‘वाडा चिरेबंदी’ ला अमेरिकेत जोरदार प्रतिसाद

वाडा चिरेबंदी ला अमेरिकेत जोरदार प्रतिसाद

प्रेक्षकसमीक्षक आणि मान्यवरांनी एकमुखाने गौरवलेल्या वाडा चिरेबंदी  या नाटकाला अमेरिकेतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सध्या वाडा चिरेबंदी नाटकाचा अमेरिका दौरा सुरू असून या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होतायेत. या दौऱ्यातील प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दि. ९ मे वॉशिंग्टन डिसीदि. १० मे डेट्रॉईटदि. ११ मे शिकागोदि. १६ मे ऑस्टीनदि. १७ मे डलासदि. १८ मे लॉस एन्जलीसदि. २३ मे सॅन डियागो आणि दि. २५ मे सॅन जोसे. येथे पुढील प्रयोग होणार आहेत.

बदलती एकत्र कुटुंब पद्धतीबदलता काळ त्यासोबत बदलते नातेसंबंध असा भावभावनांचा भव्यपट रंगमंचावर बघणं म्हणजे  आम्हां नाट्य रसिकांसाठी पर्वणीच होतीअशा शब्दांत अमेरिकेतील नाट्यरसिकांनी या नाट्यकृतीचे कौतुक केले. अमेरिकेत अनेक संस्था मराठी नाटकांचे आयोजन करतात. त्यांच्या या उत्साहाला प्रतिसाद देत रंजनाचा आनंद त्यांना द्यावा या भावनेने आम्ही हे समारोपाचे प्रयोग अमेरिकेत सादर केल्याचे निर्माता, दिग्दर्शकांनी सांगितले. अमेरिकेत स्थायिक असलेले शैलेश शेट्ये आणि प्रमोद पाटील यांच्या 'फाईव्ह डायमेन्शन्सया संस्थेने हा दौरा आयोजित केला आहे.

'जिगीषा-अष्टविनायकनिर्मितमहेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'वाडा चिरेबंदी' नाटकात निवेदिता सराफपौर्णिमा मनोहरप्रतिमा जोशीराजश्री गढीकरधनंजय सरदेशपांडेविनिता शिंदेअजिंक्य ननावरेसिमरन सैद आणि वैभव मांगले व प्रसाद ओक या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिलीप जाधवश्रीपाद पद्माकर या नाटकाचे  निर्माते आहेत.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K