्यवसायात त्यांना आलेले अनुभवपत्नी सुनीता देशपांडे यांच्यासोबत आयुष्यभरासाठी जोडलेले भावबंध,आकाशवाणीमध्ये गाजवलेली कारकीर्दभीमसेन जोशी-कुमार गंधर्व- वसंतराव देशपांडे यांच्यासोबत जुळलेले सूरबाबा आमटे यांच्या आनंदवनातील समाजसेवा अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. साहित्यिक असूनही त्यांनी आयुष्यभर सामाजिक आणि राजकीय भान जपले. रंगभूमीवर त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली आणि ती लोकप्रियही झाली. जगप्रवासातून त्यांना एक व्यापक दृष्टी प्राप्त झाली. या सर्व अंगांचा वेध घेत पुलंच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्यातील माणूसपणाचा वेगळा आलेख मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे.
यामध्ये पु. ल. देशपांडेसुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरूबाळासाहेब ठाकरेबाबा आमटेभीमसेन जोशीदुर्गा भागवतवसंतराव देशपांडेकुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. या भूमिका साकारण्यासाठी प्रथितयश आणि अभ्यासू कलाकारांची निवड झालेली आहे. 

No comments:

Post a Comment