प्रेमाचा अनोखा रंग दाखविणारा ‘प्रीतम’ चित्रपटगृहात

प्रेम ही भावनाच मनात तरंग उमटवणारी आहे. आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमात पडतोच. आपलं कुणीतरी असणं’…त्या आपल्या प्रेमाच्या माणसासाठी काहीही करणंत्यात स्वत:ला विसरून जगणंया  साऱ्या गोष्टींतून मोरपंखी प्रेमाच्या नात्याचा रेशमीबंध आपसूकच विणला जातो. असं म्हणतात, ‘प्रेमाला वय नसतंप्रेमाला रंग नसतोप्रेमाला फक्त भावनेचा गंध असतो’. प्रेमभावनेचा हा वेगळा रंग आणि त्या नात्यातील नाजूक रेशीमबंध उलगडून दाखवणारा प्रीतम हा मराठी चित्रपट १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘अॅड फिल्ममेकर’ दिग्दर्शक सिजो रॉकी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विझार्ड प्रोडक्शनच्या बॅनरखाली प्रीतम चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे.

प्रेम ही भावना कालातीत आहे पण त्याचा आविष्कार वेगवेगळा असू शकतो. प्रेमाचे सूर कधी आणि कोणासोबतही जुळू शकतात. प्रीतम चित्रपटातील कहाणी अशाच दोन प्रेमीयुगलांची आहे. सौंदर्याचे काही एक निकष आपल्याकडे ठरले आहेत पण त्यापलीकडे प्रेमाचा खरा रंग त्यातील सच्चेपणाचा अनोखा बंध उलगडणारी हृद्यस्पर्शी प्रेमकहाणी म्हणजे प्रीतम हा चित्रपट. रंगरूपापलीकडचा प्रेमभावनेचा वेगळा अर्थ प्रीतम आणि सुवर्णाच्या प्रेमकथेतून हा चित्रपट मांडतो.

कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेमकथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी पहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमयेअजित देवळेविश्वजीत पालवसमीर खांडेकरआभा वेलणकरशिवराज वाळवेकरअस्मिता खटखटेनयन जाधवआनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. वाटा-आडवाटांवरचे निसर्गसौंदर्यविस्तीर्ण व मनाचा ठाव घेणारे सागरकिनारे अशी कोकणातील विविध मनोहारी लोकेशन्स प्रीतम चित्रपटातून दिसणार आहेत. सोबत सुमधूर गीतसंगीताचा सुरेल नजराणा या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे.

शुक्रवार १९ फेब्रुवारीला प्रीतम आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार