चिन्मयी साळवी रुपेरी पडदयावर

तू माझा सांगाती’, छोटी मालकीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला अशा मराठी मालिकांमधून आणि आता वागले की दुनिया या हिंदी मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री चिन्मयी साळवी आता मराठी रुपेरी पडदयावर पदार्पण करणार आहे. आगामी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटामध्ये तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे.

येरे येरे पावसा या चित्रपटात अंजली ही व्यक्तिरेखा चिन्मयी साकार आहे. चित्रपटातील माझ्या भूमिकेला प्रेमाची वेगळी किनार आहे, जी प्रत्येकाला स्पर्शून जाणारी असेल, असं ती सांगते. कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना चित्रपटातील या भूमिकेसाठी मला विचारणा झाल्याचं ती सांगते. प्रत्येकाला चित्रपटाच्या माध्यमातून मोठया पडदयावर काम करायची इच्छा असते. येरे येरे पावसा’च्या निमित्ताने माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना काही तरी सांगू पाहणारा हा चित्रपट प्रत्येकाने नक्की पहायला हवा असं ती सांगते.

नृत्यनिपुण आणि अभिनयाची आवड असणाऱ्या चिन्मयीने दूरदर्शन वाहिनीवरील ‘दम दमा दम’, ई टीव्ही मराठी वाहिनीवरील फूल टू धमाल, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ यासारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारत आपला वेगळा ठसा उमटवला होता.

येरे येरे पावसा या चित्रपटात चिन्मयी सोबत छाया कदममिलिंद शिंदेसंदेश जाधव,  विनायक पोतदारआर्या आढावप्रदीप नवलेप्राजक्ता वाड्येवैभव जेऊघाले पाटीलहृषीकेश करळेनकुल चौधरीवैष्णवी रानमाळेउत्कर्ष करळेअचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.

एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहानसुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खानभूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकरविनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवारकिशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड झाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार