महानगर गॅस लिमिटेड...

महानगर गॅस लिमिटेडने शिवाजी साटम यांची शहरातील गॅस नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी "एमजीएल सहयोगी’’या उपक्रमासाठी मोहिमेचे अँबासेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

(L-R-एमजीएलचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री संजय शेंडे, सीआयडी फेम ज्येष्ठ अभिनेते श्री शिवाजी साटम,एमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री आशु शिंघल)

०४ डिसेंबर २०२४, मुंबई : भारतामधील एक मोठी शहर वायु वितरण कंपनी असणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने ‘एमजीएल सहयोगी’ उपक्रम पुन्हा सुरु केला आहे, जो मुंबईतील आणि सभोवतालच्या प्रांतामधील रहिवाशांना गॅस पाइपलाइन्सचे अपघाती अपायांपासून रक्षण करण्यात सक्रिय भूमिका बजावण्याचे प्रोत्साहन देतो. यासाठी एक नवा आणि खास हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे : १८०० २१०० २१००.

सीआयडी फेम ज्येष्ठ अभिनेते श्री शिवाजी साटम हे या मोहिमेचा चेहरा असतील आणि त्यांच्यासोबत जागरुक आणि सुरक्षित शहरासाठी या मोहिमेत सामील होऊन, सुरक्षित उत्खननाबाबत जागरूकता वाढवण्याचे एमजीएलचे उद्दिष्ट आहे.

विविध पायाभूत सुविधा विकासकार्ये चालू असल्यामुळे अनेकवेळा खोदकामे सुरु असतात, परंतु, असुरक्षित किंवा अनियोजित खोदकामामुळे गंभीर अपघात होऊ शकतात. म्हणूनच, ‘एमजीएल सहयोगी’ उपक्रमामार्फत, एमजीएल रहिवाशांना त्यांच्या परिसरात सुरु असलेल्या कोणत्याही असुरक्षित किंवा अनियोजित खोदकामांची माहिती कळवण्याचे आवाहन करते, जेणेकरून गॅस पाइपलाइनचे अपघाती नुकसान टाळता येईल. हे संभाव्य गॅस गळती, आगीचे धोके टाळण्यास मदत करू शकते आणि घरे आणि सीएनजी स्टेशनला अखंड गॅस पुरवठा सुनिश्चित करेल आणि सार्वजनिक सुरक्षा राखेल.

अशा खोदकाम उपक्रमांची तक्रार करण्यासाठी, लोक हेल्पलाइन नंबर: १८०० २१०० २१०० द्वारे एमजीएलशी संपर्क साधू शकतात.

‘‘मी नेहमी म्हणतो तसं, ‘‘कुछ तो गडबड है’’ आणि विषय खोदकामाचा असला, की अनेक समस्या उद्भवू शकतात. पण ‘एमजीएल सहयोगी’ उपक्रमासह, हा धोका उद्भवण्याच्या आधीच तो टाळण्याची शक्ती आपल्याला मिळते. एमजीएलला येणारा प्रत्येक कॉल आपली घरे, आपला परिसर आणि आपल्या संपूर्ण शहराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे,” असे श्री शिवाजी साटम यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले, “आपण एमजीएल सोबत हात मिळवणी करूया, मुंबईला प्रत्येकासाठी सुरक्षित करण्यासाठी ते छोटेसे पाऊल उचलूया. एकत्रितपणे, आपण अपघात टाळू शकतो आणि मुंबईचा गॅस पुरवठा सुरक्षित आणि सुरळीत चालू ठेवू शकतो.”’’

मोहिमेच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना एमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री आशु शिंघल म्हणाले ‘‘आमच्या आदरणीय ग्राहकांना सुरक्षित आणि अखंड गॅस पुरवठा सुनिश्चित करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आमच्या ‘एमजीएल सहयोगी’ सुरक्षा जागरुकता मोहिमेचा चेहरा म्हणून श्री. शिवाजी साटम आल्याने आम्हाला आनंद होत आहे. लोकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता पाहता, आम्हाला आशा आहे की त्यांचे आवाहन लोकांना

स्वतःच्या सुरक्षिततेच्या आणि ते राहत असलेल्या शहराच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क राहण्यास प्रोत्साहित करेल.

या प्रसंगी श्री साटम आणि महानगर गॅसच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने अशा व्यक्तींचा सत्कार केला ज्यांनी दक्ष राहून गॅस पाइपलाइनच्या रक्षणासाठी सक्रिय भूमिका घेतली .

1. Suresh Vasant Shetty (Andheri East) 

2. Bhuminathan Chinnasami Kounder (Goregaon East)

3. Chandrapal Singh Shaktawat (Vileprale West) 

4. Mohammad Arif Shaikh (RTO Road, Andheri West)

5. Aniket Sahani (Waghbil, Thane)

6. Jay Singh Mitharam (Vasant Vihar, Thane)

7. Birbahadur Prajapati (Manpada, Thane)

8. Dnyaneshwar Arbuj (Vartak Nagar, Thane)

9. Gautam Lal Vaid (Mulund West)

10. Santosh Satgkar (Bhandup West)

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight