अरिहंत अकॅडमी लिमिटेड..
अरिहंत अकॅडमी लिमिटेडचा आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतील करोत्तर नफा १०६ टक्क्यांच्या वाढीसह १.९६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला
मुंबई, ऑगस्ट 13, 2025- अरिहंत अकॅडमी लिमिटेड या शिक्षण व प्रशिक्षण उद्योगामधील आघाडीच्या कंपनीने काल ३० जून २०२५ रोजी समाप्त झालेल्या पहिल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने महसूल व नफ्यामध्ये मोठ्या वाढीची नोंद करत उत्तम कामगिरी केली.
कंपनीने प्रबळ आर्थिक कामगिरी केली, जेथे आथिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत करोत्तर नफा (पीएटी) आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीमधील ०.९५ कोटी रूपयांच्या तुलनेत १०५.४८ टक्के तिमाही-ते-तिमाही (क्यूओक्यू) वाढीसह १.९६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. एकूण महसूल आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीमधील ९.९५ कोटी रूपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत ८१.६० टक्के वाढीसह १८.०७ कोटी रूपयांपर्यंत वाढला. यामधून विद्यार्थ्यांच्या सतत उत्साहपूर्ण वातावरण देण्याच्या, नवीन शैक्षणिक विभागांमध्ये विस्तार करण्याच्या आणि गतीशील शैक्षणिक क्षेत्रात नफा वाढवण्याच्या क्षमतेच्या माध्यमातून कंपनीची प्रबळ व सक्रिय कार्यक्षमता दिसून येते.
या निकालांबाबत मत व्यक्त करत अरिहंत अकॅडमीचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल कपासी म्हणाले, ''आमच्या पहिल्या तिमाहीमधील उत्तम निकालांमधून आमचा सातत्यपूर्ण शैक्षणिक दर्जा व स्थिर वाढीचा प्रभाव दिसून येतो. वाढलेली नोंदणी, नवीन अभ्यासक्रम ऑफर आणि कार्यक्षम कामकाजामुळे महसूल व नफा दोन्ही वाढले आहेत. आमचे विद्यार्थी, पालक आणि भागधारकांसाठी मूल्य निर्माण करताना आम्ही दर्जेदार शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करत राहू.''
आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत अरिहंत अकॅडमीने दोन प्रमुख व्यवसाय अपडेट्स साधले:
१.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या मूल्यांकनात कार्मेल क्लासेसचे १०० टक्के अधिग्रहण करून मुंबईतील आपले अस्तित्त्व आणखी मजबूत केले. अकॅडमीने आपल्या क्षमता वाढवल्या आणि वसई व एकूण मुंबईत आपला विस्तार वाढवला.
अरिहंत अकॅडमीने एनएसई अकॅडमीसोबत सहयोगाने फिनटेक अनालिटिक्स प्रोफेशनल्स (एफएपी) प्रोग्राम सुरू केला. हा २ वर्षांचा विशेष प्रमाणपत्र प्रोग्राम महाराष्ट्रातील अद्वितीय कोर्स आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना अत्याधुनिक, उद्योग-संबंधित विश्लेषणात्मक कौशल्यासह सुसज्ज करून फिनटेक उद्योगातील वाढत्या कौशल्याची तफावत भरून काढण्याचा मनसुबा आहे.
Comments
Post a Comment