Posts

Showing posts from 2026

फ्यूजन क्लासरुम एड्युटेक लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 31 जुलै 2026

Image
फ्यूजन क्लासरुम एड्युटेक लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 31 जुलै 2026 रोजी खुलणार; प्रति इक्विटी शेअर (दर्शनी मूल्य ₹10) किंमत पट्टा ₹151 ते ₹159 निश्चित (Dhumil Javeri CEO, Alka Javeri Co Founder and Dhruv Javeri MD   Fusion Klassroom Edutech Limited) ठळक मुद्दे  • 24,55,200 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (IPO).  • प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा ₹151 ते ₹159.  • किमान बोली आकार (Bid Lot) 1,600 इक्विटी शेअर्स असून त्यानंतर 800 इक्विटी शेअर्सच्या पटीत अर्ज करता येईल.  • अँकर गुंतवणूकदारांसाठी इश्यू 30 जुलै 2026 रोजी खुला होईल.  • इश्यू 31 जुलै 2026 रोजी खुला होईल आणि 4 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल.  • फ्लोअर प्राइस हा इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 15.10 पट असून, कॅप प्राइस हा दर्शनी मूल्याच्या 15.90 पट आहे.  मुंबई, जुलै 23,2026:-  फ्यूजन क्लासरूम एड्युटेक लिमिटेड ("कंपनी"), ही भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या हायब्रिड एडटेक प्लॅटफॉर्मपैकी एक असून K-12 शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी, व्यावसायिक कौशल्यवृद्ध...

मुलूंडच्या 'विठू माऊली' समूहाची सलग पाचवी वारी

Image
  मुलूंडच्या 'विठू माऊली' समूहाची सलग पाचवी वारी: ४८ भाविकांनी पूर्ण केला 'फलटण ते बरड' पायी प्रवास मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबईच्या धकाधकीच्या आणि यांत्रिक जीवनातही आपल्या परंपरेशी नाळ घट्ट जोडून ठेवणारी उदाहरणे आजकाल दुर्मिळ झाली आहेत. मात्र, मुलूंडच्या 'विठू माऊली' समूहाने यंदा सलग पाचव्या वर्षी अत्यंत निष्ठेने जोपासलेली वारीची परंपरा खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरली आहे. यंदाच्या वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा. गर्दीचा कोणताही अट्टहास न करता, मुंबईच्या विविध भागांतून आलेल्या ४८ भाविकांनी एकत्र येत 'फलटण ते बरड' या ऐतिहासिक आणि पारंपरिक मार्गावरून आपली पायी वारी पूर्ण केली. शिस्तबद्ध प्रवास आणि भक्तीचा संगम महानगरीय जीवनशैलीत वावरणाऱ्या या ४८ मुंबईकरांनी जुन्या परंपरेचा साधेपणा आणि वारकरी संप्रदायाची मूल्ये अत्यंत सुंदररित्या जपली. ऊन-पावसाचा खेळ सुरू असतानाही आणि वाटेतील अडचणींची तमा न बाळगता, या वारकऱ्यांची पावले न थकता पुढे पडत होती. मुखी 'ज्ञानबा-तुकाराम'चा अखंड गजर, हातात डौलाने फडकणारी भगवी पताका आणि चेहऱ्यावर विलक्षण उत्साह...

आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’..

Image
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात 'मन मंदिरा - गजर भक्तिचा' मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा! आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाच्या भक्तीचा, हरिनामाच्या गजराचा आणि वारकरी परंपरेच्या अखंड श्रद्धेचा पवित्र उत्सव. राज्यभरातील लाखो भाविक ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठ्ठलनामात तल्लीन होतात. याच भक्तिमय वातावरणाची अनुभूती आता घरबसल्या घेता येणार आहे ती झी टॉकीजवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’मधून. भक्ती, अध्यात्म आणि कीर्तन परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याचे विशेष महत्त्व अधिकच वाढले आहे. कीर्तन, अभंग, भारूड आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे. या विशेष पर्वात महाराष्ट्रातील मान्यवर कीर्तनकार आपल्या प्रभावी निरूपणातून भक्तिरसाची उधळण करणार आहेत. सोपान सानप, संगीता चोपडे, अविनाश भारती, प्रकाश साठे, भानुदास बैरागी आणि गौरीताई सांगळे हे नामवंत कीर्तनकार आपल्या ओजस्वी वाणीने, संतविचारांनी आणि अभंगांच्या सुरेल सादरीकरणातून प्रेक्षकांना ...

‘काटकोन त्रिकोण’ - तीन व्यक्तिरेखा, तीन विचार आणि नात्यांच्या गुंतागुंतीच्या भूमितीचा प्रवास

Image
'काटकोन त्रिकोण' - तीन व्यक्तिरेखा, तीन विचार आणि नात्यांच्या गुंतागुंतीच्या भूमितीचा प्रवास  मराठी रंगभूमीवर आशयघन नाटकांची परंपरा जपणाऱ्या नाटकांमध्ये आता आणखी एका वेगळ्या कलाकृतीची भर पडणार आहे. ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर दाखल होत असून, पोस्टरपासूनच या नाटकाने रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ‘बुद्धी आणि भावना ह्यांना स्पर्श करणारं नाटक! ’ या एका ओळीतील ओळखच या नाटकाच्या गाभ्याची उत्सुकता वाढवणारी ठरते. सर्वसामान्य वाटणाऱ्या एका कुटुंबाच्या आयुष्यात घडणारी एक घटना आणि त्यानंतर बदलत जाणारी नात्यांची समीकरणं. प्रत्येक उत्तरासोबत उभे राहाणारे नवे प्रश्न, मनात दडवून ठेवलेली सत्यं आणि भावनांच्या गुंतागुंतीत अडकलेली माणसं… ‘काटकोन त्रिकोण’ नेमकं काय उलगडणार, याची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत कायम ठेवणार आहे. या नाटकात शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर या तीन दमदार कलाकारांच्या भूमिका असून, त्यांच्या व्यक्तिरेखांमधून आधुनिक नातेसंबंधातील अनेक छटा उलगडणार आहेत. दिग्दर्शक अजित भुरे म्हणाले, ‘’ ‘काटकोन त्रिकोण’ हा कौटुंबिक थ्रिलर असून प्रत्येक...

प्रदर्शनापूर्वीच ‘भूतम भयम्’ची जोरदार हवा!

Image
प्रदर्शनापूर्वीच 'भूतम भयम्' ची जोरदार हवा! चाहते आणि इन्फ्लुएन्सर्सकडून भरभरून कौतुक, आजपासून सर्वत्र प्रदर्शित चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात घर करणं, हे प्रत्येक चित्रपटाचं स्वप्न असतं. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूतम भयम्’ने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. ट्रेलर, गाणी आणि चित्रपटाची भन्नाट झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता अक्षरशः चाहत्यांच्या प्रेमात रूपांतरित झाली असून, चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याच प्रेमाची खास दखल घेत ‘ऑरेंज ज्यूस गँग’ने चाहत्यांसाठी एक्सक्लुझिव्ह फॅन स्क्रीनिंगची घोषणा केली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या पडद्यावर ‘भूतम भयम्’ अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचं समजताच चाहत्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर घोषणा होताच गुगल फॉर्मद्वारे हजारोंची नोंदणी झाली आणि हा क्षण चित्रपटाविषयी असलेल्या विश्वासाची आणि कमालीच्या उत्सुकतेची साक्ष देणारा ठरला. फॅन स्क्रीनिंगसोबतच निवडक इन्फ्लुएन्सर्ससाठीही व...

कॅशफ्री पेमेंट्स..

Image
कॅशफ्री पेमेंट्सकडून नवीन व्यवसायांसाठी मार्च २०२७ पर्यंत शून्य टक्‍के पेमेंट गेटवे शुल्काची घोषणा भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी शुल्क सवलत व्यवसायांना सणासुदीच्या हंगामापूर्वी विनामूल्य लाँचपॅड प्रदान करते कॅशफ्रीवर नोंदणी करणाऱ्या नवीन व्यवसायांना त्यांच्या पहिल्या २० लाख रुपयांच्या विक्रीवर शून्य पेमेंट गेटवे शुल्क द्यावे लागेल, जे ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध असेल.  विक्रेते काही मिनिटांत लाइव्ह होऊ शकतात, त्यांना दुसऱ्याच दिवशी सेटलमेंट्स मिळतात आणि संपूर्ण सणासुदीच्या हंगामासाठी समर्पित खाते व्यवस्थापक (अकाउंट मॅनेजर) दिला जातो.  संपूर्ण शुल्क सवलतीसह जलद ऑनबोर्डिंग आणि सेटलमेंट्सचे संयोजन करणारी ही ऑफर भारतामधील पेमेंट उद्योगातील सर्वोत्तम आहे. मुंबई , दिनांक -  कॅशफ्री पेमेंट्स या भारतातील आघाडीच्‍या एआय-नेटिव्ह पेमेंट्स कंपनीने आज आपल्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणाऱ्या सर्व नवीन व्यवसायांसाठी पेमेंट गेटवे शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे, तसेच ३१ मार्च २०२७ पर्यंत पहिल्या २० लाख रुपयांच्या ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यूवर (जीएमव्ही) शून्य टक्‍के शुल्क ऑफर केले आहे. ही ऑफ...

SBI Funds Management Limited

Image
Strong Debut for SBI Funds Management Limited IPO, Lists at Rs 613.3 on the Exchange, Reaches a High of Rs 625 on the BSE  (Centre Right)Mr. C. S. Setty, Chairman, SBI along with the management team of SBI, SBI Funds Management and Amundi at prestigious Listing ceremony at NSE Mumbai. ·         Shares of SBI Funds Management Limited Lists at Rs 613.3, Up 6.8% ·         Stock Reaches an Intraday High of Rs 625 on BSE and NSE Mumbai, July 21, 2026: Shares of Mumbai-based SBI Funds Management Limited, the largest asset management company (AMC) in India by quarterly average mutual fund assets under management (QAAUM), with QAAUM of Rs 12,509.98 billion, listed at Rs 613.3 on the exchange, a rise of 6.8% from IPO price . The scrip reached a high of Rs 625 on the BSE and NSE . The scrip closed at Rs 610.1 on the NSE. As per NSE, the total quantity traded stood at 848.49 lakh shares, on BSE the total Quantity stood at 9...

Caliber Mining and Logistics Limited

  Caliber Mining and Logistics Limited IPO Closes with Blockbuster Response; Subscribed 146.64 Times Mumbai, July 21, 2026: The Initial Public Offering of Caliber Mining and Logistics Limited was subscribed 146.64 times on the final day of bidding. The issue received bids of 1,14,90,37,400 equity shares against the offered 78,35,821 equity shares, according to data available on the stock exchanges. Qualified Institutional Buyers (QIB) and Non-Institutional Investors (NII) Portion were subscribed 240.71 times and 267.36 times, respectively. Retail Portion was subscribed 41.15 times. DAM Capital Advisors Limited is the book-running lead manager, and KFin Technologies Limited is the registrar of the issue. The equity shares are proposed to be listed on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited. Company Information Incorporated in 2014, the company is a mining operator managing overburden removal, coal extraction and coal logistics together as an integrated services...

'द्विधा' मधून निमिष कुलकर्णी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात!

  ' द्विधा ' मधून निमिष कुलकर्णी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात! ' महाराष्ट्राची हास्यजत्रा ' या लोकप्रिय कार्यक्रमामुळे अभिनेता निमिष कुलकर्णी घराघरांत पोहोचला. आपल्या सहजसुंदर अभिनयशैली आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. ‘ मर्डरवाले    कुलकर्णी ’ या मराठी नाटकानंतर हिंदी चित्रपट ' अग्नि ' मध्ये तो झळकला. सध्या ' सनई चौघडे ' मालिकेतील त्याच्या गाजणाऱ्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तो ' द्विधा ' या आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण करणारआहे. येत्या २१ ऑगस्टला ' द्विधा ' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आदित्य (आदि) व्यक्तिरेखा या चित्रपटात तो साकारत आहे. मनाने प्रेमळ , समजूतदार आणि विश्वासू असलेला आदि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा शांत आधार आहे. आदि हा श्रावणीचा आत्येभाऊ. बालपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम , विश्वास आणि अनेक सुंदर आठवणींची घट्ट वीण आहे.तो इतरांप्रमाणे जास्त बोलत नाही ; पण प्रत्येकाच्या मनातील न बोललेले भाव अचूक ओळखण्याच...

‘पालखी निघाली वारीला’मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर!

Image
'पालखी निघाली वारीला'  मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर! ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मश्री श्री.शंकरजी महादेवन आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित रीवा राठोड यांच्या सुमधुर स्वरांतून साकारलेलं भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला  आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं ‘पालखी निघाली वारीला’ हे नवीन भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकतेच या गाण्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या अखंड भक्तीभावात रंगलेलं हे गाणं प्रत्येकाला वारीचा आध्यात्मिक अनुभव देत आहे.  या गाण्याला सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि मधुर आवाजाची गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरांनी समृद्ध केलं आहे. ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवाने या गीताच्या माध्यमातून प्रथमच मराठीत गायन केलं असून, तिच्या सुरेल आवाजाने या भक्तिगीताला एक वेगळीच भावस्पर्शी उंची मिळाली आहे. ज्येष्ठ संगीतकार रूप कुमार र...

विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा

Image
  विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा   मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. ' अल्याड पल्याड ’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता ' घबाडकुंड ' ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने त्यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स , वेबसिरीज तसेच ' खिचिक ', ' डॉक्टर डॉक्टर ' आणि ' ढिशक्यांव ' यांसारख्या चित्रपटांनंतर ' अल्याड पल्याड ' आणि ' घबाडकुंड ' या दोन सलग यशस्वी हॉररपटांनी त्यांच्या नावावर बॅक-टू-बॅक हिट्सची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे , ' घबाडकुंड ' च्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स दिले. भय , रहस्य , अॅक्शन , इमोशन आणि थराराचा अनोखा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आण...

अरिहंत अकॅडमी

  अरिहंत अकॅडमीने महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त फी न आकारता शिक्षणामध्ये पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेतला मुंबई, 20  जुलै 2026: अरिहंत अकॅडमी लि कमिटेडने आज जाहीर केले की, ते महेश ट्युटोरियल्सच्या (एमटी एज्युकेअर लिमिटेड) पात्र विद्यार्थ्यांना अध्‍ययन प्रवासात सातत्य राखण्यासाठी शैक्षणिक पाठबळ देत आहेत. अरिहंतसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोपरी आहे आणि म्हणून त्यांनी कोणतीही अतिरिक्त फी न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी त्यांच्या कोर्सेससाठी केवळ उर्वरित फी भरतील. अरिहंत अकॅडमी लागू असलेल्या प्रवेश धोरणांच्या अधीन राहून मुंबई महानगर क्षेत्रातील निवडक अरिहंत अकॅडमी शाखांमध्ये महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन योग्य कोचिंगचे पाठबळ देईल. या पाठबळाचा फायदा इयत्ता ८ वी ते १० वी, ११ वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या जवळपास १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. अखंडित शैक्षणिक तयारीचे महत्त्व ओळखून, विशेषतः बोर्ड परीक्षा आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अ...