टॅफ़े
टॅफ़ेने भारतातील मॅसे फ़र्ग्युसन ब्रॅन्डचा योग्य तो मालकी हक्क सांगितला; एजीसीओ (AGCO) चा विरोधात कोर्टात याचिका दाखल.
· एजीसीओ(AGCO’s) चा दाव्यांचे खंडन केले
· टॅफ़ेची ६५ वर्ष- मॅसे फ़र्ग्युसनचा ग्राहकांना स्थिर सेवा
· २ दशलक्षा पेक्षा अधिक टॅफ़ेने डिझाईन केलेली एमएफ़ ट्रॅक्टर्स
मुंबई : १९६० साली सुरवात झाल्यापासून, टॅफ़ेने मॅसे फ़र्गुसन ब्रॅन्डकरिता सखोल संशोधन आणि विकास विभागासह गुणवत्ता नियंत्रणाचा माध्यमाने भारतातील बाजारपेठेकरिता ५०० पेक्षा अधिक मॅडेल्सची निर्मीती, रचना आणि काळजी घेण्याचे काम केले आहे. एकूण वार्षिक उत्पादनाचा विचार केला तर १८०,००० ट्रॅक्टर्स आणि १००,००० पेक्षा अधिक मॅसे फ़र्ग्युसनचा उत्पादनांची निर्मीती टॅफ़े द्वारे भारतात करण्यात येत आसून या मध्ये ३ दशलक्ष समाधीनी ग्राहकांची साथ आम्हाला मिळाली आहे. भारतात टॅफ़े आणि मॅसे फ़र्ग्युसन यांना हातात हात घालून नेहमीच एकत्र बघितले गेले आहे.
भारतात टॅफ़े क्रमांक दोनचा सर्वात मोठा उत्पादक असून जगातील तीसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे, ज्यांनी स्वत:ची एक ओळख आणि छाप तर निर्माण केलीच आहे पण त्याही पलिकडे जाऊन भारतासह इतर ८० आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतकऱ्य़ंचा विश्वास आणि उत्पादनांप्रती विशेष विशवसनीयता निर्माण केली आहे. टॅफ़ेला असंख्य असे प्रगतीसाठीचे पुरस्कार आणि पार्ट सप्लाय साठी समाधानाची थाप ही ग्राहक, उद्योग क्षेत्र, प्रसार माध्यम आणि शासनाकडून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर गुणवत्ता आणि ग्राहकांचा समाधानाकरिता मिळाली आहे.
टॅफ़ेची उत्पादने ही भारत-केंद्रित रचनांवर आधारीत असतात, विशेषत: एजीसीओ (AGCO’s) च्या उत्पादानांपासून वेगळी तसेच खास करून भारतासह जगभरातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांकरिता सुयोग्य ठरतील अशी असतात. एजीसीओ (AGCO’s) जागतिक ब्रॅन्डचा संकेतस्थळाने १९६० सालापासून टॅफ़ेने मॅसे फ़र्ग्युसनला टेक ओव्हर केल्यानंतर ऐतिहासिक पद्धतीने सहा दशकात भारत, नेपाळ आणि भूतानचा अनुषंगाने उल्लेख देखील केलेला नाही.
टॅफ़ेने एजीसीओ(AGCO) कॉर्पोरेशनमध्ये आपले शेअर्स २०१२ सालापासून घेतले आणि आता तो सर्वात मोठा शेअर होल्डर आणि धोरणात्मक दीर्घ-कालीन गुंतवणूकदार बनला आहे. यामुळे कंपन्यांचा एकत्रित नात्यांना अधिक बळ मिळाले आहे, आणि टॅफ़े आणि एजीसीओ (AGCO) ने “करारनाम्याचा पत्रावर” स्वाक्षरी केली ज्यामुळे गेल्या दशकामध्ये एजीसीओ(AGCO) ला स्थिर समर्थनाची हमी मिळाली.
एजीसीओ (AGCO) चा कॉर्पोरेट कार्यकारीणीमधील त्रुटी, भागधारकांसोबत पूर्णत: अपुरी सहभागिता आणि प्रमुख क्षेत्रांमधील आर्थिक आणि कार्यकारी कामगिरी आणि एजीसीओ (AGCO ) चा वारंवार लक्ष वेधणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्या ऐवजी टॅफ़ेचा धोरणात्मक प्रभाव वाढल्याने एजीसीओ (AGCO ) ने टॅफ़ेची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न केला. सहा दशकांपेक्षा अधिक काळ निर्विवाद या क्षेत्रात राहिलेल्या ब्रॅन्डचा वापरासंदर्भात वादग्रस्त आणि चुकीचा सल्ल्याने पाऊले उचलली गेली.
टॅफ़ेने मालकी हक्कावरती आपला दावा केला असून मॅसे फ़र्ग्युसन ब्रॅन्डचा मालकी संदर्भात मद्रास उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे. चेन्नईचा व्यावसायिक न्यायालने टॅफ़ेचा बाजूने निकाल दिला असून मॅसे फ़र्ग्युसन ब्रॅन्डचा विरोधात स्थगिती दिली आहे; या संदर्भात कोणत्याही पक्षाने २९ एप्रिल २०२४ पासून कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर ते न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्याचे समजले जाईल. टॅफ़ेने एजीसीओ (AGCO) चा विरोधात चेन्नई येथील याचिकेअंतर्गत दिलेला आदेश मान्य केला नाही म्हणून याचिका दाखल केली आहे.
Comments
Post a Comment