झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्सचा शोध.

 'झी रायटर्स रुम'च्या माध्यमातून देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीन रायटर्सच शोध

१५ जुलै २०२५, मुंबई – झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झी) हे अग्रगण्य कंटेंट आणि तंत्रज्ञान पॉवरहाऊस.  ‘झी रायटर्स रूम’ ची अभिमानाने घोषणा करत आहेत. हा एक लॅन्डमार्क उपक्रम असून यातून देशभरातील युवा आणि भावी पटकथालेखकांना शोधून त्यांचे संवर्धन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्‌य आहे. 'झी रायटर्स रूम' हा केवळ एक टॅलेंट हंट नाही, तर 'युअर्स ट्रुली, झी' या कंपनीच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी सुसंगत असलेली एक सर्जनशील चळवळ आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवरील झीच्या कंटेंटचा दर्जा उंचावण्याचा हा उपक्रम आहे. नव्या दृष्टिकोनांची मागणी असलेल्या या काळात, या उपक्रमाचा उद्देश हा अस्सल कथा सांगण्याची क्षमता असलेल्या नवोदितांना व्यावसायिक पटकथालेखनाच्या जगाशी जोडणे हा आहे. या माध्यमातून निवडले गेलेले लेखक झीच्या टीव्ही, डिजिटल आणि चित्रपट प्लॅटफॉर्म्ससाठी कथा लिहिण्याची संधी मिळवू शकतील.

‘झी’च्या सेंट्रल कंटेंट आणि प्रादेशिक टीम्सच्या पुढाकाराने राबवण्यात येणारा हा उपक्रम, भारताच्या सातत्याने विकसित होत असलेल्या मनोरंजन विश्वाच्या गरजा आणि देशभरातील न टिपल्या गेलेल्या प्रतिभा यांच्यातील दुवा साधण्याचे काम करणार आहे. 'झी रायटर्स रूम' या उपक्रमाची घोषणा सात भारतीय भाषांमध्ये करण्यात आलेल्या मनाला भिडणाऱ्या ब्रँड फिल्मद्वारे करण्यात आली. या फिल्मच्या उद्देश एकच आहे "उद्याचे लेखक घडवणे." ही एकसंध अशी दूरदृष्टी या फिल्मच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

८०  शहरांमध्ये आणि ३२ कार्यक्रम केंद्रांमध्ये राबवला जाणारा हा उपक्रम ऑन-एअर, डिजिटल आणि ऑन-ग्राऊंड प्लॅटफॉर्म्सवरून चालवलेल्या जोरदार प्रचार मोहिमेमुळे आणखी प्रभावी ठरत आहे. या उपक्रमाचा उद्देश मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधील प्रतिभावान कथाकारांना शोधून त्यांना एक अद्वितीय संधी देणे हाच आहे — ही एक अशी सहयोगी रायटर्स रूम आहे जिथे कल्पकता, शिस्त आणि रचनात्मक कलेला वाव मिळेल.

Watch the brand film here: Zee Writer’s Room Brand Film 

या उपक्रमाबद्दल बोलताना झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर राघवेंद्र हुंसूर म्हणाले, "भारतातील सर्वात मोठ्या स्टोरीटेलर्सपैकी एक म्हणून, पुढच्या पिढीतील लेखन प्रतिभेला घडवणे ही केवळ आमच्यासाठी संधी नाही, तर आमची जबाबदारी आहे. झीमध्ये आम्ही मानतो की आमची खरी ताकद केवळ आम्ही सांगत असलेल्या कथांमध्ये नाही, तर त्या कथा सांगणाऱ्या लेखकांमध्ये आहे – जे आम्ही शोधतो आणि घडवतो. ‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून आम्ही एक असे व्यासपीठ तयार करत आहोत जिथे अस्सल आवाज, न ऐकले गेलेल्या कल्पना आणि प्रामाणिक भावनांना स्वतःचा आकार मिळू शकेल. हा कार्यक्रम स्पर्धात्मक नाही – ही आमची बांधिलकी आहे, भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या लेखकांना योग्य साधने, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास देण्याची, जेणेकरून ते कालातीत अशा प्रभावी कथा सर्व स्क्रीनवर, सर्व प्रांतांमध्ये, सर्व शैलींमध्ये तयार करू शकतील - आमचे काम म्हणजे नव्या सर्जनशील प्रतिभेला सक्षम बनवणे, त्यांना लेखनकौशल्य, धैर्य आणि संधी देणे. कारण स्टोरीटेलिंगचे भवितव्य हे केवळ आपण काय तयार करतो यावर नाही, तर आपण कोणासोबत तयार करतो यावरही अवलंबून आहे."

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव म्हणाले, "‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून आम्ही आमच्या ब्रँड वचनबद्धतेला आणखी एक पाऊल पुढे नेत आहोत — उत्तम कथाकथनकौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करून आणि अशा लेखकांचा एक समुदाय तयार करून, जे वेगळ्या आणि वैविध्यपूर्ण कथा सांगण्यास आम्हांला मदत करतील. आम्ही एक असे व्यासपीठ निर्माण करत आहोत जे अंतःकरणात लेखनाची खरी धग असलेल्या लेखकांना उद्याचे कथाकार बनण्याचे दरवाजे उघडते."

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या ईस्ट, नॉर्थ, प्रीमियम क्लस्टरचे चीफ क्लस्टर ऑफिसर सम्राट घोष म्हणाले, “बंगाल ही नेहमीच साहित्यिक आणि सिनेमॅटिक प्रतिभेचे केंद्र राहिले आहे. ‘झी रायटर्स रूम’सह उदयोन्मुख बंगाली कथानाककारांसाठी आम्ही एक आधुनिक व्यासपीठ उभे करत आहोत जिथे त्यांना आपला आवाज सापडेल आणि अशा कथा तयार करता येतील ज्या परंपरेची समृद्धता आणि आधुनिकतेची जाण दोन्ही अधोरेखित करतील."

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या साउथ आणि वेस्ट क्लस्टरचे चीफ क्लस्टर ऑफिसर सिजू प्रभाकरन म्हणाले, "दक्षिण आणि पश्चिम भारत हे देशातील सर्वाधिक समृद्ध आणि सर्जनशील कथाकथन परंपरांचे माहेरघर आहे. ‘झी रायटर्स रूम’ टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट अशा सर्व माध्यमांवर कंटेंट निर्मितीमध्ये ऊर्जा आणि सर्जनशीलता आणण्यास मदत करेल." स्व-अध्ययनातून विकसित झालेल्या किंवा औपचारिक शिक्षणातून स्वतःमध्ये आधीच सर्जनशीलतेची ठिणगी असलेल्या लेखकांसाठी खास तयार करण्यात आलेला ‘झी रायटर्स रूम’ हा उपक्रम कॉलेज फेस्टिव्हल्स, रायटिंग क्लब्स किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आपली चमक दाखवलेल्या पण अद्याप या या मनोरंजन विश्वात न आलेल्या प्रतिभेचे आम्ही स्वागत करतो. हा उपक्रम लेखनाच्या प्राथमिकता शिकवण्यासाठी नाही, तर ज्यांच्यात क्षमता आहे अशा लेखकांना प्रोफेशनल स्क्रीनरायटर्समध्ये घडवण्यासाठी, त्यांचे कौशल्य शिस्तबद्धपणे विकसित करण्यासाठी आहे.

ह्या ७० नवोदित लेखक आणि ३० उदयोन्मुख तज्ज्ञ लेखक कलाकारांना आणि त्यांच्या संकल्पनांना टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट माध्यमांमध्ये जोडण्यासाठी झी कटिबद्ध आहे. या नवोदित लेखकांना झीच्या कंटेंटसाठी नव्या कथा, आकर्षक नवीन जग, प्रभावी पात्ररचना आणि बांधेसूद कथानकांमध्ये रूपांतरित करणाऱ्या एका आयडिया-जेनरेशन इंजिनमध्ये घडवले जाईल. नोंदणीसाठी भेट द्या: [www.zeewritersroom.com]

प्रत्येक सहभागी लेखकाला खालील प्रक्रियेतून जावे लागेल:

• लेखी चाचणी: नोंदणी केलेल्या सहभागींच्या निवड कार्यक्रमादरम्यान लेखी परीक्षा घेतली जाईल.

• सादरीकरणाचे मूल्यमापन: लेखन गुणवत्तेच्या आधारे एक रीडिंग कमिटी सर्वोत्तम १० टक्के उमेदवारांची निवड करेल.

• मुलाखत प्रक्रिया: अंतिम फेरीत पोहोचलेल्या उमेदवारांचे मूल्यमापन या क्षेत्रातील तज्ज्ञ पॅनेलद्वारे केले जाईल.

• झी रायटर्स रूममध्ये समावेश: निवड झालेल्या सर्वोत्तम १०० लेखकांना ‘झी रायटर्स रूम’मध्ये सहभागी करून घेतले जाईल, जिथे ते तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली कथा कल्पना विकसित केल्या जातील. 

तर मग वाट कसली पाहताय? उद्याच्या कंटेंटविश्वाचा चेहरा घडवण्यासाठी ‘झी रायटर्स रूम’मध्ये आजच सामील व्हा !

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K