सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई मध्ये विशेष करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास

सिंबायोसिस सेंटर फाँर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई मध्ये विशेष करिअर अँक्सिलरेशन मास्टरक्लास

विविध नोकरदार, पदवीधर, विदयार्थ्यी, कार्यरत व्यावसायिकांसाठी करिअर पुन्हा घडवण्याची सुवर्णसंधी 

मुंबई, २६ जुलै २०२५- सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, मुंबई मध्ये एक विशेष करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास आयोजित करण्यात आले. करिअर समुपदेशन, डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास, एससीडीएल बद्दल सादरीकरण, पुरस्कार वितरण समारंभ, एचआर राउंड टेबल कॉन्फरन्स या विषयावर कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विविध नोकरदार, पदवीधर, प्रारंभिक आणि मध्यम स्तरावरील करियर प्रोफेशनल, माजी विद्यार्थी, कॉर्पोरेट प्रोफेशनल, कॉर्पोरेट एचआर, जे आपले करियर बदलू इच्छितात किंवा करियर मध्ये पुढे जाऊ इच्छितात, यांचा या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

डॉ. स्वाती. एस. मुजुमदार, प्रधान संचालक, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी; सोनाली कदम, उपसंचालक एससीडीएल; निखिल वैद्य, एससीडीएलचे प्रमुख ऑपरेशन्स; शालिनी नायर, विद्यार्थी काळजी प्रमुख; आशिष पंडिता, कॉर्पोरेट प्रमुख; हे उपस्थित होते.

भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त शिक्षण संस्था म्हणून, एससीडीएलने आजवर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले आहे आणि सध्या ८०,००० हून अधिक सक्रिय विद्यार्थी संपूर्ण देशभरातून शिक्षण घेत आहेत. एससीडीएल हे पदवीधर आणि कामकाज करणाऱ्या व्यावसायिकांसाठी विशेषतः डिझाइन केलेले विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.  एससीडीएल (SCDL) ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी दूरस्थ शिक्षण शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. २००१ मध्ये स्थापित, एससीडीएल हे भारत आणि परदेशातील हजारो विद्यार्थ्यांना लवचिक, उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यात अग्रणी आहे.

पुण्याच्या मध्यभागी स्थित, एससीडीएल अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कुशल आणि समर्पित प्राध्यापक आणि प्रगत डिजिटल शिक्षण उपलब्ध आहे. विविध क्षेत्रांमध्ये उद्योग-संबंधित पदव्युत्तर पदविका कार्यक्रम देण्याकरिता एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे. वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमांव्यतिरिक्त, एससीडीएल विशेष कॉर्पोरेट कार्यक्रम ऑफर करण्यासाठी आघाडीच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग देखील करते, याचा एक भाग म्हणून हे सेमिनार घेण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व बाजारात उपलब्ध विविध संधींवर करिअर समुपदेशन करण्यात आले.

डॉ. स्वाती. एस. मुजुमदार, प्रधान संचालक, सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी, म्हणाल्या, "आज या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर इथे उपस्थित कॉर्पोरेट ट्रेनर, माजी विद्यार्थी यांना बघून आनंद होत आहे. १९९५ मध्ये सुरु झालेल्या  सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून एससीडीएलची स्थापना झाली.  शिक्षण घेण्याकरिता आर्म फोर्स मधील फोजी जे पुण्याला येऊ शकत नाहीत त्याच्या करीता काही कोर्स सुरु करण्याचे जनरल आलू वालिया यांनी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. बं. मुजुमदार, यांना सुचवले आणि या संकल्पाने अंतर्गत एससीडीएलची स्थापना करण्यात आली.  २००१ साली सामान्य नागरिक आणि त्याची मुलं यांनी प्रवेश घेतले. २००३ मध्ये मी अमेरिकेमधून परत आल्या नंतर एससीडीएलच काम पाहायला सुरुवात केली, त्यावेळी खूप कमी विद्यर्थी आणि तंत्रज्ञानाचा खूप कमी वापर केला जात होता.  २००३- ०४ साली इ - लर्निंइंग, कॉम्पुटराईस प्रोग्रॅम, कॉम्पुटराईस एक्साम, व ऑन डिमांड एक्साम,  सुरु केले याने भारतातही विविध लोकांना जोडण्यासाठी मदत झाली. सिंबायोसिस हे एका शिक्षकाने सुरु केले आहे.”

“डॉ. शां. बं. मुजुमदार हे एक शिक्षक होते, जेव्हा एखादा बिझनेसमॅन शिक्षण संस्था सुरु करतो आणि एक शिक्षक जेव्हा सुरु करतो या मध्ये खूप मोठे फरक असतो. आज भारत बाहेर हि सिंबायोसिसचे विदयार्थी आहेत.  आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थितांना पाहून अतिशय आनंद होत आहे. "

या प्रेरणादायी सत्रात पुढील प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकला :

एचआर राउंड टेबल कॉन्फरन्स-

एचआर राउंड टेबल कॉन्फरन्स ही मानवी संसाधन (Human Resource) क्षेत्रातील नेतृत्व, उद्योगतज्ज्ञ आणि टॅलेंट मॅनेजमेंट व्यावसायिकांची एक रणनीतिक बैठक झाली. या मंचाच्या माध्यमातून कार्यबल व्यवस्थापन, संस्थात्मक विकास आणि कर्मचारी गुंतवणूक यासंदर्भातील बदलत्या घडामोडींवर विचारमंथन केले गेले. प्रतिभाशोध (Talent Acquisition) आणि टिकवून ठेवण्याच्या रणनीती, कामाचे भविष्य आणि हायब्रिड कार्यपद्धती, विविधता, समावेश आणि समानता (Diversity, Equity & Inclusion), कर्मचारी कल्याण आणि कार्यसंस्कृती, एचआर क्षेत्रातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी तंत्रज्ञानाचा वापर, राउंड टेबल स्वरूपामुळे खुले संवाद, समविचारी नेतृत्व शिकण्याची संधी, आणि त्वरित अंमलात आणता येणाऱ्या कृतीयोग्य निष्कर्ष यावर चर्चा करण्यात आली. 

डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास- 

डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त नेतृत्व विकास कार्यक्रम, जो नेतृत्व कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यावर भर देतो ,  डेल कार्नेगी यांच्या सुप्रसिद्ध पुस्तक "मित्र कसे जिंकायचे आणि लोकांवर प्रभाव कसा टाकायचा" मधील अमूल्य तत्त्वांवर आधारित हा मास्टरक्लास, व्यक्तींना आत्मविश्वासाने नेतृत्व करण्यासाठी, विश्वास निर्माण करण्यासाठी आणि टीमला प्रेरित करण्यासाठी सक्षम करतो. हा कार्यक्रम विशेषतः नेतृत्व गुण वाढवणे, मध्यम स्तरावरील व्यवस्थापक आणि अनुभवी व्यावसायिक यांच्यासाठी उपयुक्त असा ठरला.  प्रभावी व्यक्तिमत्त्व व नातेसंबंध निर्माण करणे, सतत बदलणाऱ्या वातावरणात प्रभावी नेतृत्व करणे, आपल्या ग्रुपची कार्यक्षमता वाढवणे, तणाव व संघर्ष व्यवस्थापन कौशल्ये,अधिकार नसतानाही प्रभाव टाकण्याची कला, संवादात्मक सत्रांद्वारे, प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांद्वारे व प्रसिद्ध फ्रेमवर्क्सच्या माध्यमातून, सहभागी या मास्टरक्लासमधून समज, सहानुभूती आणि प्रभावी नेतृत्व यांची शिदोरी घेऊन बाहेर पडले. 

यावेळी मुंबईमधील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून, एससीडीएल देशभरात करिअर ग्रोथ सेमिनार्सची मालिका आयोजित करत आहे. हा सेमिनार त्याच मालिकेतील एक भाग असून, देशातील तरुण विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी एक मौल्यवान आणि विनामूल्य शिकण्याची संधी निर्माण करत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K