Friday, 10 August 2018

माय इको एनर्जी (एमईई)

एमईईकडून भारतातील पहिल्या संपूर्ण डिजीटलकृत फ्यूएल स्टेशन नेटवर्कचा महाराष्ट्रात शुभारंभ
पूर्णपणे स्वयंचलीतकॅशलेस आणि सेल्फ सर्विस पध्दतीने चालणार्‍या या फ्यूएल स्टेशनमधून होणार इंडीझेलचे वितरण.
नवी मुंबईतील खालापूरमधून प्रायोगिक स्वरुपात कार्यान्वित.
लवकरच दौंडपैठण आणि अहमदनगरमध्ये आणखी तीन स्टेशन्स सुरु करणार.
मुंबईदि. 10 ऑगस्ट 2018: भारतातील नवीन रिन्यूएबल इंधन कंपनी माय इको एनर्जी (एमईई) ने आज महाराष्ट्रातील खालापूरमधून प्रायोगिक स्वरुपात त्यांच्या पहिल्या फ्यूएल स्टेशनची सुरुवात केली. जुन्या मुंबई - पुणे महामार्गालगत हे स्टेशन सुरु करण्यात आले आहे. हे भारतातील पहिले संपूर्ण डिजीटलकृत फ्यूएल स्टेशन आहे जे ग्राहकांना गुणवत्ता आणि प्रमाण यांची संपूर्ण हमी देते. हे संपूर्णपणे कॅशलेस असून सेल्फ सर्विस पध्दतीवर काम करणारे आहे. एमईई फ्यूएल स्टेशन नेटवर्कच्या साखळीमधील हे पहिले आउटलेट आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून देशभरातील प्रमुख ठिकाणच्या डिझेल ग्राहकांसाठी इंडिझेलचे वितरण केले जाणार आहे.
एमईईकडून लवकरच आपल्या विस्तारासाठी आणखी 3 फ्यूएल स्टेशन्सची सुरुवात केली जाणार आहे. संपूर्ण समाधान देणारी ही फ्युएल स्टेशन्स पुढील ठिकाणी कार्यान्वित होतील. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचा साई सत्य पेट्रोलियमऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील श्रीराम फ्यूएल स्टेशनआणि पुणे जिल्ह्यातील दौंड येथील चैतन्य फ्यूएल स्टेशन. सर्व एमईई फ्यूएल स्टेशन्सप्रमाणे वर उल्लेख केलेल्या स्टेशन्सवर ग्राहकांना इंडिझेल भरण्याच्या स्वयंचलीत पध्दतीचा अनुभव घेता येईल आणि त्यांना प्रत्येक थेंबाचा हिशोब मिळेल. ग्राहकांना तिथे गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्हींची हमी बाळगता येईल. याशिवाय वैयक्तिकीकृत आणि प्राधान्यीकृत सेवा हे एमईईच्या फ्यूएल स्टेशन्सचे वैशिष्ट्य असेल. याशिवाय ग्राहक आपल्या फोनच्या माध्यमातून बिलींग तसेच वापर ट्रॅक करु शकतील. त्यामुळे इंधन भरणारे आणि ड्रायव्हर यांच्याकडून संगनमताने केले जाणारे गैरव्यवहार टाळता येणार आहेत.
एमईई फ्यूएल स्टेशनमधून इंडिझेल हे डिझेल इंजिन्ससाठी कंपनीचे प्रमुख रिन्युएबल इंधन विकले जाणार आहे. इंडिझेल हे एक अल्ट्रा प्रिमियम रिन्यूएबल इंधन आहेजे ईएन 590 गुणवत्ता प्रमाण आणि बीएस 6 तसेच युरो6 उत्सर्जन अटींचे पालन करते. ईएन 590 सुसंगत असल्यामुळे इंडिझेल सर्व प्रकारच्या डिझेल इंजिन्समध्ये कोणत्याही स्वरुपाच्या बदलाशिवाय किंवा कोणत्याही मिश्रणाशिवाय वापरणे शक्य होते. इंडिझेल हे भारतातील सर्वाधिक किफायतशीर आणि स्वच्छ इंधन आहे. पॉवरकार्य प्रदर्शन,मायलेजइंजिन आयुष्यकिफायतशीरपणा तसेच उत्सर्जनाच्या सर्व कसोट्यांवर इंडिझेल हे पारंपारिक डिझेल इंधन तसेच प्रिमियम डिझेलपेक्षा श्रेष्ठ ठरणारे आहे.
मे 2018 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय बायोफ्यूएल धोरणातील बदलानुसार इंडिझेल हे डिझेल इंजिन्सच्या ड्रॉप इन फ्यूएल श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. ड्रॉप इन फ्यूएल हे असे वैकल्पिक इंधन असते जे पारंपारिक स्वरुपाच्या इंधनाला (प्रामुख्याने पेट्रोलियम पदार्थांपासून मिळवलेल्या) पर्याय म्हणून वापरता येते. हे डिझेल इंजिनशी पुर्णपणे सुसंगत असल्यामुळे ते इंजिनमध्ये कोणत्याही स्वरुपाचा बदल न करताही वापर करु शकतो. राष्ट्रीय बायो फ्यूएल धोरणात अशा प्रकारच्या सुधारीत बायो फ्युएलचा समावेश होण्याआधीच एमईई ने इंडिझेलची निर्मिती केली होती. यासाठी एमईईने अतिशल सखोल असे संशोधन केले आहे. त्यामुळे डिझेल इंजिनांसाठी इंडिझेल सर्व सेकंड जनरेशन सुधारीत ड्रॉप इन बायो इंधनापेक्षा कितीतरी सरस ठरत आहे.
इंडिझेल ग्राहकांना सामान्य डिझेलच्या किंमतीतच उपलब्ध होणार असून जीएसटी नोंदणीकृत ग्राहकांना 12 टक्क्यांचा जीएसटी लाभ मिळणार आहे. त्यामुळे असे जीएसटी नोंदणीकृत ग्राहक प्रति लटरमागे 9 रुपयांची बचत करु शकतील. प्रारंभिक ऑफर म्हणून सर्वत्र इंडिझेल सामान्य डिझेलच्या किंमतीपेक्षा 2 रुपये इतक्या सवलतीच्या किंमतीत विकले जाणार आहे.
याबाबत माहिती देताना माय इको एनर्जीचे सहसंस्थापक संतोष वर्मायांनी सांगितले कीखालापूर तसेच इतर 3 ठिकाणी लवकरच सुरु होणार्‍या एमईई फ्यूएल स्टेशन्समुळे महाराष्ट्र इंधन क्षेत्रातील नवीन युगात प्रवेश करत आहे. ग्राहकांची काळजी आणि सुलभता लक्षात घेउन एमईई फ्यूएल स्टेशन्सचे डिझाईन बनवण्यात आले आहे. एमईई फ्यूएल स्टेशन नेटवर्क हे संपूर्णपणे डिजीटलकृतसंपूर्णपणे कॅशलेस तसेच प्रथमच ग्राहकांसाठी सेल्फ फ्युलिंग तंत्रज्ञानाचा समावेश केलेले आहे. एक उद्योजक म्हणून आम्हाला विश्वास वाटतो कीमहाराष्ट्रातील डिझेलचे ग्राहक आमच्या सुधारीत आंतरराष्ट्रीय इंधन अनुभवाचे तसेच इंडिझेलच्या माध्यमातून उच्च कार्यक्षमता प्रदान करणार्‍या इंधनाचे स्वागत करतील. पुढील काही आठवड्यांमध्ये इंडिझेलचे आणखी 3 फ्यूएल स्टेशन्स सुरु होणार असून वर्ष अखेरपर्यंत 42कार्यान्वित होतील. अशा प्रकारे पुढील प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील विस्तार आणखी रुंदावत जाणार आहे.
इंडिझेलविषयी
इंडिझेल हे सेकंड जनरेशन एचबीडी म्हणजेच हायड्रोजनरेटेड बायो डिझेल आहेजे अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आले असून ते भारतातील पारंपारिक डिझेलला पर्याय ठरत आहे. हे देशातील पहिले युरो 6 उत्सर्जन सुसंगत इंधन आहे. युरो 6 उत्सर्जन अटी बीएस 6 नॉर्म्सच्या तुलनेत खूप कठोर असून त्या इंधनाच्या ज्वलनाची आंतरराष्ट्रीय मानकानुसार तपासणी करते. इंडिझेल बायोइंधनाच्या फर्स्ट जनरेशनच्या तुलनेत खूप वेगळे असून राष्ट्रीय बायोइंधन धोरणाच्या सुधारीत ड्रॉप इन बायोइंधनात समाविष्ट होते. इंडिझेल हे उच्च दर्जाचे शाश्वत इंधन असून ते ईएन 590 आणि बीआयएस 1460 म्हणजेच बीएस 6 मानकाचे तसेच युरो 6 उत्सर्जन नॉर्मचे पालन करते. इंडिझेल तुमच्या वाहनाच्या इंजिनचे कार्यप्रदर्शन सुधारण्याबरोबरच पृथ्वीचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही मदत करते.
माय इको एनर्जी विषयी 
(एमईई) माय ओन इको इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही आयएसओ 9001:2015 बायो ऑटोमोटीव इंधन कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून इंडिझेल ब्रँड नावाने डिझेल इंजिनसाठी  सर्वाधिक सुधारीत  बायोइंधन बनवले आहे. बीएस 6 आणि युरो उत्सर्जन नियमांचे पालन करणारे सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणारे हे एकमेव स्वच्छ इंधन आहे

No comments:

Post a Comment