गार्नियरचा क्रांतीकारी उत्पादनासह सनकेयर क्षेत्रात प्रवेश

गार्नियरचा क्रांतीकारी उत्पादनासह सनकेयर क्षेत्रात प्रवेश

नवीन सुपर युव्ही इनव्हिजिबल सिरम सनस्क्रीनतर्फे गार्नियरची भारतातील चोखंदळ ग्राहकांना दर्जेदार, वैविध्यपूर्ण आणि ट्रेंडसेटिंग उत्पादने पुरवण्याची बांधिलकी अधोरेखित

मुंबई सप्टेंबर २०२४ – गार्नियर या पर्यावरणपूरक सौंदर्य उत्पादन क्षेत्रातील कंपनीने सुपर युव्ही इनव्हिजिबल सिरम सनस्क्रीन हे क्रांतीकारी उत्पादन लाँच करत सनकेयर क्षेत्रात प्रवेश केला आहे. याचा लाइटवेट फॉर्म्युला एसपी३५० आणि पीए++++ सह चांगल्या प्रकारचे संरक्षण देतो व त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करतो. क जीवनसत्वाचा समावेश असलेलं हे सनस्क्रीन त्वचेचं संरक्षण करतंचशिवाय काळे डागही कमी करतं. त्याशिवाय ब्रँडने क्रांतीकारी सुपर युव्ही इनव्हिजिबल एयर- मिस्ट सनस्क्रीन लाँच केले आहेजे अगदी सहजपणे मेकअपवर लावता येतं. दोन्ही उत्पादने त्वचेवर पांढरा थर तयार करत नाहीत आणि ते बहुतेक सर्व भारतीय त्वचाप्रकारांसाठी योग्य आहे. रोजच्या वापरासाठी तसेच उच्च दर्जाची कामगिरी अपेक्षित असणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. या लाँचसह गार्नियरने सर्वात मोठ्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या एका क्षेत्रात प्रवेश करत त्वचासुरक्षा क्षेत्रातील आपले स्थान मजबूत केले आहे.

भारतामध्ये युव्हीचे प्रमाण जास्त असून वर्षभर युव्ही इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे सनकेयर उत्पादने आवश्यक झाली असलीतरी कित्येक भारतीयांमध्ये त्याचा दैनंदिन वापर करण्याचे प्रमाण नगण्य आहे. सुपर युव्ही सनस्क्रीन्स लाँच करत गार्नियरने प्रत्येक सीझनमध्ये सनस्क्रीनचा वापर करणे महत्त्वाचे असल्याविषयी जागरूकता पसरवण्याचे ध्येय ठेवले आहे.

गार्नियर लॉरियल इंडियाचे व्यवस्थापक अंशुमन वांचू म्हणाले, भारतीय प्रकारच्या त्वचेसाठी खास तयार करण्यात आलेले गार्नियर सुपर युव्ही सनस्क्रीन्स लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढत असून गार्नियर आपल्या जागतिक कौशल्यांच्या मदतीने प्रभावीलाइटवेटवापरण्यास सोपी व सहज मिळू शकणारी उत्पादने लाँच करत आहे. ब्रँडसाठी हा विक्रमी टप्पा असून त्यातून सर्व ग्राहकांना दर्जेदार सौंदर्यउत्पादने उपलब्ध करून देण्याची आमची बांधिलकी जपली जात आहे. या लाँचला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक मार्केटिंग धोरण तयार केले आहेज्यामध्ये डिजिटल आणि पारंपरिक प्लॅटफॉर्म्सइनफ्लुएन्सर कोलॅबरेशन्स आणि प्रत्यक्ष उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

गार्नियर इंडिया ब्रँड अम्बेसिडर पूजा हेगडे म्हणाल्या, ऋतू कोणताही असलातरी दररोज एसपीएफ वापरण्यावर माझा भर असतो. गार्नियर सुपर युव्ही सनस्क्रीन्स लावल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही. हे उत्पादन त्वचेवर हलके वाटते. परत परत वापरण्यासाठी तसेच मेकअपवर लावण्यासाठी नाविन्यपूर्ण इनव्हिजिबल एयर मिस्ट सनस्क्रीनला मी पसंती देते. ग्राहकांनी हे क्रांतीकारी सनस्क्रीन्स वापरावे म्हणून मी उत्सुक आहे.

गार्नियर इंडियाचे नुकतेच जाहीर करण्यात आलेले ब्रँड अम्बेसिडर वेदांग रैना म्हणाले, त्वचेची काळजी घेण्याविषयी गार्नियरचा दृष्टीकोन रोजचं स्किनकेयर सोपंप्रभावी असण्याच्या माझ्या धोरणाशी सुसंगत आहे. गार्नियर सुपर युव्ही सनस्क्रीन्स सूर्यकिरणांपासून प्रभावी संरक्षण करणाऱ्या आणि तरीही त्वचेवर लाइटवेट भासणाऱ्या उत्पादनांच्या शोधात असलेल्यांसाठी योग्य आहे. सनकेयरसारख्या क्षेत्रात प्रवेश करत असलेल्या गार्नियरच्या या नव्या प्रवासात सामील होताना मला आनंद वाटत आहे.

 

गार्नियर सुपर युव्ही इन्व्हिजिबल सिरम आणि सुपर युव्ही एयर मिस्ट सनस्क्रीन आता विविध दालने आणि ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनुक्रमे ३४९ आणि ५४९ रुपयांत उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..