रक्षाबंधनानिमित्त २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या वर्खातील कलाकृतींसाठी वाढता कल
रक्षाबंधनानिमित्त २४ कँरेट शुध्द सोन्याच्या वर्खातील कलाकृतींसाठी वाढता कल
मुंबई, ६ जुलै, २०२५: रक्षाबंधनासाठी लाडक्या बहिणींना देण्यासाठी अगदी छोट्या भेटवस्तूंपासून ते किंमती वस्तूंपर्यंत अनेक गोष्टीं रक्षाबंधनानिमित्त बाजारात उपलब्ध झाल्या आहेत, परंतु ज्या भावांना काही खास भेट द्यायचे आहे त्यांना थेट सोन्याच्या वर्खात घडविलेल्या भेटवस्तूही बाजारात दाखल झाल्या आहेत. रक्षाबंधन हा पवित्र सण असल्याने तितकेच पावित्र्यपूर्ण व संग्रहात ठेवता येईल असे 'डिव्होशनल आर्ट' या प्रकारात मोडणाऱ्या २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या वर्खात घडविलेल्या देवी - देवतांच्या तसेच आध्यात्मिकदृष्ट्या शुभ चिन्हांच्या कलाकृतींना ग्राहकांची पसंती दिसत आहे. विविध ज्वेलर्सच्या पेढ्यांमधून या कलाकृतींची मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून मोठी उलाढाल गेल्या काही आठवड्यांपासून पहायला मिळत आहे. खास रक्षाबंधन व जन्माष्टमीच्या निमित्ताने थायलंडमधील प्राणदा ग्रुपचा भाग असलेल्या प्राईमा आर्टने मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील नामांकित दागिन्यांच्या शोरूममध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या वर्खात बनविलेल्या गणपती, लक्ष्मी, श्रीकृष्ण, सरस्वती इत्यादी मूर्तींच्या कलाकृतींच्या संग्रहाची मालिका ग्राहकांसाठी सादर केली आहे ज्याला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आकर्षक डिझाइनसह प्राइमा आर्टने भक्ती व अध्यात्माचा सुरेख संगम साधत विविध देवतांच्या व अन्य कलाकृती २४ कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये साकारत 'एम् सिरीज' व 'रिच्युअल' या मालिकेखाली ग्राहकांसाठी अगदी परवडणाऱ्या किंमतीत सादर केल्या आहेत. प्राइमा आर्टच्या 'रिच्युअल' या मालिकेत देवघरांत तसेच घरांतील भिंतींची शोभा वाढविणाऱ्या कलाकृती आहेत तर 'एम सिरीज' नावाचा कलाकृतींचा आणखी एक संच, उत्सव आणि औपचारिक भेटवस्तूंसाठी आदर्श असा प्रीमियम व विविध स्तरांत साकारलेला संग्रह आहे. 'गोल्डन मोमेंट्स' या मालिकेअंतर्गत कस्टमाइज्ड भक्तीपूर्ण व वैयक्तिक संग्रहात ठेवता येईल अशा कलाकृतींची एक खास ऑफर सादर करण्यात आली आहे. सोने खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या खरेदीदारांना वैयक्तिक संग्रहासाठी तसेच भेटवस्तू देण्यासाठी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या शीटमध्ये बनविलेल्या कलाकृती खरेदी करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.
मुंबईमध्ये वामन हरि पेठे ज्वेलर्स, एम. के. घारे ज्वेलर्स, प्रदीप ज्वेलर्स, पी. के. ज्वेलर्स, विपुल ज्वेलर्स तर नवी मुंबईमध्ये वाशी येथील मेघना ज्वेलर्स, नेरुळ येथील स्वर्णगंगा ज्वेलर्स, खारघर येथील दीपशाईन ज्वेलर्स, पनवेल येथील पटेल ज्वेलर्स, बांठिया ज्वेलर्स आणि अंकित ज्वेलर्स यासारख्या प्रतिष्ठित विश्वसनीय रिटेल ज्वेलर्सच्या रिटेल शोरूममध्ये प्राइमा आर्टच्या कलाकृती किंवा प्रतिमा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्राइमा आर्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनोद तेजवानी म्हणाले, "रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा वेगळा भेटवस्तूंचा पर्याय आम्ही भावांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आधुनिक भारतीय ग्राहकांच्या आध्यात्मिक आणि भेटवस्तूंच्या संवेदनशीलतेशी जुळणारे कालातीत सोन्याचे नमुने सादर करून, परंपरेचे ललित कलेशी मिश्रण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे."
प्राइमा आर्टच्या या श्रेणीतील वाढत्या खरेदी ट्रेंडबद्दल बोलताना मैत्री तेजवानी म्हणाल्या, "रक्षाबंधनाच्या पवित्र सणांत भक्तीपर भेटवस्तूंचा संचय व देवाणघेवाण ही आपल्या संस्कृतीतील एक सुंदर परंपरा आहे. प्राइमा आर्टमध्ये, आम्ही आमच्या २४ कॅरेट सोन्याच्या कलाकृतींना भक्तीची कालातीत अभिव्यक्ती म्हणून पाहतो." सोन्याच्या किंमती वाढत असताना प्रत्यक्ष सोने किंवा चांदीच्या भेटवस्तू घेण्यापेक्षा या परवडणाऱ्या किंमतीतील कलाकृती हा उत्तम पर्याय असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले.
Comments
Post a Comment