अनिता भाबी आणि तिवारीजी यांनी मुंबईतील गरबा नाइटमध्ये उत्साहाची भर केली
अनिता भाबी आणि तिवारीजी यांनी मुंबईतील गरबा नाइटमध्ये उत्साहाची भर केली
मालिका ‘भाबीजी घर पर है'मधील लोकप्रिय जोडी विदिशा श्रीवास्तव व रोहिताश्व गौड हजारो चाहत्यांसोबत सामील झाले आणि गरबा, आनंद व उत्सवी उत्साहाने भरलेल्या गरबा नाइटमध्ये नवरात्री साजरा करण्याचा आनंद घेतला
भारतातील भव्य सणांपैकी एक नवरात्री सण जगभरात जल्लोषात साजरा केला जातो. या वर्षी एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है'मधील लोकप्रिय जोडी अनिता भाबी (विदिशा श्रीवास्तव) व मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौड) यांनी मुंबईतील प्रसिद्ध गरबा नाइटमध्ये उतसाहाची भर केली आणि चाहत्यांसोबत उत्सवी उत्साहाचा आनंद घेतला. हे साजरीकरण दुप्पट आनंदाचे ठरले, जेथे एण्ड टीव्ही लवकरच नवीन अलौकिक शक्तीसंदर्भातील विनोदी मालिका ‘घरवाली पेडवाली' सूरू करण्यास सज्ज आहे,ज्यामुळे प्रेक्षकांना अधिक मनोरंजन मिळणार आहे.
उत्सवी उत्साहाची भर करत रोहिताश्व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्हणाले, “तिवारीजीचे अनिता भाबीसोबत गरबा खेळण्याची संधी मिळण्याचे स्वप्न होते. आणि या वर्षी ते स्वप्न पूर्ण झाले आहे (हसतात). माझ्या लाडक्या अनिता भाबीसोबत (विदिशा) गरबा खेळताना एकाच रात्री दिवाळी व होळी असल्यासारखे वाटले. मालिकेमध्ये मी नेहमी तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण पडद्यामागे मुंबईतील गरबा मंचावर तिच्यासोबत गरबा नृत्य करण्याचा आनंद पूर्णत: वेगळा होता. ताल, ऑर्केस्ट्राची लय, उपस्थित जमाव सर्वकाही उत्साहवर्धक होते. आमच्या चाहत्यांसोबत गप्पागोष्टी, त्यांचा उत्साह आणि त्यांच्यासोबत नृत्य करण्याच्या आनंदाने या नाइटला अत्यंत विशेष बनवले. प्रत्येक नृत्य, प्रत्येक टाळी आणि प्रत्येक उत्साहाने मला जादुई विश्वाचा भाग असण्याचा अनुभव दिला. या कार्यक्रमापूर्वी माझ्या मुलींनी मला काही गरबा स्टेप्स शिवकल्या आणि अशा भव्य मंचावर त्या स्टेप्स करताना खूप आनंद झाला. आकर्षक पोशाखांमध्ये हजारो लोकांमध्ये गरबा करणे, एकत्र नवरात्री सण साजरा करणे हा अनुभव नेहमी माझ्या स्मरणात राहिल. चाहत्यांसोबत नवरात्री सण साजरा करण्याचा आनंद, तसेच आमची आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली'चे स्वागत करण्याच्या क्षणाने या गरबा नाइटला अधिक विशेष बनवले.''
आपला आनंद व्यक्त करत विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, “नवरात्रीचे माझ्या मनात खास स्थान आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये मोठ्या भक्तीभावासह साजरा केला जातो. दरवर्षी आम्ही नऊ दिवसांच्या रंगांची परंपरा पाळतो आणि दुर्गामातेची आराधना करतो. यंदा नवरात्री सण अधिक खास ठरला, जेथे मी वेळात वेळ काढून माझे सह-कलाकार रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी) यांच्यासोबत कला केंद्र, बोरीवली येथे मुंबईतील प्रतिष्ठित गरबा नाइटचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत गरबा खेळणे आणि उत्साही जमावासोबत गरबा स्टेप्स जुळवणे अत्यंत आनंददायी अनुभव ठरला. मी दुसऱ्यांदा मुंबईतील प्रसिद्ध गरबा नाइटला भेट दिली आणि ते पूर्वीपेक्षा अधिक भव्य व उत्साही होते. गरबा नृत्य करण्यापासून भेटीगाठी व फोटो काढण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण आनंद व एकतेने भरलेला होता. आमची नवीन मालिका ‘घरवाली पेडवाली'साठी आशीर्वाद मागितला, ज्यासह आमचे कुटुंब अधिक मोठे होत आहे.''
विदिशा श्रीवास्तव यांना अनिता भाबीच्या भूमिकेत आणि रोहिताश्व गौड यांना मनमोहन तिवारीच्या भूमिकेत पाहण्यासाठी पाहत राहा मालिका ‘भाबीजी घर पर है' दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
Comments
Post a Comment