मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्ल्सेमेंटकरिता अत्याधुनिक स्वरुपाचा पेन प्रोटोकॉल, ज्यामुळे शस्त्रक्रियेच्या दिवशीच रुग्णांना विना-वेदना चालण्या-फिरण्याची मोकळीक
गुडघ्याच्या गंभीर स्वरुपाच्या सांधेदुखी (सीव्हिअर ऑस्ट्रोआर्थरायटीस- ओए) मध्ये टोटल नी रिप्ल्सेमेंट हा सर्वाधिक प्रभावी उपचार पर्याय मानला जातो. टोटल नी रिप्लेसमेंट (टीकेआर) शस्त्रक्रियेच्या पारंपरीक पद्धतीचा विचार केल्यास याच्याशी सामान्य ते गंभीर वेदना निगडीत आहेत. संपूर्णपणे गुडघे बदली करण्याची शस्त्रक्रिया टाळण्याचे किंवा चालढकल करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे शस्त्रक्रियेनंतर होणारी तीव्र वेदना!
मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी एन्हान्स्ड रिकव्हरी आफ्टर सर्जरी (ईआरएएस) करिता प्रोटोकॉल तयार केला. ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर देखभालीचा दर्जा सुधारेल, वेदनेचे मुख्य व्यवस्थापन करण्यावर भर राहील. जेणेकरून टोटल नी आर्थोप्लास्टी करून घेणाऱ्या रुग्णांना जवळपास वेदनारहित अनुभव राहील.
डॉ. मुदित खन्ना हे मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल मध्ये अनुभवी जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन असून ते शस्त्रक्रियेत कमीतकमी चिरफाड होईल असे तंत्र अंगिकारतात. बहुसंख्य रुग्ण हे मल्टीमोडल स्टेट ऑफ द आर्ट पेन कंट्रोल प्रोटोकॉलसह टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी करून घेत असल्याने त्यांना संपूर्ण वेदनारहित किंवा बऱ्याच अंशी वेदनारहित अनुभव येतो.
डॉ मुदित खन्ना वॉकहार्ट हॉस्पिटल म्हणाले की, “बहुसंख्य रुग्ण हे शस्त्रक्रियेनंतर कमीत-कमी वेदना व्हावी याकरिता ‘मल्टीमोडल पेन कंट्रोल टीकेआर’चा वापर करतात, ज्यादिवशी शस्त्रक्रिया होते, त्याचदिवशी हे रुग्ण जागेवरून उठून, हालचाल करू लागतात. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याचदिवशी फिजिओ थेरपिस्टच्या साह्याने ते चालू लागतात, त्यांना सामान्यपणे तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळतो.”
त्यामुळे जे रुग्ण वेदनारहित शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात, त्यांना आपल्या कामावर रुजू होणे तसेच व्यस्त कुटुंबात सक्रीय होण्यासाठी, आपल्या जबाबदाऱ्या पुन्हा अधिक वेगाने निभावण्यासाठी हा वेगवान पुनर्वसन कार्यक्रम उपयुक्त ठरतो. ‘संपूर्ण वेदनारहित किंवा बऱ्याच अंशी वेदनारहित टीकेआर’ ही संपूर्ण गुडघा बदली करण्याच्या शस्त्रक्रियेत रुग्णांना सांधेदुखीच्या गंभीर त्रासातून चांगल्याप्रकारे बरे करणारी पद्धत आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा एकंदर प्रवास सुसह्य होतो.
Comments
Post a Comment