बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम न राखल्यास आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून सवलत
बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम न राखल्यास आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून सवलत
मुंबई: युनियन बँक ऑफ इंडियाने आर्थिक समावेशन व ग्राहक-केंद्रित बँकिंगच्या धोरणाशी सुसंगत अशी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. येणाऱ्या सप्टेंबर २०२५ अखेरीस समाप्त होणाऱ्या तिमाहीपासून, सामान्य बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक न राखल्यास आकारण्यात येणाऱ्या शुल्कामधून सूट देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे ग्राहकांना मूलभूत बँकिंग सेवा समान आणि न्याय्य स्वरूपात उपलब्ध करून देणे, तसेच त्यांची बँकिंग सेवा प्राप्त करण्याची सुलभता वाढविणे. समावेशी विकासास चालना देणे हे आमचे ध्येय असून, वंचित आणि उपेक्षित घटकांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरेल, असा आमचा विश्वास आहे.
प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) खातेधारक, निवृत्तिवेतनधारक, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बचत खात्यांना याआधीच या शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे.
तथापि, ही सवलत बँकेच्या अन्य अनुकूलित उत्पादनांवर लागू नाही आहे.
Comments
Post a Comment