विद्यापीठांनी केवळ शिक्षण नव्हे तर सद्संस्कार आणि सद्भावही द्यावे' सर्वार्थाने सक्षम भावी पिढीसाठी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आवाहन

'विद्यापीठांनी केवळ शिक्षण नव्हे तर सद्संस्कार आणि सद्भावही द्यावेसर्वार्थाने सक्षम भावी पिढीसाठी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आवाहन

डॉ. विश्वनाथ कराड यांना "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार" प्रदान

पुणे : 

मानवी पिढ्यांना सर्वार्थाने सक्षम आणि प्रगत करण्यासाठी अत्याधुनिक शिक्षणाबरोबर चांगले संस्कारसद्भावनासदाचारसद्विचार आवश्यक आहेतत्यामुळे विद्यापीठांनी शिक्षणाबरोबर या सर्व बाबींनी युक्त विद्यार्थी घडविण्याचे आवाहन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून देशभरात विद्येचे प्रसारक कार्य हाती घेतलेले एमआयटीचे कुलपती डॉविश्वनाथ कराड यांना महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने चौथा "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कारस्वामीजींच्या हस्ते प्रदान करण्यात आलात्याच प्रमाणे तरुण वयात इतिहास संशोधनाचा बाबासाहेबांचा वसा समर्थपणे पुढे चालवणारे डॉकेदार फाळके यांना आदरणीय बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावे दिली जाणारी "श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्तीप्रदान करण्यात आलीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बाबासाहेबांचे पुत्र अमृत पुरंदरेभारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावतअभिषेक जाधवविशाल सातव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

"सध्याच्या काळात जगभरात आणि भारतातही व्यक्तिगतकौटुंबिकसामाजिकसांस्कृतिक आणि वैश्विक पातळीवर मानवाची परिस्थिती उद्विग्न करणारी आहेकारण केवळ शिक्षण मानवी जीवन सुधारू शकतेहा भ्रम आहेत्यासाठी मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहेयाची जाणीव स्वामीजींनी करून दिली.

डॉविश्वनाथ कराड आपल्या भाषणात म्हणाले "सदगुणांची पूजा हीच ईश्वर पूजा असल्याची आपली भावना आहेजीवनात काही आदर्श गरजेचे असतातछत्रपती शिवाजी महाराज हे असेच सर्वात महान आदर्श आहेतआमच्या एका पुस्तिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन जगातील सर्वात महान राजा म्हणून केले आहेमहारांजाचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर तो इतरांपर्यंतही पोहोचवलामोठे कार्य करण्यासाठी विनम्रतासमर्पित भावना आणि शिस्तप्रियता आवश्यक आहेती बाबासाहेबांमध्ये पुरेपूर होतीअसे डॉकराड यांनी नमूद केले. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वारकरी पंथाचे कार्य यात साम्य आहेहे तत्त्वज्ञानच भारत आला विश्वगुरू बनवण्यासाठी पुढे घेऊन जाईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

"इतिहास हा कोणत्याही समूह अथवा व्यक्तींचा अपमान करण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी नाही तर सत्याचा संदर्भासहित वेध घेऊन तो निर्भीडपणे कथन करणेहे इतिहास अभ्यासकाचे काम आहेअसे मत डॉकेदार फाळके यांनी व्यक्त केले.

"छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ इतिहास म्हणून नाही तर वर्तमान आणि भविष्यासाठी ही मार्गदर्शक आहेत्यामुळेच बाबासाहेबांनी शिवचरित्राचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जगात पोहोचविलेअशा शब्दात वंजारवाडकर यांनी बाबासाहेबांच्या कार्याची महती सांगितलीयाप्रसंगी अमृत पुरंदरे आणि प्रदीप रावत यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी, प्रस्तावना अभिषेक जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन राधा पुरंदरे आगाशे यांनी केले. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानंतर शिवराज्याभिषेकाचा नेत्रदीपक प्रवेशही सादर करण्यात आला.

फोटो - डावीकडून अभिषेक जाधव, प्रदीप रावत, रवींद्र वंजारवाडकर, स्वामी स्वरूपानंद सरस्वती, डॉ. विश्वनाथ कराड, अमृत पुरंदरे, डॉ. केदार फाळके, विशाल सातव, राधा पुरंदरे आगाशे

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Anand Rathi Share & Stock Brokers...