Saturday, 4 August 2018

तुझ्यात जीव रंगला मध्ये सखीचं पात्र अभिनेत्री रुचा आपटे करणार....

'राणा सांभाळून घेतो' - रुचा आपटे
टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'तुझ्यात जीव रंगलाया झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केलाराणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतातऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतोनुकतंच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेला ट्विस्ट म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजरआधीच राणा त्याच्या नंदिता वहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला राजी झाला आणि त्यात  मुलींपासून  हात लांब राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेच सखी आल्यामुळे त्याची पळापळ सुरु आहे.
सखीचं पात्र अभिनेत्री रुचा आपटे साकारत आहेराणाला मॅटवरील कुस्तीचे धडे देणारी सखी प्रेक्षकांनी पाहली आणि ही धाडसी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरलीराणाला कुस्तीचे सल्ले देताना ती राणाशी कठोरपणे बोलते वेळ पडली तर त्याचा अपमान देखील करते आणि तिचा हाच स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना भावलाया व्यक्तिरेखेसाठी रुचा मेहनत देखील घेतआहेनियमित व्यायाम आणि संतुलित आहार याच काटेकोर पालन रुचा करतेय.
रुचा हिने साकारलेल्या सखी या पात्राच्या एकंदरीत अनुभवाबद्दल सांगताना रुचा म्हणाली, "सखीही खूप प्रॅक्टिकल मुलगी आहेएक शहरी मुलगी जी राणाला मॅटवरील कुस्तीचे छक्केपंजेशिकवायला कोल्हापुरात आली आहेअशी भूमिका मी या आधी कधीही साकारली नाही आहेत्यामुळे ती माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे आणि मी या भूमिकेतून खूप शिकतेयमाझ्यादेहबोलीतून कुस्तीपटू साकारणं मी शिकतेयखूप कमी वेळात मी कुस्तीचं ट्रेनिंग घेतलं आणि तेसीन्समध्ये दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेनुकतेच मालिकेत दाखवल्याप्रमाणे मी राणाला तीन वेळा जमिनीवर पाडतेत्या सीनच्या वेळी राणाने मला सांभाळून घेतलंत्याला बऱ्यापैकी कुस्ती जमते आणि त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना तो मला सांभाळून घेतो."

No comments:

Post a Comment