मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुशील आय केअर–डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल, नाशिक युनिटच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन
महाराष्ट्रातील नेत्रसेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज (१ जून) कॉलेज रोड, नाशिक येथील सुशील आय केअर–डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल येथील अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन केले. यावेळी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिन साजरा करतांना वर्षभराच्या यशस्वी प्रवासाचा लेखाजोखा मांडला. नाशिक व नजीकच्या जिल्ह्यांतील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा देण्याच्या धेय्याला हा प्रवास अधोरेखीत करत असल्याचे नमूद केले.
नव्याने अवगत केलेल्या ओटी फ्लोअर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधातरीत व पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. येथे मोतीबिंदू, रेटिना, कॉर्निया, ग्लॉकोमा व रेफ्रॅक्टिव्ह अशा उच्च दर्जाच्या कौशल्यपूर्ण नेत्रशस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
उद्घाटनाप्रसंगी डॉ. शरद पाटील, प्रमुख, क्लिनिकल सर्व्हिसेस, सुशील आय केअर, डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल म्हणाले, " आमचा नवीन शस्त्रक्रिया विभाग हा नाशिकमध्ये दर्जेदार नेत्रसेवेच्या वाढत्या गरजांना पूर्ण करण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या सुविधेमुळे आम्ही अधिक अचूकतेने व कार्यक्षमतेने जागतिक दर्जाचे नेत्र उपचार देऊ शकतो. गेल्या एका वर्षात, आमच्या हॉस्पिटलने हजारो रुग्णांच्या जीवनात बदल घडविला असून, या विस्तारासह आम्ही सर्व प्रकारच्या नेत्रसेवा अधिक प्रभावीपणे पुरवण्यास सज्ज झालो आहोत."
श्री. राहुल अगरवाल, सीओओ, डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल म्हणाले, "महाराष्ट्र हे आमच्यासाठी एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे, व या ऐतिहासिक प्रसंगी माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले, हे आमच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. केवळ एका वर्षात, आमची नाशिक शाखा एक प्रमुख व विश्वासार्ह नेत्रसेवेचा केंद्र बनली आहे. हा नवीन शस्त्रक्रिया विभाग म्हणजे या क्षेत्रातील वैद्यकीय उत्कृष्टतेसाठी व पायाभूत सुविधांसाठी केलेली आमची गुंतवणूक आहे."
हा कार्यक्रमाप्रसंगी अनेक वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यातून महाराष्ट्रामध्ये प्रगत व सुलभ नेत्रसेवेच्या उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
Comments
Post a Comment