'सुपरस्टार सिंगर' रंगणार सोनी मराठीवर
'सुपरस्टार सिंगर' रंगणार सोनी मराठीवर
अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा
महाराष्ट्रातील नव्या दमाच्या युवा गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, संगीताचा 'सुरेल' नजराणा
‘ताल, लय आणि सूर यांची बहारदार मैफिल रंगणार कारण, अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा’ ‘सुपरस्टार सिंगर’ अशा टॅग लाईनसह आलेल्या या धमाकेदार का
सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना दिले आहेत. 'सुपरस्टार सिंगर' हा असाच एक नवा कार्यक्रम त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. आपल्याकडे उत्तम प्रतिभा आहे, फक्त या गुणी हिऱ्यांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.'सुपरस्टार सिंगर' या माध्यमातून सोनी मराठी वाहिनीने अशा गुणवान प्रतिभावंतासाठी ही संधी उपलब्ध केली आहे.
तुमच्या गाण्याच्या प्रतिभेला हवा असेल वाव तर आपल्या सुरेल आवाजातील ऑडिशन्स जरूर पाठवा. संगीत क्षेत्रातील दिग्गज परिक्षक, अनुभवी मार्गदर्शक यांना सोबत घेऊन सुरू होणारा हा सूरमयी प्रवास कोणासोबत असणार ? याची उत्सुकता अजून काही दिवस असणार आहे 'सुपरस्टार सिंगर’ हा हिंदी रिअॅलिटी कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे याच्या मराठी पर्वाची देखील तितकीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्या घरात असेल असा उद्याचा आवाज तर त्यांना ही लगेच सांगा ऑडिशन्स द्यायला. १० ऑगस्टपासून ते २४ ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ऑडिशन्स पाठवू शकता.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह च्याhttps://www.sonyliv.com/dplnk?
Comments
Post a Comment