ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या सेटवर भुट्टा पार्टी

झी युवा वरील लोकप्रिय मालिका ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने नुकताच ४०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. त्यामुळे त्यांना मालिकेप्रमाणेच वैयक्तिक स्तरावर देखील प्रेक्षक आणि चाहत्यांकडून तितकीच पसंती मिळतेय. सोशल मीडियावर देखील त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
हे कलाकार ऑन-स्क्रीन तसेच ऑफस्क्रीन देखील धमाल करत असतात. नुकताच या मालिकेच्या सेटवर कलाकारांनी भुट्टा पार्टी केली. कलाकार आणि संपूर्ण टीम गरमागरम भुट्ट्यावर ताव मारताना दिसली. शूटिंगच्यामध्ये चमचमीत-चटकदार भुट्ट्याचा आस्वाद घेण्याची मजाच काही वेगळी आहे आणि या भुट्ट्यावर ताव मारतानाचा एक झकास फोटो नचिकेत म्हणजेच अभिनेता निखिल दामले याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या भुट्टा पार्टीला प्रेक्षकांनी देखील सोशल मीडियावर भरगोस प्रतिसाद दिला आहे.    

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार