रजित कपूर साकारणार औरंगजेब

 रजित कपूर साकारणार औरंगजेब

ब्योमकेश बक्षीया मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' या मराठी चित्रपटात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे.परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठीहिंदीतमिळतेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. 

औरंगजेब क्रूर शासक होतासोबत तो धोरणी आणि  कपटी  होता. त्यामुळे औरंगजेबसाठी कसलेला कलाकार हवा होतारजित कपूर या भूमिकेला न्याय देऊ  शकतील  यामुळे  त्यांना  ही संधी  दिल्याचं दिग्दर्शक राकेश सुबेसिंह  दुलगज सांगतात. 

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रजित कपूर ते सांगतात कीमी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. छत्रपती संभाजी च्या निमित्ताने मला प्रथमच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली.  या चित्रपटाचा मी महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला आनंद आहे.  

रजित कपूर यांच्यासह प्रमोद पवारशशांक उदापूरकर,दिलीप ताहिलमृणाल कुलकर्णीमोहन जोशीभरत दाभोळकरलोकेश गुप्तेबाळ  धुरीदिपक शिर्के,अमित देशमुख कै. आनंद अभ्यंकर,समीरमोहिनी पोतदारप्रिया गमरे आदी कलाकार  'छत्रपती संभाजी'  चित्रपटात आहेत. 

'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा  सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजितगुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी  दिले आहे.  छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..