वीस वर्षीय यशने उभारले भारतातील मोठे थ्रीडी इलेव्हिजन म्युझियम

आपल्या हुशारीलाकल्पकतेला टेक्नॉलॉजीची जोड देत आजची पिढी सृजनात्मक गोष्टी करत आहे. वेगवेगळ्या कल्पना राबवून भन्नाट नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. या यादीत वीस वर्षीय यश राजेंद्र पाटील व कला क्षेत्रातील त्याचा मित्र सचिन कुटे यांचा समावेश झाला आहे. तरुणाईची फोटो काढण्याची वाढती क्रेझ लक्षात घेऊन त्या संदर्भात उत्तम संकल्पना राबवून या दोघांनी फोटोप्रेमींसाठी नवं दालन खुलं केलं आहे.

पर्यटक लोणावळ्या सारख्या निसर्गयरम्य पर्यटनस्थळी येऊन फोटो, रील्स काढत असतात. या विचारातून या दोघांच्या मनात एक कल्पना आली कीकल्पक आर्ट इल्यूशन (illusion) च्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांसाठी काही तरी वेगळे करून दाखवायचे. त्यातूनच थ्रीडी आर्ट व इल्यूशन म्युझियमची कल्पना आकाराला आली. यशाच्या या कल्पनेला साथ देण्यासाठी त्याची आई रमेश पाटीलवडील राजेंद्र पाटील आणि मित्र सचिन कुटे यांनी पुढाकार घेतला.

थ्रीडी आर्ट इल्यूशन म्युझियमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे थ्रीडी पेंटिंग तसेच नवीन टेक्नॉलॉजीएलइडी वॉलइल्यूशन ट्रिक्स याचा डिस्प्ले वापरून फोटो व रील्सच्या माध्यमातून ऍडवेंचर फोटोफँटसी फन फोटो काढता येऊ शकतात. या म्युझियम मध्ये वेगवेगळ्या संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. नवीन तंत्रज्ञान व कलेची सांगड घालून सुमारे ४०० फूट एवढया कॅनव्हासवर पेन्टिंग्स केले आहेत. अशा प्रकारचं भारतातील हे पहिलंच म्युझियम आहे.

यश पाटील यांनी साकारलेल्या म्युझियमला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील फिल्मसिटी मध्ये बॉलीवूड टुरिझम चालवत असलेल्या संतोष मिजगर यांच्या 'स्टारक्राफ्ट मनोरंजनआणि 'मॉस युटीलिटी 'कंपनीने पुढाकार घेतला आहे. आपल्या पंधरा वर्षाच्या अनुभवाचा उपयोग यश आणि त्याच्या सहकाऱ्यांना हा उपक्रम राबवण्यासाठी व्हावा यासाठी आम्ही या संकल्पनेला पाठिंबा दिल्याचे संतोष मिजगर सांगतात. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी या म्युझियमला एकदा तरी भेट देत पूर्ण ट्रिक व्हिजन टीम ला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी  केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..