‘मीडियम स्पाइसी’ येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

'मीडियम स्पाइसीसाठी ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर यांनी घेतले शेफ बनण्याचे प्रशिक्षण

मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकृती मधून काहीतरी वेगळे देणारे तरुण आणि बहुआयामी कलाकार म्हणजे ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर.

'मीडियम स्पाइसीया चित्रपटात ललितने 'निस्सीमतर सईने 'गौरीही भूमिका साकारली आहे आणि ते दोघेही एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ आहेतआपल्या अभिनयातून प्रत्येक भूमिकेला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली आहेशेफची भूमिका मोठ्या पडदयावर अगदी वास्तवदर्शी दिसण्यासाठी ललित आणि सईने बराच काळ एका हॉटेलमध्ये स्वतः काम केले आणि कामाच्या विविध गोष्टीदेहबोली  भावमुद्रा समजून घेतल्याया भूमिकेतील बारकावे दर्शविण्यासाठी कटिंगसिजनिंगचॉपिंगकुकिंगटॉसिंगप्रेझेंटिंगऑर्डरींग अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि लाईव्ह किचनमध्ये कामसुद्धा केलेया दोघांनी घेतलेल्या या मेहनतीची झलक दाखवणारे व्हिडीओज् चित्रपटाच्या टीमने नुकतेच सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.

विधि कासलीवाल निर्मितइरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकरललित प्रभाकरपर्ण पेठेसागर देशमुखनेहा जोशीपुष्कराज चिरपुटकरइप्शिता यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या प्रमुख भूमिका आहेतलॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

हे व्हिडीओज् पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा :

https://www.youtube.com/watch?v=8uS9EppVKcg

https://www.youtube.com/watch?v=sFcC5motyWg

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार