अधाता ट्रस्टने साजरा केला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्ती दिवस
अधाता ट्रस्टने साजरा केला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्ती दिवस: वृद्धत्वाच्या दिशेने प्रवासाला सकारात्मक बनवण्याला प्रोत्साहन आणि १२ व्या वर्धापन दिनाचा आनंद
~ लोकप्रिय अभिनेते श्री अजिंक्य देव यांची विशेष उपस्थिती ~
~ यावर्षीच्या कार्यक्रमाचा विषय होता - 'रूट्स अँड रिदम्स: नयी पीढ़ी - पुरानी परंपरा' ~
मुंबई, २ ऑक्टोबर, २०२४: ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आणि सामाजिक कल्याणमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कार्यरत असलेली, मुंबई-स्थित स्वयंसेवी संस्था, अधाता ट्रस्टने आपल्या १२व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्ती दिन अतिशय उत्साहात साजरा केला. गेले एक दशकभर हा ट्रस्ट 'पॉझिटिव्ह एजिंग' अर्थात वृद्धत्वाच्या दिशेने केल्या जात असलेल्या प्रवासाला सकारात्मक बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. "एजिंग विथ डिग्निटी" या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संकल्पनेला अनुसरून यंदाच्या वर्षीचे आयोजन करण्यात आले होते. सहायक आणि पोषक वातावरणामध्ये समाधानी आयुष्य जगता यावे यासाठी ज्येष्ठांना सक्षम बनवण्याचे कार्य अधाता ट्रस्ट करत आहे.
यंदाच्या वर्षी अधाता ट्रस्टने 'रूट्स अँड रिदम्स: नयी पीढ़ी - पुरानी परंपरा' या संकल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजच्या काळात समाज वेगाने बदलत असताना परंपरांचे पाईक बनून राहण्याची भूमिका ज्येष्ठ निभावत आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला. वृद्धत्वाकडे नेणाऱ्या प्रवासाविषयीच्या दृष्टिकोनांना अतिशय कुशलतेने नवे आकार देत, या कार्यक्रमामध्ये १४ पेक्षा जास्त केंद्रांमधील ज्येष्ठ सदस्यांनी मंचावर येऊन पारंपरिक लोकगीते सादर केली, भारतातील समृद्ध आणि विविधांगी संस्कृतीचा आनंद साजरा केला, आपल्या सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
लोकप्रिय अभिनेते श्री अजिंक्य देव यांनी यावेळी सांगितले, "या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या समाजातील ज्येष्ठ सदस्य, आपल्या कुटुंबांचे खरे प्रमुख इतक्या सुखासमाधानाने जगत आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला. आपली संस्कृती आणि मूल्यांचे ते आधारस्तंभ आहेत, त्यांच्याकडील ज्ञानाचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांनी आयुष्यात सदैव उत्कर्ष साधावा यासाठी त्यांची साथसोबत केली पाहिजे. वृद्धत्वाच्या सौंदर्याचा आणि समृद्धतेचा आनंद आपण सर्वांनी मिळून साजरा करू या."
श्रीमती अनन्या गोएंका यांनी आपल्या भाषणाने कार्यक्रमाचे महत्त्व वृद्धिंगत केले, त्या म्हणाल्या, "वृद्धत्व म्हणजे तारुण्याचा ऱ्हास नाही तर हा आयुष्याचा नवा टप्पा आहे जो भरपूर संधी व शक्ती घेऊन येतो."
अधाता ट्रस्टचे संस्थापक व विश्वस्त श्री अरुण नंदा यांनी सांगितले, "१२ वर्षे पूर्ण होणे हा अधाता ट्रस्टसाठी फक्त एक टप्पा नाही तर ज्येष्ठांना सक्षम बनवण्याप्रती आणि समाज वृद्धत्वाकडे ज्याप्रकारे पाहतो त्यामध्ये नवपरिवर्तन घडवून आणण्याप्रती आमची बांधिलकी यामधून दर्शवली जात आहे. आम्ही असे मानतो की वय म्हणजे नुसती एक संख्या असते, प्रत्येक वय आपल्याला आयुष्यातील समृद्धतेचा स्वीकार करण्याची छान संधी असते. आम्ही सर्वजण मिळून एक अशी संस्कृती निर्माण करत आहोत जिथे वृद्ध होणे म्हणजे आनंद, हुशारी आणि नवीन संधींनी भरलेला प्रवास असेल."
अधाता ट्रस्टने टाटा मुंबई मॅरेथॉन सिनियर सिटीझन रनच्या तयारीमध्ये द जर्नी टू फिटनेस चॅलेंज हा धावण्याचा व्हर्च्युअल कार्यक्रम देखील आयोजित केला आहे. प्रोकॅम इंटरनॅशनलच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश ज्येष्ठांमध्ये शारीरिक हालचाली, व्यायाम, कामे यांना प्रोत्साहन देणे हा आहे. फिटनेस आणि समाजामध्ये सहभागी होण्याला प्राधान्य देण्याप्रती बांधिलकी वाढत असल्याचे देखील यामधून दाखवण्यात येईल. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना २०२५ मध्ये होणार असलेल्या टीएमएमएससीआरसाठी तयार व्हायला मदत मिळेल. नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.
गेल्या वर्षी टीएमएमएससीआरची संकल्पना 'प्रमोटिंग पॉझिटिव्ह एजिंग' ही होती. १७०० पेक्षा जास्त उत्साही ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये भाग घेऊन सक्रिय व समाजाशी जोडून राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते.
सध्या अधाता ट्रस्ट मुंबई, नवी मुंबई, ठाणे (लवकरच पनवेल येथे) येथील १४ कम्युनिटी सेंटर्समधील ५०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक सदस्यांना पाठिंबा देतो. दरवर्षी हा ट्रस्ट भारतातील वृद्ध नागरिक आणि त्यांच्या समस्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वर्ल्ड एल्डर्स डे साजरा करतो. विविध कार्यक्रम आणि उपक्रमांमधून अधाता ट्रस्ट वृद्ध व्यक्तींच्या जीवनात उन्नती घडवून आणण्यासाठी, त्यांना त्यांचा आत्मविश्वास व स्वावलंबन परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. विशेष कार्यक्रम आयोजित करून, मित्र व परिवारांना देखील सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊन ज्येष्ठांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे कार्य हा ट्रस्ट सातत्याने करत आहे
Comments
Post a Comment