वेब विश्वात दिग्दर्शक तेजस लोखंडे पदार्पण

दिग्दर्शक तेजस लोखंडे करणारं वेब विश्वात पदार्पण

सध्या वेब सिरीज पाहणारा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी डिजीटलकडे आपला मोर्चा वळवला आहे. आता दिग्दर्शक तेजस लोखंडे मालिकेनंतर डिजीटल क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. तसेच वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचे फोटो तो सोशल मिडीयावर शेअर करताना दिसतो. या वेबसिरीजची निर्मिती 'चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट', 'चंद्रप्रकाश यादव' आणि 'प्रशांत सावंत' हे करत आहेत. तर शिवराज सातार्डेकर हे डिओपी आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. 
दिग्दर्शक 'तेजस लोखंडे' याने मराठी नव्हे तर हिंदी मालिकांचेही दिग्दर्शन केले आहे. त्याने आजवर अंजली, दुहेरी, नकळत सारे घडले अश्या लोकप्रिय मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तर सास बिना ससुराल, फिरंगी बहू, छन छन अश्या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तेजसने मस्ती म्युझिक चॅनेलमध्ये 'चॅनेल दिग्दर्शक' म्हणून कार्यभारही सांभाळला आहे. तसेच त्याने ड्रिमींग ट्वेंटी फोर सेव्हन आणि ऑप्टिमिस्टीक्स अश्या बड्या प्रॉडक्शन हाऊसचे अनेक प्रोजेक्ट देखील केले आहेत. 
दिग्दर्शक 'तेजस लोखंडे' डिजीटल पदार्पणाविषयी सांगतो, ''मला वेबसिरीजचे दिग्दर्शन करण्याची इच्छा होती आणि त्याच दरम्यान माझ्याकडे सस्पेन्स थ्रिलरची स्क्रिप्ट आली आणि मी वेबसिरीज करण्याचे ठरवले.  तसेच शुटिंग दरम्यान मला नविन गोष्टी शिकता आल्या.''

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार