पंजाब नॅशनल बँक
अतुल कुमार गोयल यांनी पीएनबीचे विशेष कार्यधिकारी (ओएसडी) म्हणून पदभार स्वीकारला
अतुल कुमार गोयल 1 फेब्रुवारी 2022 पासून पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील
मुंबई : अतुल कुमार गोयल यांनी पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) विशेष कार्यधिकारी (ओएसडी) म्हणून पदभार स्वीकारला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक अतुल कुमार गोयल यांनी पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) विशेष कार्यधिकारी (ओएसडी) म्हणून पदभार स्वीकारला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने ही माहिती दिली. अतुल गोयल पुढील महिन्यापासून पीएनबीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) म्हणून पदभार स्वीकारतील.
28 डिसेंबर 2021 रोजी वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, गोयल यांनी 1 जानेवारीपासून बँकेचे ओएसडी म्हणून पदभार स्वीकारला.
माहितीनुसार, अतुल कुमार गोयल एस एस मल्लिकार्जुन राव यांच्या जागी 1 फेब्रुवारी 2022 पासून पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील.
Comments
Post a Comment