Thursday, 2 August 2018

एमईई ने केले...इंधन इंडिझेल लाँच...

माय इको एनर्जीकडून महाराष्ट्रात इंडिझेल लाँच
राष्ट्रीय बायो इंधन धोरण 2018 चे पालन करणारे एकमेव सेकंड जनरेशन ड्रॉप इन फ्यूएलइंडिझेल
2019 पर्यंत महाराष्ट्रात 300 हून अधिक आउटलेट्स सुरु केले जाणा
मुंबई,2 अॉगस्ट 2018: भारतातील नवीन रिन्यूएबल इंधन कंपनी असणार्‍या माय इको एनर्जी म्हणजेच एमईईने नुकतीच महाराष्ट्रात त्यांच्या क्रांतीकारी ठरु शकणार्‍या हरीत इंधन इंडिझेलच्या लाँचिंगची घोषणा केली. हे हरीत इंधन प्रिमियम तसेच पारंपारिक डिझेलसाठी पर्याय आहे. इंडिझेल हे एक अल्ट्रा प्रिमियम शाश्वत इंधन आहे ज्याची निर्मिती एमईईने केली आहे. हे भारतातील एकमेव रिन्यूएबल इंधन आहे, जे EN590 गुणवत्ता मानकासोबतच BS VI आणि युरो 6 उत्सर्जन नियमांचे पालन करते. EN590 सुसंगत इंडिझेल सर्व प्रकारच्या डिझेल इंजिन्समध्ये कोणत्याही इंजिन बदलाशिवाय किंवा मिश्रणाशिवाय वापरता येते.
मे 2018 मध्ये बायोइंधनाच्या राष्ट्रीय धोरणात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, इंडिझेल डिझेल इंजिन्सच्या ड्रॅाप इन फ्यूएल श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. ड्रॉप इन फ्यूएल हे असे पर्यायी इंधन असते जे संपूर्णपणे विशिष्ट पारंपारिक इंधनासाठी (प्रामुख्याने पेट्रोलियमपासून चालणारे) पर्यायी आणि सुसंगत ठरणारे असते. त्यासाठी इंजिनमध्ये कोणत्याही बदलाचीही आवश्यकता नसते. विशेष म्हणजे राष्ट्रीय बायोइंधन धोरणाने अशा प्रकारच्या प्रगत बायोइंधनाबाबत सुतोवाच करण्याआधीच एमईईने इंडिझेलची निर्मिती केली होती. यासाठी कठोर संशोधनानंतर तयार करण्यात आलेले सेकंड जनरेशन प्रगत ड्रॉप इन बायोइंधन डिझेल इंजिन्ससाठी वापरले जात होते.
या सुधारणेनंतर माय इको एनर्जी आता एमईई इंधन स्टेशन्सच्या माध्यमातून इंडिझेलची विक्री करण्याचे नियोजन करत आहे. ही स्टेशन्स महाराष्ट्रातील प्रमुख महामार्ग तसेच शहरांतील इतर प्रमुख रस्त्यांलगत सुरु केली जाणार आहेत. 2019 पर्यंत महाराष्ट्रात 300हून अधिक आउटलेट्स सुरु केले जाणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना माय इको एनर्जीचे सहसंस्थापक संतोष वर्मा यांनी सांगितले की, “राज्यातील अनेक प्रमुख शहरांचा श्वास हवेच्या वाढत्या प्रदुषणामुळे घुटमळत आहे. हे टाळण्यासाठी पर्यावरणाभिमुख आणि स्वच्छ इंधनाची नितांत गरज आहे, जी इंजिनच्या कार्यक्षमतेवरही प्रतिकूल परिणाम करणार नाहीत. इंडिझेल टेल पाईपचे उत्सर्जन 80 टक्क्यांहून कमी करत असल्यामुळे प्रदुषण तर कमी होतेच शिवाय इतर कोणत्याही प्रकारच्या डिझेलच्या तुलनेत इंजिनचे कार्यप्रदर्शन चांगले होत. त्यामुळे पैशांचीही बचत होते.  नवीन राष्ट्रीय बायोइंधन धोरणानुसार इंडिझेलसारख्या ड्रॉप इन इंधनाचा वापर आवश्यक बनत आहे. इंडिझेलसाठी पश्चिम भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात प्रचंड बाजारपेठ उपलब्ध आहे. हे लक्षात घेऊनच आम्ही महाराष्ट्रात आमचे क्रांतीकारी प्रोडक्ट लाँच केले आहे.  राज्यात 300 फ्रँचायजी ऑपरेटेड इंधन वितरण केंद्रे सुरु करण्याचे आमचे नियोजन आहे.”
 गेल्या 120 वर्षांपासून अधिक काळापासून डिझेल इंधनाबाबत कोणतेही नाविण्यपूर्ण संशोधन झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण जग आजही डिझेलवरच अवलंबून आहे, जे हवा प्रदुषीत करते, बेताचे कार्यप्रदर्शन करते आणि इंजिन खराब करण्याचे काम करत असते. माय इको एनर्जीचा क्रांतीकारी शोध असणारे इंडिझेल हे डिझेल, प्रिमियम डिझेल तसेच बायो डिझेलच्या फर्स्ट जनरेशनपुढील सर्व समस्यांना उपाय ठरु शकेल. इंडिझेल पारंपारिक डिझेलबरोबरच प्रिमियम तसेच फर्स्ट जनरेशनच्या सर्व बायोडिझेल्सना कार्य प्रदर्शन, बचत तसेच उत्सर्जन यामध्ये भारी पडते.
इंडिझेलची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे पुढीलप्रमाणे: 
• पारंपारिक डिझेलच्या तुलनेत सिटेनची अधिक संख्या असल्यामुळे इंडिझेलचे ज्वलन अधिक चांगल्या प्रकारे होते, त्यामुळे 25 टक्के चांगला टॉर्क आणि हॉर्सपॉवर तयार होते. त्यामुळे इंजिनची अनुकूलता अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येते. त्याची क्षमता वाढते, ओढाताण होत नाही, आवाज कमी होतो आणि अधिक पॉवर अनुभवता येते.
• डिझेलचे चांगल्या प्रकारे ज्वलन झाल्यामुळे इंधनाची रिकव्हरी वाढून कमीत कमी अवशेष शिल्लक राहतात. परिणामी प्रदुषणाचा स्तर घटण्याबरोबरच पैशांच्या बचतीसही मदत होते.
• लो कोल्ड फिल्टर प्लगींग पॉईंटमुळे, इंजिन उणे 12 अंश सेल्सीय इतक्या कमी तापमानातही इंजिन तितकेच प्रभावीपणे काम करते.
• हे अतिशय सुसंगत इंधन असल्यामुळे इंजीनमध्ये कोणताही बदल न करता हव्या त्या प्रमाणात वापरता येते.
• इंडिझेल पुनर्निर्मिती करता येण्यासारखे आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबीत्व कमी करता येते.
• इंडिझेल हे एक बायो इंधन असल्यामुळे ते जीएसटीच्या कार्यकक्षेत समाविष्ट होते. त्यामुळे नोंदणीकृत जीएसटी ग्राहकांना ते प्रतिलिटर 7 ते 8 रुपये इतक्या कमी किंमतीत खरेदी करता येते.
• एमईई इंधन स्टेशन पूर्णपणे स्वयंचलित आहे, आणि एमईई मोबाईल अ‍ॅपचा वापर करूनच त्या ठिकाणी इंधन भरता येईल. जे नॉझलनेच ओळखता येते.
• संपूर्ण स्वयंचलित इंधन स्टेशनमुळे इंधनाच्या प्रत्येक थेंबाचा दर्जा राखत हिशोब ठेवता येतो. लॉयल्टी ऑफर्समुळे येथे इंधन भरणे हा एक अतिशय आनंददायी अनुभव असतो.
इतकेच नव्हे तर ग्राहकांच्या सुविधेसाठी इंडिझेलने एओडी म्हणजेच मागणीनुसार उपलब्ध ही नाविण्यपूर्ण विक्री यंत्रणा राबवली आहे. एओडीच्या माध्यमातून घाऊक प्रमाणात इंडिझेलची खरेदी करणार्‍या ग्राहकांना अखंड पुरवठा केला जातो. एओडीचा वापर करुन उद्योजक त्यांच्या कामाच्या ठिकाणी चोवीस तास इंधन पुरवठ्यासाठी ऑन साईट इंधन पंपची मागणी करु शकतात. ही नाविण्यपूर्ण सुविधा विविध प्रकारच्या उद्योगांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहतूकदार, नौकानयन उद्योग, शेती आणि पशुधन, उत्पादन आणि ऑटोमोटीव, बांधकाम, खाणकाम आणि अनेक प्रकारचे व्यावसायिक एओडीचा लाभ घेऊ शकतात.
इंडिझेलविषयी :
इंडिझेल हे सेकंड जनरेशन एचबीडी म्हणजेच हायड्रोजनरेटेड बायो डिझेल आहे, जे अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आले असून ते भारतातील पारंपारिक डिझेलला पर्याय ठरत आहे. हे देशातील पहिले युरो 6 उत्सर्जन सुसंगत इंधन आहे. युरो 6 उत्सर्जन अटी बीएस 6 नॉर्म्सच्या तुलनेत खूप कठोर असून त्या इंधनाच्या ज्वलनाची आंतरराष्ट्रीय मानकानुसार तपासणी करते. इंडिझेल बायोइंधनाच्या फर्स्ट जनरेशनच्या तुलनेत खूप वेगळे असून राष्ट्रीय बायोइंधन धोरणाच्या सुधारीत ड्रॉप इन बायोइंधनात समाविष्ट होते. इंडिझेल हे उच्च दर्जाचे शाश्वत इंधन असून ते EN590 आणि बीआयएस 1460 म्हणजेच बीएस6 मानकाचे तसेच युरो 6 उत्सर्जन नॉर्मचे पालन करते. इंडिझेल तुमच्या वाहनाच्या इंजिनचे कार्यप्रदर्शन सुधारण्याबरोबरच पृथ्वीचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही मदत करते.
माय इको एनर्जी विषयी :(एमईई) माय ओन इको इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही आयएसओ 9001-2015 बायो ऑटोमोटीव इंधन कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून इंडिझेल ब्रँड नावाने डिझेल इंजिनसाठी  सर्वाधिक सुधारीत  बायोइंधन बनवले आहे. बीएस 6 आणि युरो6 उत्सर्जन नियमांचे पालन करणारे सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणारे हे एकमेव स्वच्छ इंधन आहे.

No comments:

Post a Comment