Posts

Showing posts from October, 2026

परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी

Image
भारताचे आध्यात्मिक नेतृत्व जागतिक स्तरावर केंद्रस्थानी: परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी यांची जागतिक ध्यान दिन संचालन समितीच्या उपाध्यक्षपदी आणि दक्षिण आशियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई, ऑक्टोबर — जागतिक व्यासपीठावर भारताची वाढती आध्यात्मिक छाप आणि सांस्कृतिक राजनय अधोरेखित करणाऱ्या एका ऐतिहासिक टप्प्याच्या रूपात, आदरणीय भारतीय आध्यात्मिक गुरू आणि हिमालयीन समर्पण ध्यानाचे संस्थापक, परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी यांची जागतिक ध्यान दिन संचालन समितीच्या उपाध्यक्षपदी (Vice Chair) आणि दक्षिण आशिया विभागाच्या अध्यक्षपदी (Chairperson) नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ‘जागतिक ध्यान दिन संघटना’ (World Meditation Day Association) आणि ‘जागतिक ध्यान फाउंडेशन’ (World Meditation Foundation) यांच्यातील संयुक्त कराराद्वारे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. लिक्टेनस्टाइनचे प्रतिनिधित्व करणारे कार्यवाहक अध्यक्ष एनरिको सोम्मा यांच्यासह जागतिक स्तरावरील मान्यवरांच्या समवेत, स्वामीजी या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय समितीत प्रमुख प्रस्तावक राष्ट्र म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करतात. ही महत्त्वपूर्ण नियुक...

मैत्रीच्या अनोख्या दुनियेची सफर घडवणारं ‘मैत्रेया’

Image
 मैत्रीच्या अनोख्या दुनियेची सफर घडवणारं ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित! मस्ती आणि प्रेमाच्या रंगांनी सजलेल्या या गाण्याला सिद्धांत भोसले - क्रांती रेडकर यांच्या आवाजाची साथ! मैत्री म्हणजे नुसती सोबत नाही, तर एकमेकांसोबत केलेली धमाल, मनमोकळ्या गप्पा, खोड्या, रुसवे-फुगवे आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा असंख्य आठवणी! मैत्रीच्या याच अनोख्या दुनियेची सफर घडवणारं ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मित्र- मैत्रिणींसोबतच्या बेधुंद क्षणांपासून प्रेमाच्या हळुवार भावनांपर्यंतचे विविध रंग उलगडणारं हे गाणं तरुणाईच्या भावविश्वाशी नातं जोडणारं आहे. मैत्रीचा मोकळेपणा, एकत्र असण्याचा आनंद आणि नात्यांमधून फुलणारा जिव्हाळा यांची सुंदर गुंफण या गाण्यात पाहायला मिळते. मित्रांसोबत केलेली मजा, एकमेकांची खेचलेली फिरकी, छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चेष्टामस्करी आणि प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभं राहाण्याची भावना अशा मैत्रीच्या अनेक छटा या टायटल साँगमधून अनुभवायला मिळतात. या धमाल-मस्तीच्या वातावरणात प्रेमाचीही हळुवार झलक पाहायला मिळते. मैत्रीच्या...

ठाण्यातील गावदेवी मैदानात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’

Image
 ठाण्यातील गावदेवी मैदानात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’चा भक्ती-संगीताचा उत्सव! पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ बँडची खास प्रस्तुती महाराष्ट्राच्या लोककला आणि भक्ती-संगीताचा अनुभव घेण्याची संधी ठाणेकरांना आता लवकरच मिळणार आहे. झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गावदेवी मैदानात होणार असून पारंपरिक लोककला आणि आजच्या संगीताचा संगम साधणाऱ्या या महोत्सवात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांचे तारपा वादन हे प्रमुख आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर ‘अभंग रिपोस्ट’ बँडच्या खास सादरीकरणातून भक्ती-संगीताचा आधुनिक अंदाज अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या आदिवासी लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या तारपा वादनाला या महोत्सवाच्या माध्यमातून विशेष स्थान मिळणार आहे. पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या सादरीकरणातून ठाणेकरांना या पारंपरिक कलेचा अनुभव घेता येईल. स्थानिक लोककला आणि कलाकारांना मोठ्या मंचावर आणण्याच्या ‘नादोत्सवम’च्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख नव्या पि...
  ‘ सहलीला जायाचा..जायाचा सहलीला!’ म्हणत झी मराठी अवॉर्ड्स   २०२६ चा रंगला नामांकन सोहळा कलाकारांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा गौरव करणारा ‘ झी मराठी अवॉर्ड्स २०२६ ’ हा छोट्या पडद्यावरील एक मानाचा सोहळा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही या पुरस्कार सोहळ्याची कलाकारांसोबतच प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ च्या नामांकन सोहळ्यातही हीच उत्सुकता , उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. ‘सहलीला जायाचा..जायाचा सहलीला!’ या थीमवर झालेल्या या सोहळ्यात झी मराठी परिवारातील कलाकारांनी आपल्या हटके आणि स्टायलिश अंदाजाने रेड कार्पेटवर रंगत आणली. यंदाच्या थीमला साजेसा फुलांचा बहर , पेस्टल रंग आणि फ्रेश लूक्स असा कलाकारांचा अंदाज पाहायला मिळाला. अनेक कलाकारांनी आपल्या लूकमध्ये खास प्रयोग करत स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवली. काहींनी खास डिझाइन केलेले पोशाख परिधान केले , तर काही कलाकारांनी हटके अॅक्सेसरीजने आपला लूक उठावदार केला. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मधील तेजश्री प्रधान म्हणजेच स्वानंदीने सुंदर साडीतील एलिगंट अंदाजात उपस्थिती लावली. तर केतकी कुलकर्णीच्य...

Mumbai Open ITF Men’s M25 Tennis Championship

Image
  Dhakshineswar Suresh, Arnav Paparkar and Digvijay Pratap Singh Advance at Mumbai Open ITF Men’s M25 Mumbai, 21 October 2026: Indian players delivered strong performances at the Mumbai Open ITF Men’s M25 Tennis Championship, being held at the Maharashtra State Lawn Tennis Association (MSLTA) courts in Mumbai, as the men’s singles first round and doubles Round of 16 concluded today.   Top seed Dhakshineswar Suresh led the Indian charge in singles with a dominant 6-0, 6-0 victory over Kazakhstan’s Grigoriy Lomakin. Arnav Paparkar also progressed after leading S. D. Prajwal Dev 6-3, 1-0, when his opponent conceded.   Seventh seed Sidharth Rawat defeated Dev Javia 7-6(2), 6-3, while fourth seed Digvijay Pratap Singh overcame Maan Kesharwani 6-3, 6-4. Adil Kalyanpur advanced with a 6-2, 6-1 win over Aditya Balsekar.   In other singles matches, sixth seed Samir Banerjee of the USA defeated Sweden’s William Rejchtman Vinciguerra 6-4, 6-3, while Thailand’s Thanapet Chanta b...

रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’चं नवं पोस्टर चर्चेत!

Image
कपाळावर चंद्रकोर...नजरेत अनेक अनुत्तरित प्रश्न… रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’चं नवं पोस्टर चर्चेत! २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत उलगडणार कहाणी! कपाळावर लाल चंद्रकोर… डोळ्यांत एक वेगळीच चमक... आणि अशी नजर, जणू तिला काहीतरी सांगायचंय ! रिंकू राजगुरूच्या या नजरेमागची गोष्ट नेमकी काय, असा प्रश्न उपस्थित करणारं ‘जिजाई’ या आगामी मराठी चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पोस्टरमध्ये रिंकूचे डोळेच जणू या कथेची पहिली झलक देत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल होणार आहे. पोस्टरमध्ये रिंकूचा संपूर्ण चेहरा न दाखवता तिचे डोळे आणि कपाळावरील लाल चंद्रकोर यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. तिच्या डोळ्यांतील बोलकेपणा, चेहऱ्यावर पडणारा प्रकाश यामुळे पोस्टरला एक वेगळीच दृश्यात्मक ताकद मिळाली आहे. सोनेरी अक्षरांतील ‘जिजाई’ हे शीर्षकही लक्ष वेधून घेतं. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेची झलक मिळत असली तरी रिंकूची व्यक्तिरेखा नेमकी कोणती, तिच्या कपाळावरील चंद्रकोरीचं महत्त्व काय आणि तिच्या नजरेतून कोणत...

धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार

Image
 धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार टीझरमधून समोर आला ललित प्रभाकरचा दमदार लूक विद्रोही कविता, व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज आणि दलित पँथर चळवळीचा धगधगता इतिहास… पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ एका कवीचा जीवनप्रवास नाही, तर अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या विचारांची क्रांती! हेच वादळी व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर उलगडणाऱ्या ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाचा टीझर नागपूर येथे आयोजिलेल्या धम्मा फेस्टिव्हलच्या भव्य व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधून अभिनेता ललित प्रभाकर याने साकारलेल्या नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बंडखोर विचार, परखड लेखणी आणि सामाजिक वास्तवाला भिडणारी कविता यांच्या जोरावर मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या नामदेव ढसाळ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर कसा उलगडणार, याची उत्सुकता या टीझरमुळे अधिकच वाढली आहे. संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वरुणा मदनलाल राणा, संजय पांडे यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे...

एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ

Image
  SFC एनव्हायर्न्मेंटल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २७ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडणार   किंमतपट्टा प्रति समभाग ३१३ ते ३३० रुपये निश्चित ( डावीकडून उजवीकडे) श्री. संदीप असोलकर, सीएमडी, श्री. अमित सावंत, सीएफओ, मुंबईत एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओ लाँचप्रसंगी.) SFC एनव्हायर्न्मेंटल टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी ( आयपीओ ) प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति समभागासाठी ३१३ /- ते ३३० /- रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे . कंपनीची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (" आयपीओ " किंवा " ऑफर ") सबस्क्रिप्शनसाठी मंगळवार , २७ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडेल आणि गुरुवार , २९ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल . गुंतवणूकदार किमान ४५ समभागांसाठी आणि त्यानंतर ४५ समभागांच्या पटीत बोली लावू शकतात . सध्या या तारखेपर्यंत कंपनीकडे   २ रुपये दर्शनी मूल्याचे एकूण ९३ , ४११ , २७० समभाग आऊटस्टॅडिंग आहेत . २ रुपये दर्शनी मूल्य असलेला हा आयपीओ , १ , ५०० . ०० दशलक्ष रुपयांपर्यंतचा फ्रेश ...