गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा..

 गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा

आतली बातमी फुटली चित्रपटातील सखूबाई गाणं प्रदर्शित

काही दिवसांपासून सोशल मीडियावर सखूबाई  कोणयाची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर ही आतली बातमी  फुटली असून  ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आहे. नुकतेच तिचे आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे आतली बातमी फुटली' या चित्रपटातील सखूबाई हे पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. 

प्रत्येकाला ठेका धरायला लावणारा धमाकेदार आयटम नंबर ऐकायला जितकं जल्लोषमय आहेतितकंच तो पहायलाही कमाल आहे. सबसे कातिल’ गौतमी पाटील आणि एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी या गाण्यात चांगलीच धमाल आणली आहे. या धमाकेदार गाण्याला संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे.  चैतन्य कुलकर्णी यांनी  लिहिलेले हे गाणं सोनाली सोनावणे हिने गायलं आहे.

हे आयटम सॉंग करताना आम्हाला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेलअसा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. चित्रपटातील गौतमी पाटीलचा हॉट आणि सिद्धार्थ जाधवचा कूल अंदाज प्रेक्षकांसाठी भन्नाट तडका असणार हे नक्की.

या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. 'आतली बातमी फुटली चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडेअम्मन अडवाणी,जैनेश इजरदारविशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडेव अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांचीनृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरेतिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहेतर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. 'आतली बातमी फुटली चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025