उत्तम उपचारांमुळे गलगंडामुळे होणाऱ्या त्रासापासून रुग्णाची सुटका
उत्तम उपचारांमुळे गलगंडामुळे होणाऱ्या त्रासापासून रुग्णाची सुटका
डॉ.नीलम साठे या प्रसिद्ध कान,नाक, घसा तज्ज्ञ असून त्या मुंबई सेंट्रलस्थित वोक्हार्ट रुग्णालयात कार्यरत आहेत. डॉ.साठे यांनी नुकतीच एक शस्त्रक्रिया केली. काहीशी आव्हानात्मक बनलेली ही शस्त्रक्रिया जवळपास दीड तास सुरू होतेी. या शस्त्रक्रियेमुळे डॉक्टर साठे यांची अचूकता आणि कुशलता पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 50 वर्षांच्या अनिता या नर्स असून त्यांना गेली 5 वर्षे गलगंडाच्या समस्येमुळे भयंकर त्रास होत होता. त्यांच्या मानेकडचा भागही सुजला होता ज्यामुळे त्यांना होणाऱ्या त्रासात भर पडली होती.
अंकिता यांना आडवे पडल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना गिळताना त्रास होत होता आणि गेल्या 3-4 महिन्यांपासून त्यांना घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटत होते. अंकिता यांना होणाऱ्या त्रासाचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या आणि तपासण्या करण्यात आल्या. थायरॉईड चाचण्या (T3, T4, TSH) केल्या असता सुरुवातीला कोणतीही अनियमितता आढळून आली नाही. अंकिता यांच्या मानेचे आणि छातीचा सीटी स्कॅन केला असता, त्यांच्या सूज किती आहे याचा अंदाज आला. तपासणीमध्ये दिसून आलं की ही सूज छातीपर्यंत होती. महाधमनीपर्यंत सूज असल्याने श्वासनलिकेवरही दाब आला होता. यामुळे अंकिता यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. फाइन नीडल एस्पिरेशन सायटोलॉजी (FNAC) द्वारे गलगंडाच्या समस्येचे निदान झाले ज्यामुळे पुढील उपचाराची दिशा ठरवणे सोपे झाले.
डॉ. नीलम साठे यांनी अंकिता यांच्यावर स्टर्नोटॉमी किंवा कार्डिओव्हस्कुलर अँड थोरॅसिक सर्जरी (CVTS) केली. थायरॉईड ग्रंथींच्या भागात अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत जोखमीचे आणि अत्यंत कुशलतेचे काम असते. शस्त्रक्रिया करतेवेळी स्वरयंत्राच्या नसांना अजिबात धक्का लागू न देण्याचे कसब डॉ.साठे यांनी शस्त्रक्रियेदरम्यान साधलं. दीड तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत फक्त 200 मिलीलीटर रक्तस्त्राव झाला हे या शस्त्रक्रियेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
शस्त्रक्रियेनंतर अंकिता यांची प्रकृती झपाट्याने सुधारत गेली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही आणि कोणती गुंतागुंतही निर्माण झाली नाही. शस्त्रक्रियेदरम्यान स्वरयंत्राच्या नसांना अजिबात धक्का लागू न दिल्याने अंकिता यांच्या आवाजवरही काही परीणाम झाला नाही. गलगंडाची समस्या दूर करण्यासोबतच डॉ.साठे यांना शस्त्रक्रिया करतेवेळी ट्युब घालताना बरीच काळजी घ्यावी लागली. अशीच काळजी महत्त्वाच्या नसांना इजा पोहोचू नये यासाठीही घ्यावी लागली.
थायरॉईडची समस्या असलेल्यांवर प्रभावी उपाय सक्य असून हे उपाय किती फायदेशीर आहेत हे अंकिता यांच्या उदाहरणावरून दिसून येते. डॉ.साठे यांच्यासारख्या कुशल डॉक्टरने केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे अंकिता यांच्यासारखी समस्या असलेल्या इतर रुग्णांच्या मनात आशेचा किरण निर्माण होण्यास मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास रुग्णावर उपचार अधिक प्रभावीपणे करणे शक्य होते. उत्तम उपचार पद्धतीमुळे जीवनात काय फरक पडू शकतो हे आपल्याला अंकिता यांच्या उदाहरणावरून दिसून येते.
Comments
Post a Comment