खतरनाक खलनायक मराठीत

 खतरनाक खलनायक मराठीत

चित्रपटामध्ये नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकेच महत्त्व आहे. खरंतर या खलनायकांमुळेच नायकाचे अस्तित्व असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. आगामी फौजी’ या मराठी चित्रपटात हिंदीतील शाहबाज खान आणि टिनू वर्मा या दोन सशक्त अभिनेत्यांची झलक आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते आपला खलनायकी अवतार दाखविण्यास सज्ज झाले आहेत. मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम विष्णुपंत येडे निर्मित- लिखित-दिग्दर्शित फौजी हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल  होत आहे.

फ़ाइट मास्टर’ म्हणून टिनू वर्मा यांची हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख आहे.  शाहबाज खान यांनी  छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक लोकप्रिय खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. फौजी या चित्रपटात अतिशय धूर्तनिर्दयी रूपात हे दोन्ही खलनायक दिसणार आहेत. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना हे दोन्ही कलाकार सांगतात किजबरदस्त अॅक्शन यात असून निर्ढावलेला खलनायक आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतो. अशा प्रकारच्या भूमिकांसाठी एक प्रकारचा आवेग असतो तो यात असून शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर आम्ही या भूमिकेत रंग भरले आहेत. प्रेक्षकांना ते पहायला नक्कीच आवडतील असा विश्वास या दोन्ही कलाकारांनी व्यक्त केला. 

फौजी चित्रपटात या दोघांसोबत सौरभ गोखलेप्राजक्ता गायकवाडअरुण नलावडेनागेश भोसलेसंजय खापरेअश्विनी कासारसिद्वेश्वर झाडबुकेहंसराज जगतापविवेक चाबुकस्वारसुनील गोडबोलेरोहित चव्हाणप्रग्या नयनजान्हवी व्यासकल्याणी चौधरीमंजुषा खत्री, घनशाम येडे हे कलाकार आहेत. 

चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे आहेत. सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांचे आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकरडॉ. शंकर तलबेउद्धव गावडेअशोक गाढेराजेश चव्हाणगणेश गुंजाळएस.पी. गावडेज्योतीराम घाडगेकुमार परदेशींराजेंद्र कर्णे प्रविण बुरुंगे याचे आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..