एण्‍ड टीव्‍हीवरील नवीन मालिका 'भीमा' पाहायला न चुकवण्‍याची अव्‍वल कारणे!

एण्‍ड टीव्‍हीवरील सामाजिक ड्रामा 'भीमा' तरूण मुलगी 'भीमा'च्‍या लक्षवेधक कथेला आणि समान अधिकार मिळवण्‍याच्‍या तिच्‍या प्रवासाला सादर करते. ६ ऑगस्‍ट २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता प्रीमियरसाठी सज्‍ज असलेली मालिका 'भीमा' राज खत्री प्रोडक्‍शन्‍सद्वारे निर्मित आहे. ही मालिका १९८०च्‍या दशकात स्थित आहे आणि प्रबळ कथानक, तसेच सर्वोत्तम व विशिष्‍ट पात्रांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. मालिका 'भीमा' टेलिव्हिजनवरील सर्वात सर्वसमावेशक मालिका असण्‍यामागील कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

1)      स्थिरता व अवहेलनाचा प्रवास: मालिका 'भीमा' तरूण मुलगी 'भीमा'च्‍या हृदयस्‍पर्शी, पण प्रेरणादायी प्रवासाला दाखवते. या मालिकेत प्रतिभावान तेजस्विनी सिंगने भीमाची भूमिका साकारली आहे. भीमाच्‍या जीवनामधून न्‍यायाप्रती अविरत प्रयत्‍न दिसून येतात. ही मालिका कुटुंब, समाज आणि आर्थिक स्थितीमुळे सामना कराव्‍या लागणाऱ्या विषमतांविरोधातील तिच्‍या संघर्षांना सुरेखपणे सादर करते. अनेक अन्‍याय व भेदभावांचा सामना केल्‍यानंतर देखील ती नीडरपणे या अडथळ्यांवर मात करण्‍याचा प्रयत्‍न करते. 

2)      १९८०च्‍या दशकातील ग्रामीण स्थितीची झलक: काल्‍पनिक, पण लक्षवेधक कथानकाला १९८०च्‍या दशकातील ग्रामीण स्थितीला दाखवत अधिक रोचक करण्‍यात आले आहे, जेथे त्‍या काळातील सामाजिक-आर्थिक स्थिती व सांस्‍कृतिक गतीशीलतांना दाखवण्‍यात आले आहे. तो काळ कथानकामध्‍ये अधिक रोमांचकतेची भर करतो, ज्‍यामुळे पात्रांचे संघर्ष व यश अधिक लक्षवेधक बनतात.

3)      प्रभावित करणारे पात्र: मालिकेमध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत जसे भीमाचे सहाय्यक व संघर्षग्रस्‍त वडिल मेवाच्‍या भूमिकेत अमित भारद्वाज आणि तिची पालनपोषण करणारी आई धनियाच्‍या भूमिकेत स्मिता साबळे. नीता मोहिंद्रा यांनी कैलाशा बुआची भूमिका साकारली आहे आणि माया शर्मा यांनी जिल्‍हा दंडाधिकारीची (डीएम) भूमिका साकारली आहे, जेथे प्रत्‍येक पात्र कथानकामध्‍ये मोठे योगदान देते. 

4)      डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्‍या वारसाला मानवंदना: मालिका 'भीमा'ची खासियत म्‍हणजे भारतीय संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्‍या कायदा व आदर्शाप्रती तरूण भीमाची अविरत कटिबद्धता. भीमा व्‍यापक सामाजिक रूढी, भेदभाव आणि दडपशाहीविरोधात लढ्यासाठी ओळखली जाते, ज्‍यामधून संविधानामध्‍ये असलेल्‍या समानतेच्‍या तत्त्‍वांना कायम ठेवण्‍याप्रती तिच्‍या मिशनला अधिक चालना मिळते. प्रबळ महासत्ताधारींचा प्रचंड विरोध असताना देखील भीमाचा आपल्‍या अधिकारांसाठी लढण्‍याचा निर्धार कायम राहतो.

5)      आई-मुलीचे नाते: मालिका 'भीमा'मधील सर्वात लक्षवेधक पैलू म्‍हणजे आई-मुलीचे नाते. धनियाला आपल्‍या मुलीचे भविष्‍य व सुरक्षिततेबाबत भिती वाटते, तर भीमाचा निर्धार अतूट असतो, ज्‍यामधून गतीशीलता निर्माण होते, जी मार्मिक व शक्तिशाली आहे. त्‍यांच्‍यामधील परस्‍परसंवादांमधून पिढ्यानपिढ्या तणाव आणि सामायिक स्‍वप्‍ने दिसून येतात, जे कथानकाला पुढे घेऊन जातात.

6)      पाहिलाच पाहिजे असा सामजिक ड्रामा: मालिका 'भीमा' प्रदर्शित होण्‍यास सज्‍ज असताना प्रेक्षक मनोरंजनात्‍मक कथानकाची, तसेच आशा, निर्धार व परिवर्तनाच्‍या वैश्विक थीम्‍सना दाखवत सामाजिक अडथळ्यांवर दूर करणाऱ्या लक्षवेधक कथानकाची अपेक्षा करू शकतात. ही मालिका तिचे सर्वसमावेशक कथानक आणि सर्वोत्तम पात्रांमुळे इतरांपेक्षा वरचढ आहे. भीमाची आव्‍हाने व विजय प्रेक्षकांशी संलग्‍न होतील, ज्‍यामुळे तिचा प्रवास प्रेरणादायी व आपलासा वाटणारा आहे. 

पहा मालिका 'भीमा' रात्री ८.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..