'फौजी’ चित्रपटात सौरभ आणि प्राजक्ताची जोडी जमली

 'फौजी’ चित्रपटात सौरभ आणि प्राजक्ताची जोडी जमली

मराठी चित्रपटामध्ये वेगळ्या विषयांसोबतच आजकाल नायक-नायिकेच्या अनोख्या जोड्याही पहायला मिळतात. चित्रपटेच्या कथेसोबत हल्ली फ्रेश जोडी ही तितकीच महत्त्वाची ठरू लागली आहे हे  लक्षात  घेऊनच दिग्दर्शक नव्या जोड्यांना प्राधान्य देऊ लागले आहेत. मराठी रुपेरी पडद्यावर अशीच आणखी वेगळी एक जोडी लवकरच पहायला मिळणार आहे. ती जोडी आहे सौरभ गोखले आणि प्राजक्ता गायकवाडची. ‘फौजी’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित.. घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे प्रथमच एकत्र आले असून देशभक्तीची  पार्श्वभूमी असलेल्या ‘फौजी’ चित्रपटात वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणं हे खरंच आम्हाला सुखावणारी बाब असल्याचे दोघं सांगतात.‘पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. एकमेकांच्या भूमिका आणि त्या भूमिकांची गरज ओळखत आम्ही काम केल्यामुळे आम्ही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो’ अशा भावना  या दोघांनी  व्यक्त केल्या.  

आपले सैनिक हातात बंदूक घेऊन कायम आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात, तेदेखील कोणताही स्वार्थ न ठेवता. अशा निडर सैनिकांचा जीवन प्रवास  या  चित्रपटात  मांडण्यात आला आहे. 

या दोघांसोबाबत अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे,अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात आहेत.

चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे आहेत. सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांचे आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकर, डॉ. शंकर तलबे, उद्धव गावडे, अशोक गाढे, राजेश चव्हाण, गणेश गुंजाळ, एस.पी. गावडे, ज्योतीराम घाडगे, कुमार परदेशीं, राजेंद्र कर्णे, प्रविण बुरुंगे याचे आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..