सुदीप साहिर फिटनेस सिक्रेट्सबाबत सांगताना म्हणाला, ''फिटनेस मला शांतचित्त, आनंदी व स्वास्थपूर्ण भावना देते''

  1. तुझ्या मते फिटनेस म्हणजे काय?

फिटनेस माझ्यासाठी जीवन आहे आणि यामधून मला खूप आनंद मिळतो. मला अधिक वजन न वाढवता तंदुरूस्त राहायला आवडते. जवळपास १० वर्षांपासून ही माझी जीवनशैली राहिली आहे. पूर्वी, मी कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करायचो नाही आणि जंक फूडचा मनसोक्तपणे आस्वाद घ्यचो. मी फक्त एकच समोसा नाही, तर किमान ४ समोसे खायचो. आता, फिटनेस माझ्यासाठी आवश्यक बनले आहे. यामधून मला शांतचित्त, आनंदी व स्वास्थ्यपूर्ण भावना मिळते.

  1. तू तुझे मन व शरीरामध्ये आरोग्यदायी संतुलन कशाप्रकारे ठेवतोस?

मी अधिक विचार न करणारा व्यक्ती आहे. माझा विश्वास आहे की घडणारी गोष्ट घडतेच. याचप्रकारे मी माझे मन तंदुरूस्त व प्रसन्न ठेवतो. माझ्या शरीरयष्टीसाठी मी सर्वकाही, पण योग्य प्रमाणात आणि दर २ ते ३ तासांनी खातो. 

  1. तुझे आव्हानात्मक व व्यस्त नित्यक्रम पाहता तू कशाप्रकारे तंदुरूस्त राहतोस आणि आरोग्यदायी जीवशैली ठेवतोस?

मी ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, कॉफी, फळे यांसाठी घरातून बनवलेले पदार्थ सोबत ठेवतो. पूर्वी, माझा ड्रायव्हर असताना देखील मी नेहमीच डोमॅस्टिक विमानतळावर उतरायचो आणि घरी चालत यायचो. मी जरादेखील वेळ वाया न घालवता व्यायाम केल्यानंतर माझ्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करायचो.

  1. तुझा व्यायामाचा नित्यक्रम काय आहे?

मी जिममध्ये जात नाही. मी आरशामध्ये पाहून व्यायाम करू शकत नाही, कारण मला ते खूपच कंटाळवाणे वाटते. मी नेहमीच रनिंगला प्राधान्य देतो. रनिंग करताना मला खूप आनंद मिळतो. माझ्या शूटिंगनंतर आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा मी धावत घरी परत जातो. मी माझे रनिंग गिअर सोबतच ठेवतो, ज्यामुळे मी कार पार्क केल्यानंतर घरी रनिंग करतच परततो.

तसेच, मी माझ्या मुलासोबत देखील व्यायाम करतो. मी त्याला चालायला घेऊन जातो, कधी-कधी आम्ही आमच्या घराच्या टेरेसवर जाऊन व्यायाम करतो. यामुळे मला त्याच्यासोबत अधिक वेळ व्यतित करायला मिळतो.

  1. तुझ्या भूमिकांसाठी तंदुरूस्त राहणे आवश्यक आहे का?

कधी-कधी ते आवश्यक आहे. मालिका 'तेरा यार हूं मैं'पूर्वी मी एका मालिकेमध्ये भगवान कृष्णची भूमिका साकारत होतो. त्या भूमिकेसाठी पोट सपाट व देहबोली सुव्यवस्थित असण्याची, शक्तिशाली नाही, पण दैवी लुकला साजेसा लूक असणे आवश्यक होते. म्हणूनच, मला वेगळ्या प्रकारचा व्यायाम करावा लागला, ज्यामध्ये वेटलिफ्टिंग व रनिंगचा समावेश होता. पण, सोनी सबवरील मालिका 'तेरा यार हूं मैं'मध्ये राजीवच्या भूमिकेसाठी मी पाहिजे ते खाऊ शकतो, भूमिकेसाठी योग्य शरीरयष्टी असण्याची गरज नाही. तसेच मी या भूमिकेसाठी कृत्रिम पोट देखील लावले आहे. मी सुस्त असू शकतो, पण मी योग्य प्रमाणात खाण्याची आणि आरोग्यदायी जीवनशैली राखण्याची काळजी घेत आहे. 

  1. तु्झ्या व्यस् वेळापत्रकामध्ये तू कोणत्या आरोग्यदायी स्नॅकचे सेवन करतोस?

मला मक्खन खायला आवडते. मी माझ्यासोबत ड्रायफ्रूट्सचा डबा ठेवतो, ज्यामध्ये काजू, अक्रोड व बदाम असतात. माझ्या गोड चवीसाठी क्रॅनबेरीजचा डबा देखील असतो. मी दररोज दुपारच्या जेवणानंतर ते सेवन करतो. मी एक असा व्यक्ती आहे, जो एखादी गोष्टी सलग ६ महिने करू शकतो. उदाहरणार्थ, माझ्याकडे ६ महिन्यांसाठी बेसन का चीला असेल आणि ज्यादिवशी मला ते आवडणार नाही, त्या दिवसापासून वर्षभर माझ्याकडे ते कधीच दिसणार नाही.

  1. एखादा पदार्थ, ज्याचा आस्वाद घेतल्याशिवाय तू राहू शकत नाहीस.

ते म्हणजे आंबे. मला माहित आहे की आंबे गोड असण्यासोबत त्यामुळे वजन वाढते, पण मी आंबे खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही.

  1. तुला व्यायाम करताना कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायला आवडते?

व्यायाम करताना मला आनंदित करणारे कोणतेही संगीत ऐकायला आवडते. ते भांगडा असू शकते, इंग्रजी गाणे असू शकते किंवा आनंद देणारे कोणतेही गीत. मला एखादे गाणे आवडले की मी ते ऐकतच राहिन.

  1. तुला तंदुरूस्त राहण्यास कोणती गोष्ट प्रेरित करते?

फक्त तंदुरूस्त राहण्याचा आणि सपाट पोट असण्याचा विचार (हसतो). पोशाख परिधान केल्यानंतर शरीरयष्टी सुरेख दिसेल तर तुम्हाला चांगले वाटते आणि हीच गोष्ट मला तंदुरूस्त राहण्यासाठी प्रेरित करते.

  1. तुझ्या चाहत्यांसाठी फिटनेससंदर्भात एखादा सल्ला?

काहीही होवो, वेळात वेळ काढून ३० ते ४० मिनिटे चालणे किंवा धावणे पुरेसे आहे. मी केलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मी माझ्या कॉफीमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करतो आणि दिवसाला ४ कपांऐवजी २ कप कॉफी सेवन करतो.

मला गोड पदार्थ खायला आवडतात. असे असले तरी मी संपूर्ण आठवडाभर गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवले आहे. मी फक्त शनिवारीच गोड पदार्थ खातो. यामुळे मला माझे वजन कमी करण्यास मदत झाली आहे आणि गोड पदार्थांप्रती माझी आवड देखील कमी झाली आहे. मी संपूर्ण आठवडाभर स्वत:वर नियंत्रण ठेवत शनिवारीच गोड पदार्थ खातो आणि त्यानंतर मी आणखी एका नियंत्रित आठवड्याच्या दिशेने वाटचाल करतो.

सुदीप साहिरला राजीवच्या भूमिकेत पहा 'तेरा यार हूं मैं'मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सबवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार