यंदा हरित अवलंबनासह साजरा करा रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने
यंदा सणासुदीच्या काळात शाश्वत भेटवस्तूंचा अवलंब करा
तुम्हाला जयपोर, फॅबइंडिया, गुडअर्थ येथे अनेक शाश्वत पर्याय मिळू शकतात
राखी म्हणून ओळखला जाणारा रक्षाबंधन हा उत्साहपूर्ण सण आहे, जो भावा-बहिणींमधील प्रेम व जबाबदारीच्या नात्याला सन्मानित करतो. ही सुरेख परंपरा जैविक नात्यांपलीकडे जात सर्व लिंग, धर्म व जातीच्या लोकांना एकत्र आणते आणि प्रेमळ नात्याच्या विविध स्वरूपांना साजरे करते.
आपण यंदा सणासुदीच्या काळात प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यास सज्ज असताना आपल्या भेटवस्तू देण्याच्या पद्धतीबाबत पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. पारंपारिकरित्या, रक्षाबंधनला अनेक भेटवस्तू दिल्या जातात, ज्या कदाचित पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबाबत वाढत्या जागरूकतेशी संलग्न नाहीत. ज्यामुळे, यंदा भावा-बहिणींमधील नाते दृढ करण्यासोबत आपल्या भूमातेच्या कल्याणावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या भेटवस्तूंना प्राधान्य देऊया.
पाच शाश्वत भेटवस्तू संकल्पना
1) हस्तनिर्मित वस्तू - नैसर्गिक किंवा रिसायकल केलेल्या साहित्यांपासून बनवलेल्या कलात्मक उत्पादनांची निवड करा. हाताने विणलेल्या कापडांपासून घराच्या सजावटीसाठी आकर्षक वस्तूंपर्यंत या भेटवस्तूंमधून विचारशीलता व टिकाऊपणा दिसून येतो. तुम्हाला जयपोर, फॅबइंडिया, गुडअर्थ येथे अनेक शाश्वत पर्याय मिळू शकतात.
2) इको-फ्रेण्डली पर्सनल केअर - नैसर्गिक साहित्य आणि किमान पॅकेजिंग असलेली पर्सनल केअर उत्पादने भेट म्हणून द्या, जसे ऑर्गनिक साबण, बांबू टूथब्रशेस् किंवा टिकाऊ स्किनकेअर सेट्स.
3) ग्रीन ट्रॅव्हल - अद्वितीय व कधीच विचार न केलेला पर्याय, तुमच्या बहिणीला पर्यावरणावर कोणताही प्रतिकूल परिणाम न करता देशभरातील तिच्या आवडत्या गंतव्यांचा आनंद देण्यासाठी न्यूगो (NueGo) प्रवास भेट द्या.
4) इलेक्ट्रिक स्कूटर्स - इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बहिणीसाठी सर्वोत्तम गिफ्ट ठरू शकते, जेथे ती दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करू शकते. अॅम्पियर व्ही४८, ओडीसी स्नॅप, हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश, अॅम्पियर रिओ अशा टॉप इलेक्ट्रिक स्कूटर्समधून निवड करता येऊ शकते.
5) अद्वितीय गोष्टींचा अनुभव - अद्वितीय गिफ्टिंग अनुभवांची निवड करा जसे कूकिंग क्लास, वर्कशॉप किंवा कम्युनिटी गार्डनचे सदस्यत्व, जे दीर्घकालीन आठवणी निर्माण करतात आणि सामग्रीचा वापर कमी करतात.
यंदा रक्षाबंधनला एकत्र या आणि पर्यावरणाची अधिक काळजी घेत आपल्या भावंडांसोबतच्या नात्याला साजरे करा. शाश्वत पर्यायांची निवड करत आपण प्रियजनांचा सन्मान करण्यासोबत आपल्या पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव निर्माण करू शकतो
Comments
Post a Comment