पुराणिक स्पिरिट्सचा प्रीमियम व्होडका आणि कॉन्यॅकसह भारतात प्रवेश
पुराणिक स्पिरिट्सचा प्रीमियम व्होडका आणि कॉन्यॅकसह भारतात प्रवेश
शेफ संजीव कपूर,अनुषा दांडेकर,सई मांजरेकर आणि महेश मांजरेकरांसह चित्रपटसृष्टीतील मान्यवर 'पुराणिक'च्या लॉचला उपस्थितप्रीमियम पेय उद्योगातील एक प्रतिष्ठित जागतिक नाव असलेल्या पुराणिक स्पिरिट्स कंपनीने आपल्या प्रमुख पोर्टफोलिओसह भारतीय बाजारपेठेत अधिकृत प्रवेशाची घोषणा केली आहे. मुंबईतील ताज लँड्स एंड येथे झालेल्या खास कार्यक्रमात ब्रँडने आपल्या दोन सिग्नेचर उत्पादनांचा म्हणजेच पुराणिक व्होडका, जी नऊ वेळा डिस्टिल केल्यामुळे अत्यंत स्मूथ आहे आणि पुराणिक व्हीएसओपी कॉन्यॅक, जे फ्रेंच कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, त्याचे भव्य अनावरण केले.
या रणनीतिक प्रवेशाद्वारे पुराणिक स्पिरिट्सचा उद्देश युरोपीय डिस्टिलेशनचा वारसा भारतासारख्या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम स्पिरिट्स मार्केटमध्ये आणण्याचा आहे. कंपनीच्या उत्पादन केंद्रांचा पाया दोन जागतिक दर्जाच्या प्रदेशांमध्ये आहे. फ्रान्समधील कॉन्यॅक, जिथे परंपरेने उत्कृष्ट कॉन्यॅक, आर्मन्याक, लिकर्स आणि पिनो द शराँत वाईन्स तयार होतात आणि स्कॉटिश हायलँड्स, जिथे पुरस्कारप्राप्त जिन, रम, अॅबसिन्थ आणि अक्वाविट तयार केले जातात.
या प्रसंगी पुराणिक स्पिरिट्स इंडियाचे प्रवर्तक आणि सीईओ अनूप मोहन म्हणाले, ''भारत हा जागतिक प्रीमियम स्पिरिट्सच्या वाढीच्या कहाणीचा केंद्रबिंदू आहे. येथे ग्राहक केवळ पेय नव्हे, तर एक अस्सल, नाजूक आणि जागतिक दर्जाचा अनुभव शोधत आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार संबंध अधिक दृढ होत असताना, आमचा हा युरोपीय पोर्टफोलिओ भारतात आणण्यासाठी याहून योग्य वेळ असूच शकत नाही. आजचा दिवस केवळ ब्रँड लाँचचा नाही, तर फ्रेंच आणि स्कॉटिश कौशल्य आणि भारताच्या उत्क्रांत होणाऱ्या चवीमध्ये सांस्कृतिक सेतू बांधण्याचा आहे.”
पुराणिक स्पिरिट्सचे चेअरमन राहुल पुराणिक म्हणाले, ''गेल्या दोन दशकांपासून आमच्या फ्रान्स आणि स्कॉटलंडमधील डिस्टिलरींनी पुरस्कारप्राप्त स्पिरिट्स तयार केल्या आहेत, ज्या आज १८ देशांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतात त्यांना आणणे हा आमच्या प्रवासातील पुढचा नैसर्गिक टप्पा आहे. आमची व्होडका आणि कॉन्यॅक आता उपलब्ध असून, २०२६ पर्यंत संपूर्ण पोर्टफोलिओ भारतात सादर करण्याचे आमचे नियोजन आहे. आम्ही भारतात एक संपूर्ण प्रीमियम स्पिरिट्स इकोसिस्टम उभारण्यास उत्सुक आहोत.”
पुराणिक स्पिरिट्सचा भारतातील विस्तार अखेर कॉन्यॅक, जिन, रम, व्होडका आणि आर्टिसन क्राफ्ट स्पिरिट्स अशा पाच प्रमुख श्रेणींमध्ये होणार आहे, ज्यात भारतीय रसिकांच्या अभिरुचीनुसार उत्कृष्टता आणि परिष्कृतपणा असेल.
या सोहळ्यात अनुभवी अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची पुराणिक स्पिरिट्सच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली. या संधीबद्दल मांजरेकर म्हणाले, ''माझ्यासाठी पुराणिक हा खऱ्या अर्थाने प्रीमियम स्पिरिटचा पर्याय आहे. वारसा, कौशल्य आणि सौंदर्याचा संगम. हा फक्त पेय निर्माण करणारा ब्रँड नाही, तर अनुभव घडवणारा आहे. भारतात जागतिक दर्जा आणणाऱ्या आणि प्रीमियम स्पिरिट्सची व्याख्या उंचावणाऱ्या या ब्रँडशी जोडले गेलो याचा मला अभिमान आहे.”
या लाँचमुळे पुराणिक स्पिरिट्स भारतातील प्रीमियम पेय क्षेत्रात लक्झरीची नव्याने व्याख्या करणार असून, युरोपीय उत्कृष्टता आणि भारतीय रसिकांची जागतिक दर्जाच्या चवीकडे वाटचाल यांचा सुंदर संगम घडवणार आहे.
Comments
Post a Comment