Monday, 6 August 2018

माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर मालिका....

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर
 ‘रिलायन्सची फँटम फिल्म्स आणि मेघना गुलजार मालिका बनविणार 
मुंबई,०६ अॉगस्ट २०१८ःअनिल डीअंबानी यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स एंटरटेन्मेंटची फँटम फिल्म्स आणि नामवंत युवा दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी सर्वाधिक ‘लक्ष्य’ असलेले टॉप कॉप आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर व केस फाईल्सवर मूळ मालिका तयार करण्यासाठी करार केला आहेही मालिका श्रीमारिया यांचे नुभव आणि त्यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत हाताळलेल्या विविध प्रकरणांचे दस्तऐवज (केस फाईल्सया वर आधारित मालिकेचे नाव आणि टीव्ही वरील प्रसारण गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. तिचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहेत.
आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांनी १९८१च्या तुकडीमधून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली१९९३ मध्ये पोलीस उपायुक्त (वाहतूकया पदावर काम करताना त्यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा छडा लावला आणि पुढे मुंबई पोलीस दलात ते पोलीस उपायुक्त (गुन्हेआणि पोलीस सह-आयुक्त (गुन्हेम्हणून रुजू झालेमारिया यांनी २००३ मधील गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा उलगडा केला२००८ मध्ये मुंबईतील कुप्रसिद्ध २६/११ हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी मारिया यांच्याकडे सोपवण्यात आली आणि या प्रकरणातील एकमेव जिवंत दहशवादी अजमल कसाब याची उलटतपासणी व जबानी घेण्याचे तसेच या खटल्याचे यशस्वी अन्वेषण करण्याचे काम मारिया यांनी केले.
या संदर्भात बोलताना राकेश मारिया म्हणाले, “आयुष्याच्या त्या प्रवासाचा पुनःप्रत्यय घेणे ही खूप उल्हसित करणारी बाब आहेविशेषतः जेव्हा मेघना गुलजार यांच्यासारखी बुद्धिमान व संवेदनशील दिग्दर्शिका आणि ‘रिलायन्स एंटरटेन्मेंटच्या ‘फँटम फिल्म्स’ या गुणवान प्रॉडक्शन हाऊसकडे या सगळ्याचे सुकाणू असल्यावर हे सिंहावलोकन अधिकच उत्साहवर्धक होणार आहे. ‘रिलायन्स एंटरटेन्मेंटचे उपाध्यक्ष अमिताभ झुनझुनवाला म्हणाले, “राकेश मारिया या कायद्याची अंमलबजावणी आणि रक्षणासाठी झटून कार्य करणाऱ्या आपल्या काळातील सर्वात आदरणीय अशा अधिकाऱ्यासोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
मेघना यांच्या 'तलवारया २०१५ मध्ये आलेल्या चित्रपटाने परीक्षणाची जबरदस्त लाट निर्माण केली आणि प्रेक्षकांकडून त्याला कौतुकाचा उदंड प्रतिसाद मिळालात्यापाठोपाठ त्यांचा नुकताच मे २०१८ मध्ये आलेला चित्रपट म्हणजे 'राझी'. या चित्रपटाने देखील समीक्षकांची वाहवा मिळवलीशिवाय बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत मोठे व्यावसायिक यश देखील संपादित केले.
या घोषणेबद्दल बोलताना मेघना गुलजार म्हणाल्या, “श्रीराकेश मारिया यांच्या जीवनातील अनुभव आणि कायद्याची अंमलबजावणी व रक्षण करण्याची त्यांची पोलीस दलातील कारकीर्द हे आपला समाजशहरदेश तसेच भौगोलिक प्रांत यामधील गुन्हेगारी आणि दहशतवादाचा कालक्रम उलगडण्यासाठीची उत्कृष्ट दूरक्षेप आहेतया सहयोगाबाबत बोलताना ‘फँटम फिल्म्सच्या मधु मंटेना म्हणाल्या, “फँटम फिल्म्स ही कायमच दिग्दर्शकाची कंपनी म्हणून काम करत आली आहेश्रीराकेश मारिया यांच्या सुविख्यात कारकिर्दीवर मालिका बनविण्यासाठी मेघनाबरोबर सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद आणि उत्साह वाटतो आहे.
''या मालिकेला ‘क्वान’ (KWAN)चे पाठबळ मिळाले आहे

No comments:

Post a Comment