'महाराष्ट्र एपस्टीन फाइल' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाव्दारे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी विशेष आवाहन
श्रध्देच्या नावाखाली होणारी फसवणूक, भोंदूगिरी आणि महिलांचे शोषण या विरोधात जनजागृती करण्याचा संदेश देणारा 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाव्दारे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी विशेष आवाहन केले आहे.
मुंबई : श्रद्धेच्या नावाखाली होणारी फसवणूक, भोंदूगिरी आणि महिलांचे शोषण यांविरोधात जनजागृती करण्याचा संदेश देणारा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी चित्रपटाच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकत सामान्य नागरिकांनी फसवणुकीपासून सावध राहावे आणि माता-भगिनींनी भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन केले. देवेंद्र भाट, सूर्यकांत कुंडे आणि प्रशांत कदम पुरे निर्मित या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आनंदी पिक्चर्स, अमरावती आणि सचिन रोडे पाटील आहेत. मनोरंजनासोबत समाजप्रबोधन करणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहावा, असे आवाहन चित्रपटाच्या टीमने केले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात श्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याचे अनेक प्रकार सातत्याने समोर येत असतात. विशेषतः माता-भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला किंवा शोषणाला बळी पडू नये, तसेच समाजात योग्य विचारांची रुजवण व्हावी, या सामाजिक उद्देशाने ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. केवळ मनोरंजन न करता समाजाला विचार करायला लावणे आणि जनजागृती घडवून आणणे, हा या चित्रपटामागील मुख्य हेतू आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील फरक अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेऊन सामान्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींविषयी समाजाने जागरूक राहणे आवश्यक आहे. अशा घटनांमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान होते. त्यामुळे या विषयावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल’ या चित्रपटाच्या विशेष कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी चित्रपटाच्या विषयाचे महत्त्व आणि त्यामागील सामाजिक संदेश अधोरेखित केला. सामान्य नागरिकांना श्रद्धेच्या नावाखाली कुणीही फसवू नये, तसेच माता-भगिनींनी भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी समाजात प्रबोधन आणि जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटनांविषयी समाजाने सजग राहावे आणि चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या चित्रपटाचे निर्माते देवेंद्र भाट, सूर्यकांत कुंडे आणि प्रशांत कदम पुरे आहेत. तर आनंदी पिक्चर्स, अमरावती आणि सचिन रोडे पाटील हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सामाजिक विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे.
मनोरंजनासोबतच सामाजिक भान जपणारा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल’ हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि समाजप्रबोधनाच्या या उपक्रमाला साथ द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्यासह चित्रपटाच्या टीमच्या वतीने करण्यात आले. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments
Post a Comment